अत्यंत महत्त्वाची बातमी

रोना विल्सन यांना एल्गार परिषद प्रकरणी अटक करण्यात आली होती.अटकेमागे मुख्य पुरावा होता,विल्सन यांच्या लॅपटॉपमध्ये सापडलेली काही पत्रे.एका पत्रात प्रधानमंत्र्यांची हत्या करण्याचा व सरकार उलथवण्याचा कट आहे असा पोलिसांचा दावा होता.(1) https://www.washingtonpost.com/world/asia_pacific/india-bhima-koregaon-activists-jailed/2021/02/10/8087f172-61e0-11eb-a177-7765f29a9524_story.html
ते पत्र आणि अजून अशी 10 पत्रे बनावट निघाली आहेत. अमेरिकेतील आर्सेनल या फॉरेन्सिक प्रयोगशाळेत विल्सन यांचा लॅपटॉप तपासला गेला. त्यात ही धक्कादायक बाब समोर आली. जून 2016 साली विल्सन यांच्या लॅपटॉपवर सायबर अटॅक झाला. एका मेल मधून एक मालवेयर त्यांच्या लॅपटॉपमध्ये डाउनलोड झाले.(2)
त्या मालवेयर ने त्यांच्या लॅपटॉपमध्ये एक हिडन फोल्डर तयार केले. आणि त्यात ही 10 कटकारस्थानाची पत्रे ठेवली गेली. विल्सन यांनी कधीही न लिहिलेली स्फोटक पत्रे अशाप्रकारे त्यांच्या लॅपटॉपमध्ये प्लांट केल्या गेली. यात सर्वात खतरनाक गोष्ट अशी की कोरेगाव भीमा प्रकरण होते 2018ला.
(3)
विल्सन यांच्या लॅपटॉपमध्ये मालवेयर प्लांट केल्या जाते 2016 मध्ये. म्हणजे किती आधीपासून कटाक्षाने नियोजन करून या ऍक्टिव्हिस्ट लोकांना फसवले गेले आहे ते लक्षात घ्या. खूप बारकाईने अभ्यास करून हा प्लान शिजत आला होता. सरकारविरुद्ध असणारा विरोधाचा प्रत्येक आवाज असा दाबल्या जातो.(4)
NIA ला नेहमीप्रमाणे लॅपटॉपमध्ये काहीच छेडखानी आढळली नाही. अमेरिकन प्रयोगशाळा आर्सेनल सुद्धा ज्याप्रकारे ही छेडखानी झाली त्यामुळे स्तंभित आहे. त्यामुळे सरकारला मूर्खात काढू नका. आपल्याविरुद्ध आपल्याला कल्पनाही नसतील अशा गोष्टी शिजत असतील. ही लढाई भयंकर मोठी आणि कठीण आहे.(5)
सर्वात महत्त्वाचं म्हणजे एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा दंगल महाराष्ट्राच्या समाजकारणाला कलाटणी देणाऱ्या घटना होत्या. आणि ही वाशिंग्टन पोस्ट ची बातमी या प्रकरणाचा निकाल लावणारी आहे. आता बघू किती आणि कोण मराठी मीडिया पहिल्या पानावर ही बातमी देईल किंवा यावर डिबेट करेल.
-
You can follow @arvindgj.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.