कालचा दिवस आमदार गोपीचंद पडळकरांचा होता, अन इथून पुढेही त्यांचाच जलवा असणार आहे. मला सातत्याने वाटत आलंय की, @GopichandP_MLC हे गावगाड्यातल्या बहुजन समाजाच्या पोरांना आत्मभान जागृत करायला भाग पाडणारं दमदार रसायन आहे. अरे ला कारे करून सामान्य पोरांना प्रस्थापितांच्या मानगुटीवर+
बसायला लावणारा, अन प्रस्थापितांना गोटात खळबळ माजवणारा स्वाभिमानी नेता म्हणून पडळकर आता महाराष्ट्रभर वावरत आहेत.
कुशल संघटक, करारी नजर, दमदार भाषणशैली आणि अभ्यासू वृत्ती याने माणदेशी माणसांच्या गराड्यात राहणारा आणि अनेक वर्षे पिचत असलेल्या माणसाला सन्मान आणि स्वाभिमान देणारा हा+
कुशल संघटक, करारी नजर, दमदार भाषणशैली आणि अभ्यासू वृत्ती याने माणदेशी माणसांच्या गराड्यात राहणारा आणि अनेक वर्षे पिचत असलेल्या माणसाला सन्मान आणि स्वाभिमान देणारा हा+
नेता आहे. बंडखोर स्वभाव असला तरी सामान्य माणसाला अपार प्रेम देणारा गोपीशेठ आता विरोधकांना पुरून उरतोय. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी महाराष्ट्रभर लाखोंच्या सभा घेत समाजात अंगार निर्माण केला. आपल्या आक्रमकतेने अनेक आंदोलन त्यांनी केली, कालचं आंदोलन हे त्याचीच एक झलक आहे.+
देवेंद्रजींनी हेरलेला हा हिरा भाजपाचा हुकमी एक्का आहे, आता राष्ट्रवादीला त्याच्या झळा बसायला लागल्या आहेत, मात्र या झळा केवळ पक्षीय द्वेषामुळे नाही तर आत्तापर्यंत राष्ट्रवादीने पश्चिम महाराष्ट्रात केलेलं सत्तेचं वर्तन आणि बहुजन समाजाशी केलेला व्यवहार, प्रस्थापित म्हणून त्यांनी+
सामान्य माणसाची केलेली परवड याची भयंकर चीड पडळकरांच्या मनात आहे. कारण ते त्यांनी भोगलं आहे. आता राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्याचे वाईट वाटत असले तरी सुटका मात्र नाही, कर्माची फळं असतात ती आता जनता आणि नेते हुशार झालेत त्यामुळे मिळणार आहेत. पडळकरांना रोखणे तर अशक्य आहेच पण तसा+
प्रयत्नही केला तर आता गावागावात हजारो स्वाभिमानी आणि पडळकर प्रेमी तयार झालेत, देवेंद्रजींच्या नेतृत्वात अशी स्वाभिमानी पोरं तयार करणं हाच एककलमी कार्यक्रम आहे. जे वाकडं चालणाऱ्या प्रस्थापितांना पावलोपावली काटे बनून टोचत राहतील.
काल पडळकरांनी आंदोलन केल्यावर त्यांना विरोध+
काल पडळकरांनी आंदोलन केल्यावर त्यांना विरोध+
करण्यासाठी राष्ट्रवादीच्या वतीने अमोल मिटकरी टीव्हीवर आले होते, ज्यांचा उच्चार पडळकर यांनी "बाजारू दलाल विचारवंत" असा केला. त्या मिटकरीनी पडळकर यांच्यावर टीका करताना बारामतीत तुमचे डिपॉझिट जप्त झाले अशी भाषा केली.आता खरा प्रश्न माझ्यासारख्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला+
पडला की, तुमचा पार्थ पवार असा किती लाखोंच्या लीडने निवडून आलाय का? पण समोर पराभव दिसत असतानाही पक्षाचा आदेश मानून आटपाडीतुन थेट बारामती गाठणारा बहाद्दर एकच पडळकर आहे. जो निधड्या छातीने लढला, (पडळकरांच्या भाषेत सांगायचं तर - पवारांच्या छाताडावर नाचून निवडणूक लढवली आहे).
मात्र+
मात्र+
राष्ट्रवादीने डिपॉझिट जप्त झाल्याची टीका करणं हे किती हास्यास्पद आहे बघा, पडळकर किमान तिथे शेवटपर्यंत लढले तर. इकडे लोकसभेच्या निवडणुका सुरू होत्या, माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवारांच्या उमेदवारीसाठी चाचपणी सुरू होती आणि "माढा - पवारांना पाडा"एवढा मेसेज व्हायरल झाला आणि पवारांनी+
माघार घेत त्यावर पडदा टाकला. आता ज्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार केवळ एका मेसेजमुळे लढलेच नाहीत त्या राष्ट्रवादीने पडळकर यांना डिपॉझिटवर बोलणं हे केवळ हास्यास्पद आहे.
हेच पडळकर सतत पावलापावलांवर तुम्हाला टोचतील आता अजून जोमाने राज्यभरात झंझावाती दौरे होतील, देवेंद्रजींनी+
हेच पडळकर सतत पावलापावलांवर तुम्हाला टोचतील आता अजून जोमाने राज्यभरात झंझावाती दौरे होतील, देवेंद्रजींनी+
प्रवेश देताना मिठी मारून दिलेला विश्वास आणि कानमंत्र आता महाराष्ट्रभर घेऊन जाणे आहे. स्वाभिमानी युवकांची फौज तयार करणं हेच प्रस्थापितांना उत्तर असेल, ते काम आता वेगानं सुरू झालंय...



एकच छंद - गोपीचंद!

#पटलं तर शेअर करा..
- विकास विठोबा वाघमारे
vwaghamare0@gmail.com




एकच छंद - गोपीचंद!


#पटलं तर शेअर करा..

- विकास विठोबा वाघमारे
vwaghamare0@gmail.com