स्वरक्षण काळाची गरज..

बलात्कार, अपहरण, ऍसिड ऍटॅक, छेडछाड आणि बरेच काही ह्याचे प्रमाण वाढत चालले आहे. त्याचे मूळ कारण पुरुषाची वाढत जाणारी बुद्धीतली घाण. मुलीकडे, स्त्री कडे पाहण्याचा दृष्टिकोन. महापुरुषांचे आदर्श डोळ्यासमोर न ठेवणे. आणि वरून एका स्त्री ने कसे वागायचे किंवा +
कसे नाही वागायचे, बलात्कार झाल्यावर तीच कशी चुकीची आहे ही विचारसरणी. कुठल्याही बलात्काराला स्त्री कधीच जवाबदार नसते असे एक पुरुष नक्कीच ठामपणे म्हणेल. पण आज असे वाटतेय की स्त्री सुद्धा काही प्रमाणात जवाबदार आहे..!!!

कोणताही वेगळा विचार करण्याआधी वरील वाक्याचे विश्लेषण नक्की +
वाचावे.

बलात्कार करणाऱ्या नराधमांची ही समाजातील विकृत जात काही संपणार नाही मग मातांनो, भगिनींनो तुम्हालाच काहीतरी करावे लागेल.
प्रत्येक स्त्री ही द्रौपदी इतकी नशीबवान नसते की जिचा भाऊ श्रीकृष्णा सारखा चमत्कारी किंवा दैव अवतार असेल. भावाच्या मनात असून देखील जर कल्पना नसेल तर +
तो तरी वेळेवर तुमची अब्रू वाचवायला कसा येऊ शकेल.

स्त्री ही घरातील मांगल्य, अब्रू, स्वाभिमान, अभिमान, गर्व, माज सगळे असते. बलात्कार हा अक्षम्य गुन्हा फक्त पीडितेवरच नाही तर त्या पूर्ण कुटुंबावर होतो. बलात्कारात घाव फक्त शरीरावर वर नाही तर मनावर पण खोलवर होतो. ते विसरणे अशक्यच. +
म्हणून स्वतःची रक्षा तुम्हाला स्वतः करता आली पाहिजे. ती कशी करता येईल ह्याबद्दल आज थोडी माहिती घेऊ.
1) हातोडी वार (hammer strike)
ह्या प्रकारात खरोखरची हातोडी बाळगायची गरज नाही. आज जवळपास प्रत्येक मुलीकडे गाडीची अथवा घराची चावी असते. विचारकरा एक छोटीशी चावी पण वेळ प्रसंगी +
तुमची रक्षा करू शकते.
रात्री अपरात्री किंवा सामसूम जागेवरून जाताना चावीची मागची बाजू बोटांच्या मध्ये जोरदार पकडून ठेवायची. अथवा मुठीत. अचानक कोणीही तुमच्या वर घात करण्यास जवळ जरी आला तरी त्याच्या आधी तुम्ही त्या चवीचे पुढचे टोक त्याच्या कोणत्याही जास्त संवेदनशील भागावर मारू +
शकता. नाक, डोळे, ओठ अथवा सरळ कपाळावर. तो सावरेपर्यंत बराच वेळ मिळेल तिथून पळण्याचा, मदत मागण्याचा किंवा दुसरा घात करायला.

2) मध्य वार (center shot)
हा सर्वज्ञात असलेला प्रकार आहे. पुरुषाचा सर्वात संवेदनशील भाग म्हणजे सेंटर. दोन पायांच्या मध्ये. पुरुष कितीही धिप्पाड असला तरी +
ह्या वेदना तो सहन करू शकत नाही आणि डिफेन्ड सुद्धा करू शकत नाही. ह्या आघात नंतर तर जवळपास 10 मिनिटे नक्कीच मिळतील.

3) हनुवटी आघात(heel palm strike)
उजवा पाय मागे घेऊन उजव्या हाताचा तळहात म्हणजे हाताचा उभारलेला भाग हा समोरच्याच्या हनुवटी वर जोरदार दाब देऊन पुढे ढकलावे. म्हणजे +
त्याची मान पूर्ण मागे जाऊन पुढचा वार करण्यास वेळ मिळेल.

4) कोपरखळी(elbow strike)
माणसाची हाडे ही स्टील पेक्षा पण द्विगुणित टणक असतात आणि बोटांच्या हाडपेक्षा, बुक्कीपेक्षा पण आपल्या कोपर्याचे हाड अधिक कडक आणि मजबूत असते. त्याचा उपयोग करून समोरच्याच्या उभ्या रेषेत वरून खाली +
मारल्यास छातीत, खालून वर मारल्यास हनुवटी वर आणि आडव्या रेषेत मारल्यास कानावर किंवा गालावर आणि समोर मारल्यास नाकावर. वेदना खुप होतील.

