By Kapil Patil
बदनामी सोबत दंडेलशाही दडपशाहीचा वापर करून सुद्धा शेतकरी आंदोलन मोडीत निघत नाही उलट ते आणखी तीव्र होताना दिसतंय म्हणल्यावर देशातच काय जगात पण चर्चा होणारच की
दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ आंदोलन चालू आहे, पावणे दोनशेच्या आसपास बळी गेलेत, (1/11)
शंभर पेक्षा जास्त लोक बेपत्ता आहेत, सुविधा तोडल्या जातायत तरी सुद्धा शेतकरी आपली एकवाक्यता टिकवून निकराची झुंज देतायत. एवढी गंभीर परिस्थिती बघून याची का नाही चर्चा होणार? (2/11)
इथले राज्यकर्ते आणि त्यांच्या बोटावर नाचणाऱ्या कठपुतल्या असंवेदनशील असतील म्हणून काय जगात सगळीकडे तसंच असावं का...
पॉप सिंगर रिहाना मोठी कलावंत असली तरी माणूसकीच्या दृष्टीकोनातून जगभरातील बऱ्याच विषयांवर भूमिका व्यक्त करत असते. (3/11)
मुळात हे करताना त्यांना तो विषयही तितकाच जाणून घ्यावा लागतो. कारण जगभरातील फॉलोअर्सच्या माध्यमातून उलटसुलट प्रतिक्रिया येतील याची आधीच दखल घ्यावी लागते.
रिहानाने कोरोनासाठी 36 कोटी दान केलेत, (4/11)
इथल्या करचुकव्या पाणीपट्टी बुडणाऱ्या कथित सेलिब्रिटींची माणूसकीच्या बाबतीत तीच्या एवढी लायकी नाही !!
बऱ्याच जणांनी नावा वरुन गफलत झाल्याने ती मुस्लिम आहे का याचा शोध चालू केला, काल गुगलवर सर्वात जास्त तेच सर्च झालं. तर आयटी सेलने ती मुस्लिम असल्याचं घोषितही करुन टाकलं. (5/11)
असो, तो वेगळाच विषय आहे...
काल तीने भारतातील शेतकरी आंदोलनावर ट्विट केलं आणि जिथं लागायला पाहिजेत तिथं बरोबर मिरच्या लागल्या.
सरकारने भारतातले कथित सेलिब्रिटी कलावंत खेळाडू यासाठी कामाला लावले, (6/11)
जे कालपर्यंत या आंदोलना बाबत अवाक्षर बोलले नाहीत त्यांची अचानक सरकारच्या बचावासाठी स्पर्धा चालू झाली.
मुळात पैसा कमावणे हे एकच ज्यांच उदिष्ट असतं त्यांच्याकडून वेगळ्या काय अपेक्षा आहेत. पण हीच मंडळी या देशातला शेतकरी, (7/11)
मजूर किंवा अन्य सामान्य जनतेनं डोक्यावर घेऊन मोठी केली आहे याची जाणीव नाही त्यांना..!
एकीकडे अनेकांनी या आंदोलनाची दखल घेतली आहे. (8/11)
तर दुसरीकडे आमच्या शेतकऱ्यांच्या जीवावर उठून ते लोकशाही मार्गाने न्याय मागत असताना त्यांचीच देशद्रोही खलिस्तानी अशी प्रतिमा बनवण्यात आमचं सरकार व्यस्त आहे. कोणासाठी करताय बाबांनो अदानी अंबानी सारख्या मूठभर लोकांसाठी... (9/11)
कमला हॅरिस यांची भाची मीना हॅरिस हीने देखील शेतकरी आंदोलनावर मोजक्या शब्दात समर्पक ट्विट केलंय. जगभरात सरकारची लख्तर फाटली आहेत. ती सावरायला भारतातले सेलिब्रिटी यात सहभागी झालेत.
हरकत नाही पण डोक्यावर घेतलेल्या जनतेला यांची खरी ओळख तरी झाली. (10/11)
आत्ता खऱ्या अर्थाने शोषक विरुद्ध शोषनकर्ता लढाई चालू झाली आहे...
आपण कोणाच्या बाजूने आहोत ठरवा मित्रांनो
#FarmersProtest
#IStandWithFarmers (11/11)
लेखकाची पूर्वपरवानगी घेतलेली आहे 🙏
इथ शोषक / शोषणकर्ता असं वाचावे *
You can follow @bharat_parody.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.