"ह्या दोघांवर माझा अफाट विश्वास आहे."
ह्या दोघांवर माझा अफाट विश्वास आहे. ह्या दोघांकडे बघून माझ्यातील कणखरपणा जागा होतो. त्यांनी त्यांच्या आयुष्यात जे सहन केल, जे भोगलं ती काही सर्वसाधारण गोष्ट नाही. @narendramodi जी, @AmitShah जी, @BJP4India
२. संकटाला मात कसं करायचं.? काय केलं तर ह्या सर्वांवर आपण नियंत्रण मिळवू शकू.? हे सर्व यांच्याकडून शिकण्यासारख आहे. नुसतं संयम नाही तर विजयी मार्ग देखील शोधलं पाहीजे.
३. ३ वर्षा पूर्वी माझा कठीण काळ चालू होता, असेच नौकरी व्यवसायात कट कारस्थाने सतत चालू होते. माझे हितचिंतक मला नेहमी सांगायच तू शांत का आहेस.? काही बोलत का नाही.? तुझया मागे हात धुवून लागले आहेत, काही खोटं खोटं सांगून तुझा डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयन्त करत आहेत.
४. आणि तू त्यांना काहीच बोलत नाही माहिती असूनही.? आपलं प्रभावशाली होणं अनेकांना पचत नाही, त्यामुळं प्रभावहीन कसं करायचं हे आपल्या शत्रूंच उद्देश्श असतो.
५. माझं असं शांत वागणं बघून, माझे हितचिंतक मला शिव्या देयचे, तू का घाबरतो त्याला.? का बोलत नाही त्याला.? तुझ्याबद्दल वरिष्ठांना खोटं सांगून, मी असं करतो, प्रकाश ने चूकिच केलं आहे.? हे माझे होते. मला सगळं सांगत असायचे. त्यांना त्रास होयच माझ्याबद्दल खोटं सांगितलेलं.
६. पण, जी व्यक्ती माझ्याबद्दल वरिष्टना सांगायची, त्या व्यक्तीला मी आजही एका शब्दाने बोलल नाही. तू असं का सांगितलं म्हणून. पण मला सगळं माहिती होत, हा काय करतो ते.
७. मी, माझ्या हितचिंतकाना सांगायच त्याला काय करायचं ते करू दे मी योग्य वेळी करेन काय करायचं ते ज्या वरीष्ठना माझ्याबद्दल सांगत आहे त्यांनी मला एका शब्दाने विचारलं नाही. याला काय म्हणून भाव देऊ? तो स्वतःला एक्सपोज करत आहे. काही दिवसाने तो स्वतः जाईल निघून नाही गेला तर हाकलून देतील
८. त्या सर्व दिवसांत त्याला गाफील ठेवून त्याची सर्व कुंडली काढली. आणि जिथे दाखवायचे तिथं दाखवून दिलं. विषय तिथेच संपवला. मी काहीच केलं नाही, त्याने जे केला त्याची शिक्षा त्याला मिळाली.
९. असो, काल दिवसभर टीव्ही बघत होतो, जे काही चाललं होतं, मनात तीव्र संताप येत होता. काही करू शकत नाही ही हतबलता होतीच. पण, एक गोष्टीचं समाधान वाटतं की, एक एक एक्सपोज होत होते, आणि त्यांचं खरं रूप समोर आणत होते.
१०. हे सगळं होताना अजिबात मनाला वाटलं नाही कि, सरकार यांच्यावर कडक कार्यवाही करावी. कारण कीड हटवण्यासाठी ती कीड कशाने नियंत्रणात आणता येईल याचा अभ्यास करने गरजचे असतो.
११. भक्तांनी म्हटलं, अमित शहा काय करत आहेत? आम्ही बहुमतांनी निवडून दिल ते यासाठीच का? काही भक्तांनी नेलभट गृहमंत्री अशी पोस्ट केली. मी बऱ्याच जणांना सांगण्याचा प्रयन्त केला काहींना पटलं पण जे भावनिक भक्त आहेत त्यांना हे पटत नाही. त्याचबरोबर कायद्याबद्दल देखील थोडसं अनभिज्ञ आहेत.
१२. अर्णव प्रकरणात देखील हेच केलेलं. त्यावेळी देखील अशीच पोस्ट लिहली. भावनिक होऊन चालतं नसतं, कठोर व्हा!
१३. बहुमताचा सरकार आहे, त्यांना वाटलं तर शरद पवार साहेबांच्या सरकार सारख गोळीबार करून मुडदे पाडले असते. पण तसं नाही केलं. जर तस केलं असतं उद्या यांना शेतकऱ्याचं खुनी, भलं ही ते शेतकरी नसले तरीही. मग सहानभूती, प्रत्येक क्षणाला खुनी मोदी, खुनी अमित शहा. असे बोंबलत राहिले असते.
