ऐका चर्चा!!
मी एक मराठा आहे आणि ब्राह्मणाच्या रुपात असलेल्या एका धर्म द्वेषी एकता जोशी यांच्या या विचारांचा पूर्णपणे निषेध करते...
जगात देव आहे हे कोणी सिद्ध करू शकला नाही पण त्याची प्रचिती ही कित्येकांना जाणवली कि तो आहे..
जोशीं तुम्ही ह्या बाई पर्यन्त माझे उत्तर नक्की पोहोचवा. https://twitter.com/Shrijoshi19/status/1357542601860079619
देव नाही हे सिद्ध करून दाखवा त्यावेळी या सगळ्या भंपक गोष्टीवर आम्ही विश्वास ठेऊ...
.
देव देवळं हे का आहेत..??
का दान, धर्म, पूजा, पाठ, होम, हवन केल्या जातात..??
माझं वैयक्तिक मत व विचार सांगते..
प्रत्येक वेळी प्रत्येक दिवसाला आपल्याला एक प्रोत्साहित करणारीच ऊर्जा हवी असते...
ती मिळते या मंदिरात.. कधी जर मी आयुष्याला कंटाळली असेल या जगात माझं ऐकणारं, मला समजणारं कोणी नसेल तर मंदिरातला तो दगड असतो नेहमी माझं ऐकायला, तुम्ही मान्य करा अन्यथा नका करु आशेची एक किरण तेवत राहते की देव आहे आपल्या पाठीशी होईल सर्व काही ठीक..
एकदा देवाला साकडं घातलं..की
वाटतं आता आपल्याला जे हवंय ते नक्किच मिळणार.हीच ती इश्वर शक्ति जी positive energy च्या रुपात तुम्हाला एका दगडरुपी देवात मिळते.
दुसरं जर मंदिर प्रसन्न स्थळी व स्वच्छ नसेल तर तिथे इच्छा होईल का थांबण्याची? त्यासाठी दानपेटी,तीही कुठली जबरदस्ती नाही. मुंबई मध्ये हफ्ता वसूली चालते.
पण मंदिरातली दानपेटी डोळ्यात सलते, तिथे बसलेल्या भटजींनी आतापर्यंत कोणाचा हात धरून जबरदस्ती केलिए का की पैसे टाका नाहीतर सोडणार नाही.?
या हजारो मंदिराबाहेर बसलेले फुल,अगरबत्ती विकणारे लाखो कुटुंब पोसल्या जातात त्या मंदीरामुळे.नारळ, कापुर,अगरबत्ती,दिवा, कपाळावर चंदनाचा टिळा, हातात
पंचरंगी धागा याचे शास्त्रीय कारण आहे.. यातून सकारात्मक ऊर्जा ही सतत भोवती तर राहतेच शिवाय आजुबाजूला प्रसन्न वातावरण..आता वैज्ञानिक कारणासाठी गूगल करा.. हे यापुर्वी सांगितलं आहे मी..
लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला त्याचे मूळ कारण तर हे आहे की सर्वांनी एकत्र यावं..
तुम्ही कधी बघितलं आहे का की नातेवाईकांमधे अबोला पडलेला असतो पण सणवार आले की आपण म्हणतो की आजच्या दिवशी अबोला नको. दसर्‍याला दिवाळीला एकमेकांना शुभेछा आशीर्वाद देऊन वाद संपतात..अगदी शेजारच्यांसोबत सुद्धा... मग काय वाईट आहेत उत्सव.. गणेशोत्सव, होळी,दिवाळी या सणांमुळे अख्ख्या
जगात आपली संस्कृति वेगळी आणि उठून दिसते.. 100-200 रुपयाची मूर्ति तुम्ही खरेदी करता त्यावेळी तो कुंभार लाखाचा आनंद घरी घेऊन जातो..हे पूर्णपणे एक वर्तुळ आहे थांबलं तर अनर्थ होईल
मी शाळेत असताना एक सपकाळ मॅडम होत्या मराठी विषय शिकवायच्या त्यांचं एक वाक्य माझ्या डोक्यात सतत राहतं..
देवावर अंधश्रद्धा नाही तर श्रद्धा असूद्या कारण आपण नेहमी वाईट गोष्टी करण्यापासून लांब राहतो...अगदी लहानपणापासून आपल्याला मोठे लोक म्हणत असतात.. असं नाही करायचं देव बाप्पा पाप देतो...
मग काय चुकीचं आहे देवावर विश्वास ठेवण्यात..??
ज्यावेळी ही आस्था श्रद्धा आणि भीती संपेल..
त्यावेळी सगळीकडेच गुन्हेगारी वृत्ती वाढून हाहाकार माजेल..
देव आहे आणि खरंच आहे. तुम्ही जो श्वास घेताय ना तोच देव आहे.. आणि कलाकारांनी त्यांना वेगवेगळी रुपे दिलीत...
छोट्याश्या तुपाच्या दिव्याने तिथल्या जवळपास चे विषाणू मरतात मग होम हवन याने तर नक्किच वातावरण शुद्ध होत असेल..
शिवाय 551/- रुपयाच्या पूजेमधे अमूल्य असे समाधान आणि सकारात्मकता मिळुन माणूस आणखी उत्साही होतो... मग ब्राह्मणाने सांगितलेली पूजा कशी वाईट आहे.. मनोचिकित्सकांकडे आज लाईन लागलेली असते अश्या छोट्या सहानुभूती साठी मग एक ब्राह्मण तीच treatment वेगळ्या पद्धतीने देतो तर चूक काय.?
आपला मेंदू हा अतिशय सेंसेटिव केमिकल आहे.. तो जे विचार करतो किंवा विश्वास ठेवतो तसंच तो शरीराला पोसत राहतो..
एखादा मुलगा खूप बंड असेल तर भटजी म्हणतात याची शांति करा..
त्या मुलाचा त्यावर आधीच विश्वास असतो. मग काही मंत्र म्हंटल्यावर आपोआपच त्या मुलाला शांत वाटायला लागतं..
कारण त्याच्या "subconscious mind" मध्ये हे fix झालेलं असतं की आपली शांति झाली आहे आणि त्याच्या वागणुकीत बदल व्हायला लागतात....
हीच सकारात्मक ऊर्जा म्हणजे देव.. असे असंख्य अनुभव प्रत्येकाला त्याच्या जीवनात येत असतात आणि हा डोळ्यांना दिसावा म्हणुन त्याची मंदिरं आहेत..
आपल्याच धर्मात सापडतात असले कूचीत विचारांची लोकं..
कोणीही मुस्लिम मस्जिद वर, शीख गुरुद्वारा वर, ख्रिश्चन चर्च वर, बोट दाखवून बोलत नाही पण मंदिरं म्हणजे अंधश्रद्धा हे आम्ही पूर्ण निर्लज्ज होऊन सांगतो आणि बरेचजण हे मान्य पण करतातच....
केदारनाथ मध्ये घडलेली जिवंत आणि ताजी घटना आहे फक्त मंदिरात थांबलेले नागरिक सुरक्षित राहिले होते बाकी कुठे गेले कळालं पण नाही..
देव आहे आणि 100% आहे याचा माझ्याकडे पुरावा आहे
जो कुणी नास्तिक आहे त्याने मला देव नाही याचा पुरावा द्यावा.
.
साभार- मी स्वतः
हर हर महादेव
धन्यवाद 🙏
You can follow @Sonpari_SR.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.