गांधींचे सामर्थ्य कशात होते?
गांधी भारत सरकारचे मंत्री नव्हते. प्रधानमंत्रीही नव्हते. सेनापतीही नव्हते. दंगली बंद करा, नसता मार्शल लॉ पुकारू, दिसेल त्याला गोळी घालू, शस्त्रबळाने शांतता निर्माण करू, ही त्यांची प्रतिज्ञा नव्हती. ही प्रतिज्ञा करण्याच्या कोणत्याही अधिकारात ते नव्हते

गांधींनी स्वतः शस्त्र वापरले नाही. शस्त्रबळावर शांतता निर्माण करा असा आग्रह धरला नाही. ... शस्त्र हे त्यांचे सामर्थ्य नव्हतेच ! त्यांच्या विरोधी जाणाऱ्या भारत सरकारला किंवा जनतेतील हिंसेच्या प्रवृत्तीला आवर घालण्याची गांधींजवळ एकच शक्ती होती. ती शक्ती म्हणजे उपोषण !
भारताचे मंत्रिमंडळ जर असे म्हणाले असते की, ठीक आहे, तुम्ही उपोषण करा. आमचे निर्णय ठरले आहेत तर हा माणूस उपोषण करीत मरून गेला असता ! जतींद्रनाथ, टेरेन्स मॅकस्वीनी उपोषण करताना असेच मेले नाहीत काय? गांधीही असाच बसल्या जागी संपला असता. त्याला मारण्यासाठी गोळीची गरजच नव्हती.
कलकत्त्यातील जनता जर म्हणाली असती की, तुम्ही उपोषण करीत मरा, आम्ही दंगली करणार, तर गांधीजी काय करणार होते? पोलिसांची पाशवी शक्ती कलकत्ता शांत करण्यात विफल झाली होती. तरीही गांधीजींचे उपोषण हे एक सामर्थ्य होते. त्यांच्यावरील प्रेमामुळे, श्रद्धेमुळे लोक हवालदिल होते. जनतेचे प्रेम,
श्रद्धा इतकेच ज्याचे एकमेव भांडवल, आत्मक्लेश हेच एकमेव हत्यार त्याची समाप्ती गोळीने करणारे हुतात्मे ठरू शकत नाहीत! जनतेचे सरकारसुद्धा ज्याच्यासमोर नमते, पिसाट सुटलेला क्रोधही ज्याच्यासमोर शरण जातो, असा गांधी हा भारताच्या उदात्त सद्सद्विवेकबुद्धीचा प्रतिनिधी होता.
- नरहर कुरुंदकर
- नरहर कुरुंदकर