भानामतीचा प्रकार खरंच असतो का? आणि हे फक्त महिलांच्याच अंगात का येतं?

सणा-समारंभाला, जत्रेत, पूजा-आर्चा होत असताना एखाद्या बाईच्या अंगात अचानक जोर येतो, ती घुमायला लागते.त्या महिलेच्या अंगात देवी आली असं काहीजण म्हणतात.तर आपल्या अंगात कोणी प्रसिद्ध ऐतिहासिक व्यक्ती कालांतराने
👇
येत राहते, असं एखाद्या महिलेला वाटत राहतं. तर भानामतीमुळे एखादी स्त्री पछाडली गेलीये आणि त्यात सगळं कुटुंबच भरडलं जातं अशीही उदाहरणं ऐकायला, पाहायला मिळतात. बहुतांशवेळा हे प्रकार महिलांसोबतच घडतात.

दोन महिन्यांपूर्वीची घटना. अनिताचं(बदललेलं नाव)लग्न होऊन सहा महिने उलटले असतील
👇
घरात अकल्पित गोष्टी घडायला सुरुवात झाली. घरात कधी अचानक भांडी पडायची, वस्तू गायब व्हायच्या. कधी गरज नसताना गॅस सुरु राहिलेला असायचा. एकदा तर अंगावरच्या कपड्याने पेट घेतला. नंतर चक्क एकदा तर घरातला नऊ तोळे दागिन्यांचा डबा गायब झाला. हळूहळू घरातल्या किंमती वस्तू नाहीशा व्हायला
👇
लागल्या. तिच्या घरातलेही या घटनांनी हादरुन गेले होते. या सगळ्या घटनांमध्ये तोपर्यंत कोणाला इजा झाली नव्हती. पण तिच्या अंगावर लाल रंगात फुल्या यायला लागल्या आणि कोणीतरी करणी करतंय याची चर्चा जोरात सुरू झाली.घराबाहेरही भानामतीचे किस्से रंगू लागले.एकाचं दुसऱ्या कानाला जाताना त्यात👇
किश्श्यांची भर पडू लागली. तिला आधी डॉक्टरकडे नेण्यात आलं. पण अंगावरच्या खुणा बंद होणं काही थांबलं नाही.

औरंगाबादच्या शहाजी भोसले यांनी आतापर्यंत देशभरात भानामतीच्या 302 केसेस हाताळल्या आहेत.अंधश्र्रद्धा निर्मूलन समितीचं ते गेली तीस वर्षं काम करतायत.भानामती म्हणजे कोणीतरी घडवून👇
आणतं, अशी लोकांची धारणा असल्याने अनितासोबत जे घडतंय ते का आणि कसं याचा शहाजी भोसले यांना शोध घ्यावा लागणार होता. कोणीही आजूबाजूला नसताना त्यांनी फक्त अनिताशीच चर्चा केली. अंगावर लाल फुल्या कशा आल्या विचारताना त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की तिच्या लिपस्टिकचाही रंगही तोच आहे.
👇
त्यांनी अनिताला पुढे विचारलं कोणी भानामती करत असेल तर नुसत्या फुल्या कशा? भानामतीसाठी काळ्या कपड्याच्या बाहुलीला टाचणी किंवा कापण्यासाठी फुल्या मारल्या तर त्या तशाच वेदना वा जखमा त्या व्यक्तीला होतात,असा काळी जादू करणाऱ्यांचा दावा असतो. त्याविषयी शहाजी भोसलेंनी अनिताला सांगितलं👇
दुसऱ्या दिवशी अनिताच्या हातावर, पायावर, मांडीवर लाल-काळ्या रंगात फुल्या आणि त्यासोबत जखमाही दिसू लागल्या. अंगावर झालेल्या खुणा बिब्बाच्या आहेत हे त्यांच्या लक्षात आलं. बिब्बाचं तेल त्वचेला घातक असतं. त्याच्या फुल्या मारल्यानंतर काही मिनिटांनी व्रण दिसायला लागतात. आणि जिथे आपला
👇
हात पोहचू शकतो तिथेच हे व्रण दिसतात. शहाजींसमोर हे मान्य करायला अनिता तयार नव्हती. आणि घरातले चमत्कारिक प्रकार थांबायलाही तयार नव्हते.

अनिताच्या घरात स्वयंपाकघरातील भांडी पडण्याचे प्रकार वाढू लागले.एक दिवस सकाळी शहाजी यांनी जाणीवपूर्वक घरातल्या सर्व मंडळींना घरी थांबवून घेतलं
👇
सर्वांना स्वयंपाकघरात यायला सांगितलं. वीस मिनिटं झाली तरी एकही भांडं पडलं नाही. शहाजींनी सगळ्यांना बाहेर जायला सांगितलं आणि मुद्दामहून तिला शेवटी ठेवून तिच्याकडे दुर्लक्ष केल्यासारखं दाखवलं. ती जशी स्वयंपाकघरातून बाहेर पडली तसा एक डबा गडगडत आली पडला. तो तसा पडावा म्हणून अनिताने👇
त्याखाली एक पेपर ठेवला होता, हे शहाजींच्या लक्षात आलं. भानामतीचा प्रकार खरंच आहे, हे सांगण्याचा अनिताचा हा खटाटोप होता. तो या प्रकाराने अपयशी ठरला. शहाजीनी स्वतःच भानामती करणाऱ्या अनिताला रंगेहात पकडलं. नंतर तिनेही मान्य केलं की आधीचे सर्व प्रकार तिनेच घडवून आणले होते..
👇
अनिताचं पूर्वी एका तरुणावर खूप प्रेम होतं. आणि हे लग्न तिच्या मनाविरुद्ध झालं होतं. त्यानंतर ती एका मनाच्या विकाराने पीडित झाली. घरातल्यांचं लक्ष व सहानुभूती मिळवण्यासाठी तिने रहस्यमय गोष्टी रचायला सुरवात केली. शहाजी भोसलेंच्या मते भानामतीच्या 99 घटनांमधे पीडित महिला स्वतःच 👇
भानामती करत असते. त्यामागचं वैज्ञानिक सत्य शोधून काढावं लागतं. या घटना रायायनिक अभिक्रिया, भौतिक अभिक्रिया आणि हातचलाखीने भरलेल्या असतात.तर एक टक्के घटनांमध्ये एखादी व्यक्ती दुसऱ्याच्या बाबतीत सगळं घडवून आणते.त्यात आकस किंवा त्रास देणं हा हेतू असतो.पीडित महिलेच्या अंगावरचे कपडे👇
पेटतात पण तिला इजा होत नाही. घरावर दगड पडतात पण त्यात कोणी जखमी होत नाही, त्यामुळे भानामतीत कोणाचा मृत्यू झालेला उदाहरण दिसत नाही. भानामती आणि मराठवाड्यातला बिब्बा म्हणजेच गोटयाच्या झाडाचा जवळचा संबंध आहे. भोकरदन, फुलांब्री, सिल्लोड, कन्नड या भागात बिब्बाची झाडे अधिक सापडतात
👇
त्यामुळे भानामतीमधे बिब्बा अनेकदा वापरला जातो. डोळ्यातून खडे पडणारी महिला, सलग पंधरा दिवस साप चावला असं सांगणारी मुलगी, अचानक कोणीतरी केसांची वेणीच कापून टाकली. अशी प्रकरणं शहाजी भोसले यांनी हाताळली आहेत.अशा महिलांच्या मनावर उपचार करण्यासाठी मानसोपचार तज्ञाची मदत ही घेण्यात आली👇
You can follow @Shrijoshi19.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.