गांधी कोणाच्या श्रध्देचा विषय बनले नाहीत हीच त्यांना लाभलेली अमूल्य देणं आहे, जी दुर्दैवाने इतरांना लाभली नाही. हिंदुत्ववादी त्यांना अल्पसंख्याकांप्रती असलेल्या श्रद्धेमुळे कॅन्सल करतात, आंबेडकरवादी त्यांच्या धर्मामुळे कॅन्सल करतात तर मार्क्सवादी वर्ग संघर्ष न मानल्यामुळे
कॅन्सल करतात. व्यक्तींच्या विचारांशी कितीही असहमती असली तरी तिला कॅन्सल करणे हा पर्यायच होऊ शकत नाही, अपवाद वगळता. (वैयक्तिकरीत्या गांधीच्या जात अन् वर्णव्यवस्थे बद्दलच्या मतांशी तीव्र असहमती आहे.)

काल्पनिक जगात जगणारा गांधी म्हणून त्याची खिल्ली उडवली जाते. हडकुळ्या तत्वज्ञानीने
ज्ञान देण्याशिवाय काय केलं? असा प्रतिप्रश्न केला जातो. असो.

स्वतःची एक स्वतंत्र विचारधारा निर्माण करणे ही सोपी गोष्ट नसते त्यासाठी आधी स्वतःला त्यात झोकून द्यावं लागतं. थेअरी अन् प्रॅक्टिस यामध्ये जमीन आस्मानाचा फरक असतो. गांधींनी तिला फक्त प्रत्यक्षात उतरवून दाखवलं नाही
तर तिला एक स्वतंत्र अस्तित्व प्राप्त करून दिलं. फक्त थेअरी म्हणून अस्तित्वात असलेली पॅसिफिझम गांधीयन फिलॉसॉफी नंतर पुन्हा एकदा जगभर मेनस्ट्रीम बनली. गांधींचा पॅसिफिझम हा थेअरीशी विसंगती दाखवत असला तरी एक पायरी पुढे जाऊन अहिंसेचे बीजारोपण करते.

गांधींच्या तत्वज्ञानाची समीक्षा
करताना सर्वसाधारणपणे विचारले जाते की लिबरल ब्रिटिशांच्या राजवटीत गांधीयन फिलॉसॉफी चालून गेली ती हिटलरच्या क्रूरतेपुढे टिकली असती का?

गांधीयन फिलॉसॉफीला फक्त आणि फक्त अहिंसेपुरती मर्यादीत करणे यालाच म्हणतात. जर-तरच्या प्रश्नांवर उत्तरे कालांतराने मिळत गेलीच.
चेकोस्लावाकीया मधील जनतेने अहिंसेच्या मार्गाने आक्रमक सोव्हिएत सैन्याला गुडघे टेकवण्यास भाग पाडले होतेच की. वेलवेट रिव्हाल्यूशन वगैरे सगळं प्रतिकात्मक असलं तरी फासीवादी शक्तींच्या/ हिंसक शक्तींच्या राजवटीत गांधीयन फिलॉसॉफी टिकू शकत नाही या हायपॉथेटिकल प्रश्नांची उत्तरे देतेच.
असो. गांधीयन फिलॉसॉफी ही भांडवलशाही सोबत कम्युनिझमलाही आव्हान देते पण दुर्दैवाने यावर आम्हा भारतीयांच कधी लक्षच गेलं नाही. आत्मनिर्भर भारताची स्वप्ने आत्मनिर्भर गावांमधूनच जात असल्याचे गांधीयन फिलॉसॉफी मधून सिध्द होतेच. काल्पनिक स्वयं नियंत्रण पुस्तकी वाटतं असलं तरी ती इतकही
हास्यास्पद नव्हती. युटोपियन कम्युनिझमला गांधीचा विरोध असला तरी मार्क्सवादी निराज्यवाद संकल्पनेला काही अंशांनी स्विकारलही होतं. भांडवलशाहीला त्यांचा तीव्र विरोध असला तरी आधुनिकीकरणाला शंभर टक्के विरोध होता हे तितकं सत्यही नाही. जोपर्यंत गावांच्या स्वयंनिर्भरतेला आव्हान मिळत नाही
तोपर्यंत ते स्विकारण्याची त्यांची तयारी होती. जवळपास प्रत्येक विचारधारा ही थेअरी पर्यंतच मर्यादीत राहते मात्र गांधीयन फिलॉसॉफी ही एकमात्र विचारधारा असेल जी वैयक्तिक पातळीवरील बदलातून एका संपन्न, स्वतंत्र अराज्यवादी व्यवस्थेकडे जाण्याचे प्रात्यक्षिक मार्गही दाखवते.
गांधीबाबत अनेक तक्रारी आहेत, असंख्य वाद आहेत मात्र त्यांची जगभरात उमटणारी छाप निर्विवादित आहे.

गांधींच्या तत्वज्ञानाच्या विरोधात असणाऱ्या मंडळींनीही याला रिकगनाईज केलेच. टिळकांनी तर एक पाऊल पुढे जाऊन गांधींच्या पुस्तकाची प्रस्तावनाही लिहली. आंबेडकरांचा गांधींना कितीही कडवा विरोध
असला तरी तो फक्त वैचारिक पातळीवरच सीमीत होता.

नॉर्वेयिन फिलॉसॉफर आर्ने नईस ज्याने डिप इकॉलॉजिची थेअरी मांडली तो म्हणतो, "I realised, The essential oneness of life from Gandhiji" त्याशिवाय त्याच्या थेअरीला महत्त्वही नाहीये.
गांधीच्या शरीराला मारणं सोपं असतं पण गांधीयन फिलॉसॉफी नेहमी लोकांच्या मनात टिकून राहतेच.

आवडणार्‍या गोष्टी घ्यायच्या न आवडणार्‍या विचारांविरूध्द बोलायचं इतकं सोपं आहे, गांधीला ओळखणे. ❤

_____________
You can follow @prathameshpurud.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.