प्रश्न - खरंच खासगीकरण केलं जातंय का?

उत्तर - नाही!

👇
प्रश्न - मग सरकार आपला हक्क त्यागतंय तर ह्याला काय म्हणाल?

उत्तर - ह्याला निर्गुणतावणूकीकरण किंवा डिसीनव्हेस्टमेंट असं म्हणतात.

👇
प्रश्न - ह्यात दोघात फरक काय असतो?

उत्तर - जेव्हा खासगीकरण केलं जातं तेव्हा सरकार आपला १००% हिस्सा विकून टाकतं. त्या संस्थेवर सरकारचा कुठल्याही प्रकारे ताबा/हक्क नसतो. एखाद्या गोष्टीला प्रायव्हेट म्हणायला ती मोजक्या चार चौघांच्या मालकीची असायला लागते.

उदा . सिरम इन्स्टिट्यूट
👇
तेच जेव्हा निर्गुणतावणूक केली जाते तेव्हा जेवढा हिस्सा जो कंपनी कायद्याप्रमाणे संस्थेवर आपलं नियंत्रण ठेवण्यासाठी गरजेचं आहे सोडून गरज भासल्यास इतरांना विकला जातो. मालक सरकारचं राहतं.

सरकारची तेवढ्या हिस्सापूर्तीची गुंतवणूक ही मोकळी होते आणि त्या बदल्यात बाजारभावाप्रमाणे
👇
त्या हिष्याचा मोबदला ही मिळतो. भांडवल गुंतून राहत नाही.

👇
प्रश्न - ह्याला आजून काय म्हणता येईल? इथे फक्त बड्या लोकांनीच हा हिस्सा विकत घेतला तर?

उत्तर - ह्याला मुळात प्रायव्हेटायझेशन न म्हणता 'गोइंग पब्लिक' हा योग्य शब्द आहे! जी संस्था फक्त आणि फक्त सरकारी मालकीची होती आता निर्गुणतावणूकीमुळे त्याचे समभाग घेऊन तुम्ही आम्ही👇
एखादा शेतकरीही ह्या कंपनीचा हिस्सेदार होऊ शकतो. मुळात शेयर मार्केटवर समभाग विकायचे झाल्यास काही ठराविक अटी शर्ती असतात आणि सर्व काही संगणकिय प्रणाली द्वारे केलं जातं त्यामुळे काही ठराविक लोकांनाच ह्याचा फायदा होईल हा समज चुकीचा!

👇
सहज एक उदाहरण -

माझा हॉटेल व्यवसाय असेल. जेवणाची चव, मौक्याची जागा, वस्ती, हॉटेलमधील सेवा इत्यादी गोष्टींमुळे हॉटेल सगळीकडे प्रसिद्ध आहे. पण माझं असं लक्षात येत की किचनमध्ये लक्ष देणं, काउंटर पाहणं इत्यादी गोष्टींसहित हॉटेलच्या बाहेर जागा मोकळी आहे. हा वेळ आणि मेहनत दुसरीकडे👇
गुंतवणून मी ह्या पेक्षा अधिक कमवू शकतो. ह्या साठी मी एक शक्कल लढवतो. किचनसाठी एक खास कूक, काउंटरसाठी एक मॅनेजर आणि मोकळ्या जागेत एक ज्यूसवाला ठेवतो. होणाऱ्या नफ्यात माझा हिस्सा ९०%, कुकचा ५%, मॅनेजर ४% आणि ज्युसवाला १% असे हिस्सेदार होतो

👇
माझ्या गुडविल आणि ऑलरेडी सेट असलेल्या बिजनेसचा त्या तिघांनाही फायदा होईल हे जाणून ते गुंतवणूक करतात. माझा वेळ मोकळा होतो तो इतरत्र गुंतवुन मी १५% जास्तीचे कामावतोय. कुकला आधी २०००० पगार मिळायचा आता सगळे खर्च जाऊन तो ४०००० कामावतोय बाकी दोघांचंही तसंच. सगळीकडे 👇
स्पेशलायझेशन आणि क्रॉस चेक आल्यामुळें तसेच रिकाम्याजागेचा उपयोग झाल्यामुळे आता बिझनेसची प्रसिद्धी अजून वाढली आणि त्या बरोबर त्याचं बाजारातलं वजन देखील. बर इथे जास्त गुंतवणूक माझी असल्यामुळे अजूनही माझ्या परवानगी शिवाय कुणी एक जण आपला वैयक्तिक फायदा करेल👇
किंवा सगळं विकून मोकळा होईल असं नाही.

१००% पैकी १०% हिस्सा विकून मी दुसरीकडे १५% पैसे कमवून स्वतःचा ५% फायदा करतोच आहे सोबत ९०% हिस्सा ठेवून मालकी हक्क ही कायम आहे!

हे थोडं भागीदारी संस्थेसारखं झालं पण जेव्हा ह्या सरकारी कंपनीमध्ये निर्गुणतावणूक होईल त्याचा गाभा हाच असेल.🙏
You can follow @ABHIca92.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.