सुधीर फडके यांचे मराठी...आसाम- मणिपूरमध्ये !
(बाबूजींचा एक अज्ञात पैलू !)
- मकरंद करंदीकर

कै. सुधीर फडके यांचा एक फारसा माहिती नसलेला पैलू मुद्दाम सांगण्यासारखा आहे.
त्यांचा सुपुत्र श्रीधर आणि मी कॉलेजमध्ये एकत्र शिकत होतो.
आमच्या दोघांच्या मैत्रीमुळे मी खूपवेळा त्यांच्या दादरच्या घरी गेलो आहे.
घरी कायम अनेक प्रतिष्ठितांचा राबता असायचा.
त्यांच्या घरात ईशान्य भारतातील ( अासामी तोंडवळ्याची, गोरी, बारीक डोळे असलेली ) काही मुले राहत असत.
त्यांचे वेगळेपण लगेच लक्षात येत असे. ईशान्य भारताला तेव्हां NEFA ( North East Frontier Agency ) म्हणत असत.
त्या मुलांबद्दल चौकशी केल्यावर मला आश्चर्यकारक गोष्ट कळली.
चीन सरकारच्या दबावामुळे, ईशान्य भारतात सरकारने विकासकामे, मूलभूत सोयी, पर्यटन,शिक्षणाच्या सोयी,
इत्यादी गोष्टी हातीच घेतल्या नव्हत्या.
लोकांमध्ये कमालीची गरिबी होती.
शिक्षण नाही, उद्योग-व्यवसाय नाहीत, रोजगाराच्या संधी नव्हत्या.
त्यांच्या गरिबीचा गैरफायदा घेऊन त्यांचे लबाडीने धर्मांतर केले जात होते.
राज्यकर्ते ही गोष्ट तेव्हा नाकारत होते
पण आज आपण पाहतो आहोत की तेथील ७ राज्यात ख्रिचन धर्म हा प्रमुख धर्म झाला आहे.
त्यामुळे या गरीब हिंदूंना धर्मांतरापासून वाचविण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विशेष आवाहन केले होते.
तेथील मुलांना, देशभरातील ज्यांना ज्यांना शक्य आहे अशा लोकांनी
आपापल्या घरी नेऊन, सांभाळून त्यांच्या शिक्षणाची सोय करावी अशी संघाची सर्वांना विनंती होती. त्याला साद देऊन बाबूजींनी आसाम, मेघालय, अरुणाचलप्रदेश, अशा राज्यातील काही मुलांना आणून दादरला आपल्या घरी पूर्ण वेळ ठेऊन घेतले.
त्यांचा सर्व खर्च ते करीत असत.
शिकून काही मुले
त्यांच्या घरी परत गेली की आणखी काही मुले बाबुजींकडे येऊन राहत असत.
ही मुले त्यांच्याकडे अगदी घरच्यासारखी राहत.
ही मुले मराठी शिकत असत, बोलत असत. श्रीधरच्या आईला ( ललिताबाई फडके ) मदत करीत असत.
यातील एक मुलगा तर आमच्याबरोबरच कॉलेजमध्ये शिकत होता.
बाबूजी म्हणजे काही
कोट्यवधी रुपये कमविणारे बॉलिवूडचे संगीतकार नव्हते. पण त्यांचे जे काही उत्पन्न होते त्यातून ते हा सर्व खर्च करीत असत.
देशभक्तीचे पक्के संस्कारच त्यांना हे करायला उद्युक्त करीत असावेत.
हे सर्व ते कुठल्याही गाजावाज्याशिवाय करत होते. अशा या मुलांमधून
अशा या मुलांमधून मोठा झालेला एक मुलगा आता ईशान्य भारतातील एका राज्याचा मोठा अधिकारी आहे.
त्याचे नाव (बहुधा) श्री. फुनशी असावे.
काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर सह्याद्री वाहिनीच्या साडेनऊच्या बातम्यांमध्ये त्याची मुलाखत घेण्यात आली.
तो खूप छान मराठी बोलत होता.
बाबुजींबद्दल बोलतांना तो खूप हळवा झाला होता.
अगदी घरगुती भाषेत तो म्हणाला, "अण्णा (बाबूजी) आजारी झाल्यावर मला त्यांना भेटता आले नाही. नंतर ते गेले तरी मी येऊ शकलो नाही. पण अण्णांनी माझ्यासाठी दादाजवळ (श्रीधरजवळ) एक अंगठी देऊन ठेवली होती. मी भेटल्यावर दादाने ती मला आठवणीने दिली."
बाबुजींकडे वाढलेले असे अनेक ' फुनशी' आज ईशान्य भारतात आहेत. लोकांना ही गोष्ट फारशी माहितीही नाही.. म्हणूनच मला हे सांगितल्याशिवाय राहवत नाही.

आसाममध्ये कधी पर्यटनाला गेलात आणि एखाद्या घरातून सीडीवर बाबूजींचे मराठी सूर ऐकू आले तर दचकू नका. बाबूजींनी मराठी मातीत त्यावेळी
वाढविलेली रोपे आता वृक्ष होऊन तिथे नांदताहेत. बाबूजींसारखी माणसे अश्या अनेक मोठ्या गोष्टी किती सहजपणे करत होती!
बाबूजींच्या या अनमोल कार्याला सादर प्रणाम 🙏🙏
You can follow @rashmi_shrikant.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.