१४. त्यांच्यावर आंदोलन दडपुन टाकता आलं असत, पण कोर्टाने हस्तक्षेप केला, आंदोलन करण्याचा अधिकार आहे तो नाही हिरावून घेऊ शकत.
१५. केंद्र सरकार सुरवातीपासून सांगत आहे की, हे शेतकरी नाहीत, मी स्वतः देखील सांगितलं होतं अनेकदा पोस्ट करून की हे शेतकरी नाहीत, खालीस्थानी फुटीरतावाद्याचा हा डाव आहे. पण हे सिद्ध करू शकत नव्हतो.
१६. त्यांना परवानगी सर्व अटी शर्थी घालून देण्यात आलेली. त्या अटी त्यांनी मान्य देखील केल्या. पण खरे शेतकरी असते तर शांततेत आंदोलन करून घरी गेले असते. यांना जे करायचं होतं ते केलं आणि एक्सपोज झाले स्वतःहून. मग सरकारला देखील स्ट्रिकली अकॅशन घेयला भाग पाडले.
१७. आज ९ मास्टर माईंड लोकांनावर गुन्हे दाखल झालेत, योगेंद्र यादव सहित. आंदोलनातून माघार घेतली, पण आता वेळ निघून गेली. कायदा सोडणार नाही. पुरेपूर वसूली होईल. काहीजण म्हणतात अटक का केलं नाही.? हे भुरटे चोर नाहीत, की लगेच मुद्देमाल गोळा केला आणि अटक केलं.
१८. हे असे गुन्हेगार आहेत की, समाजात फूट पाडून देश तोडण्याचा प्रयन्त केले दंगली घडवून देशात अस्थिरता माजवण्याचा प्रयन्त केले. याना सरळ अटक करून आत टाकलं तर लगेच बेल ही मिळून घेतील. यांचा मुक्काम कसा दीर्घकाळ तुरंगात असेल याची जबाबदारी घेऊनच अटक करतील. जसे की शाहीन बाग मध्ये झालं.
१९. बऱ्याच मित्रांना वाटतं की, शाहीन बाग मध्ये सरकारने दंगलखोरांना सोडून दिलं, कदाचित त्यांना याबद्दल माहिती नसेल. तर मी माहिती देतो.
२०. शाहीन बाग मध्ये दिल्ली पोलिसांनी १५ जणांविरुद्ध १७ हजार पानांची चार्जशिट दाखल केली आहे. वरील सर्व मास्टर माईंड आहेत. हे असे मास्टर माईंड आहेत की, दंगल जर त्यांच्या घरापर्यंत आली तर काळजी कशी घेयची इथपर्यंत त्यांच्या घरातील महिलांना सांगितलं होत.
२१. त्या मास्टर माईंड ची नावे पुढीलप्रमाणे आहेत. व हे सर्व तुरुंगात आहेत.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा (जेएनयू) माजी विद्यार्थी नेता उमर खालिद आणि आम आदमी पार्टीचा निलंबित नगरसेवक ताहिर हुसेन यांनी कट रचला होता होता.
२२. याचे प्रथम दर्शनी सबळ पुरावे असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. सरजिल इमाम जेएनयू , सफूरा झारगर,गुलफिश खातून, देवांगना कलीता, शेफाऊर रेहमान,असिफ इकबाल, नताशा नरवाल,अब्दुल खालिद साफे, इशरत जहाँ,मिरान हैदर,शदाब अहमद,तस्लिम अहमद, सलीम मलिक, महोमद सलिम खान आणि अखतर खान.
२३. हे १५ मुख्य सूत्रधार दिल्ली दंगलीचे. आज च्या तारखेला हे सर्वजण तुरुंगात आहेत. यांना जमानात देखील मिळणार नाही, कारण याना UAPA अंतर्गत कार्यवाही केली आहे.
२४. हे सर्व असचं नाही घडलेलं आहे. सरकार सक्षम आहे, योग्यवेळी योग्य कर्यावही करणार. ह्या दंगलीनंतर CAA वर कधीही आंदोलन झालं नाही. आंदोलन कर्ते आज तुरुंगात आहेत.
२५. त्यासाठी सर्वांना पुन्हा सांगतो, भावनिक होऊ नका "ते" दोघे खम्बीर आहेत. स्वतःवर विश्वास ठेवा,ज्यांनी कश्मीर मध्ये तिरंगा फडकवला, तिरंगा रॅली निघू लागली फक्त त्यांच्यामुळे. हे सर्व करताना तुम्ही मतदानाच्या रूपाने दिलेली ताकद त्यांना बळ देते. विश्वास ढळू देऊ नका.

- प्रकाश गाडे
You can follow @PrakashGade13.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.