आमचे येथे श्रीकृपेकरून २०१४ साली पहिल्यांदा पेस्ट कंट्रोलवाला बोलवला..! आमच्या कडची मंडळी त्या आधीची दहा बारा वर्षं त्रासलेली असल्या कारणाने त्यांना ताबडतोब सुटका हवी होती.. कीड जुनी आहे त्यामुळे वेळ लागणार हे ही मंडळी विसरली.. पेस्ट कंट्रोलवाल्यावर अविश्वास दाखवण्यापासून त्याला
शिव्यांची लाखोली वाहण्यापर्यंत मंडळींची मजल गेली.. पण त्याने औषध टाकले होते.. त्याचा परिणाम म्हणून काही वळवळणारे जीव बाहेर पडून तडफडून मरताना बघितले.. पण तेवढ्याने मंडळींचे समाधान होईना.. परिणामांची वाट बघत बसणे एवढाच कार्यक्रम शिल्लक राहीला असं वाटतानाच २०१६ मधे एके रात्री ८ वा.
येऊन दुसरं औषध टाकून गेला.. आधीचं वेगळं आहे आणि हे वेगळं आहे म्हणाला. आम्ही पुन्हा माना डोलवल्या.. काही दिवसांतच पु्हा काही किडे तडफडत बाहेर आले.. काही अर्धमेले झाले.. काही मरून गेले.. तरीपण घरच्या मंडळींचे समाधान होईना.. पेस्टकंट्रोलवाला बदलूया असं काही किरकिरी मंडळी बोलू लागली.
दिल्लीचा एक मामा, कोलकात्याची आत्या, बारामतीचे आजोबा त्यात आघाडीवर होते. पण एरव्ही फार काही न बोलणाऱ्या घरातल्या छुप्या मेजॉरिटीने पुन्हा त्याच पेस्टकंट्रोलवाल्याला एक्सटेन्शन दिलं..!
२०१९ मधे त्याने वरच्या मजल्यापासून नव्याने सुरूवात केली.. वरच्या खोल्यांमधे A370 आणि 35A नावाची
औषधं फवारली.. वरचा मजला साफ झाला.. पण ते सगळे किडे खाली माजघरात आले.. उत्तरेकडे असलेल्या देवघरातही अगदी देव्हाऱ्याखालीच बऱ्याच वर्षांपासून कीड होती ती काढली.. अगदी कालच्या प्रजासत्ताक दिनीपण फवारणी केल्यावर लपून बसलेले अत्यंत डेंजरस किडे जाम वळवळ करत बाहेर आले.. त्यामुळे
पेस्टकंट्रोलवाला चांगला आहे याबद्दल मंडळींची खात्री पटलीये.. पण 'कीड नुसती बाहेर काढून उपयोग नाही, मारून-ठेचून बाहेर फेकून दिली तर खरा पेस्टकंट्रोलवाला..!' ही नवी कुरकुर सुरू झालीये..

मंडळींची ही मागणी कानावर आल्यावर आम्हाला शंकरापुढचा नंदी आठवला.. वाट बघणारा.. आता आपण 'नंदी'
व्हायचं की नुसतंच 'बैल' रहायचं हा प्रत्येकाचा संविधानिक अधिकार आहे..!

©️केदार अ. दिवेकर, पुणें.
You can follow @jayant_rokade.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.