5)मिठीतुन सुटने(escape from bear hug)
समजा तुम्हाला कोणी मागून पकडले असेल तर दोनीही कोपर्यांनी वार करत राहावे पकड ढिली होई पर्यंत. किंवा पैलवान +
लोक जसे सोडवतात तसे. हाताचे अंगठे त्याच्या मुठीत घालून पण ताकद जास्त लावावी लागेल पहिला पर्याय उत्तम.
समोरून पकडले असेल तर कोणताही विचार न करता दोन्ही अंगठे डोळ्यात जोरात खुपसा, सहजा सहजी सुटणुका होईल.

6) नाक फाडणे(finger in nose)
हाताची दोन्ही बोटे समोरच्याच्या नाकपुड्यांमध्ये+
घालून जोरात ओढणे. अतोनात वेदना होतात. घाण वाटेल पण पर्यायी वापर केला असता प्रभावी आहे.

7)बोट तोडणे (finger break)
चाफेकळी म्हणजे अंगठा आणि मधल्या बोटांच्या मधील बोट. वाकडे तिकडे करून तोडले असता मान तुटण्या इतपत वेदना होतील.
नखांचा शक्यतो वापर करू नका त्याने तुम्हालाच इजा +
होण्याची जास्त शक्यता असते. त्यापेक्षा एखादी धातूची बांगडी घाला जी वेळप्रसंगी मुठीचा पर्याय म्हणून कामाला येईल.

हे तर खूप थोडेफार पर्याय आहेत पण सोपे आहेत. बाकी गूगल वर आणि youtube वर असे बरेच मार्ग आहेत पण वेळ आणि इच्छेचा अभाव असल्याने आपण त्या गोष्टी दुर्लक्षित करतो. +
लिहिण्याचा पेन सुद्दा वेळप्रसंगी चाकुचे काम करू शकतो. एखादी अंगठी टोकदार असावी. जमल्यास काही डावपेच पाहून शिकण्याचा प्रयत्न करा घरातील पुरुषासोबत, भाऊ, नवरा, मित्र, मैत्रीण अभ्यास करा पण ऐनवेळेस हे सुचावे म्हणून थोडीशी प्रॅक्टिस गरजेची. लक्षात ठेवा तुमची रक्षा स्वतः तुम्हाला +
सुद्धा करायची आहे. घरापासून लांब जाताना एक दोन जवळच्या किंवा परिवारातील व्यक्तीला लोकेशन शेअर करून ठेवत जा. स्पीड डायल ला जवळील पोलीस स्टेशन चा आणि सरकार ने महिलांसाठी अतिदक्षता क्रमांक नेमला आहे तो सेट करून ठेवा. अशी वेळ सांगून येत नाही. तयारीत राहिलेलं केव्हाही चांगले. +
ते म्हणतात ना precaution is better than cure. आपली अब्रू शेवटी आपलीच जवाबदारी. बाकी माझ्यासमोर असे काही घडत असेल तर मी नक्कीच जीवाची पर्वा न करता त्या स्त्री साठी जमेल ते करेल पण प्रत्येकवेळी तिथे कोणीतरी मदत करायला असेल असे नव्हे.
वयाने मोठ्या असलेल्या किंवा विवाहित स्त्री +
कदाचित विरोध करतील पण शालेय आणि अल्पवयीन मुलींना स्वरक्षण चे शिक्षण देणे खुप गरजेचे आहे. त्या मनाने आणि शरीराने कवळ्या असतात. हे झाले फक्त एक व्यक्तीचा सामना करण्याची साधने पण एक पेक्षा जास्त असतील तर आजून पुढचे ज्ञान घेणे आवश्यक.

संदर्भ :-
गुगल, इंग्रजी ऍक्शन मुव्हीज
+
ब्रूस ली चे वाचलेले एक पुस्तक
विद्युत जामवालचे पाहिलेले काही व्हिडीओज.
हे लेखन
सर्व मुली, स्त्रिया, मैत्रिणी, माता-भगिनींना समर्पित.
(ता.क.:- काही शब्द जरा मोकळेपणाने लिहिले आहेत पण कळकळीने. आशा आहे समजून घ्याल.)
@yuga_v108 @GhategastiPatil @3_suhani @Sonalimumbai1 @Sonpari_SR
You can follow @Abhi_hinduwagh.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.