मंत्र का म्हणावे?
आज आधुनिक विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की प्रत्येक सजीव निर्जीव वस्तूला , प्राण्यांना, माणसाला, ऊर्जेची स्पंदने (energy frequencies) असतात. जेथे कंपने / स्पंदने होत असतात, तेथे ध्वनी निर्माण होतोच. म्हणून योगामध्ये म्हंटले आहे, की आपले संपूर्ण अस्तित्व म्हणजे
केवळ एक ध्वनी आहे, ज्याला आपण "नादब्रम्ह" असे म्हणतो. या सर्व स्पंदनांमध्ये काही स्पंदने विशेष महत्वाची आणि मानवी आरोग्यास हितकारक असतात. अशाच निसर्गतः उपलब्ध असणाऱ्या महत्वपूर्ण ध्वनींचा उपयोग अनेक मंत्रांमध्ये केला जातो. मंत्र हा शब्द ‘मन्’ (विचार करणे) या संस्कृत धातूपासून
बनला आहे.
विशिष्ट प्रकारचे मंत्र शास्त्रशुद्ध प्रकारे म्हणल्याने एक प्रकारची ऊर्जा, स्पंदने, निर्माण होतात हे scientifically सिद्ध झाले आहे. ऊर्जेच्या या नैसर्गिक प्रवाहाचा वापर करून घेऊन, योग्य मंत्र, ध्यान आणि योगसाधना यांच्या मदतीने कोणतीही व्यक्ती दिव्यत्वाच्या जवळ एक पाऊल
पुढे सरकू शकते.
तार्किक विचार करणार्‍या व्यक्ती साहजिकच आश्चर्य प्रकट करतील की केवळ मंत्रांचा उच्चार करून काय होणार आहे. मंत्रांमधील सामर्थ्य , शक्तीचा उपयोग करून शिवलिंगाला वेगवेगळे रंग आणता येतात असा उल्लेख शिवसंहितेमध्ये आढळतो. मंत्रोच्चरामुळे निर्माण होणाऱ्या कंपनांनी आणि
होम हवनातील धुरामुळे वातावरणातील अनेक जीवाणू, विषाणू मारतात हे निदर्शनास आले आहे. कर्पूरारती करण्यामागे हेच कारण आहे.
शक्तीप्रदान करणारे मंत्र हे दुसरे तिसरे काहीही नसून निसर्गातील ऊर्जेचे स्रोत असणारी ध्वनिकंपने आहेत. त्याला धार्मिक लेबल लावून कोणत्याही एका धर्मासाठी राखीव
अशी ती ठेवू नयेत. मंत्रोच्चार करून सर्व जाती धर्माच्या मनुष्यांनी याचा लाभ घ्यावा असे माझे वैयक्तिक मत आहे.

समाप्त.🙏🏽
@Hindu_M15 @Pappuji_Speaks @bakshispeaks @raje35202418 @TheDarkLorrd @Kedaar_Speaks
You can follow @Shraddha_Speaks.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.