बऱ्याच वर्षांपासून आपण आयात केलेली डाळ खात होतो. २०१६ नंतर मोदींनी देशांतर्गत डाळ उत्पादन वाढीसाठी पावले उचलून हळूहळू डाळीची आयात कमी करायला सुरुवात केली आणि आता ती जवळजवळ पूर्णपणे थांबलेली आहे.

२००५ मध्ये मनमोहनसिंगांनी सर्व प्रकारच्या डाळींवरील अनुदान बंद केले आणि हॉलंड-
ऑस्ट्रेलिया, कॅनडा इत्यादी देशांशी तडजोड करुन डाळींची आयात सुरू केली. कॅनडामधे डाळींची प्रचंड मोठ्या प्रमाणावर लागवड सुरू झाली जी तेथील खलिस्तानवादी पंजाबी शीख समुदायाच्या ताब्यात देण्यात आली. या डाळीची मोठ्या प्रमाणात भारताला निर्यात सुरू झाली.
भारतातील हजारो कोटींच्या घरातील मोठ्या आयातदारांमध्ये कमलनाथांसारखे सोनिया गांधींचे विश्वासू दिग्गज व बादलांसारखी राज्यस्तरीय प्रायव्हेट लिमिटेड राजकारणी घराणी होती.

मोदींनी ही हजारो कोटी रूपयांची डाळ आयात बंद केल्यावर डाळ आयातीची दुकाने बंद झालेले विरोधक सैरभैर झाले कारण
त्यांची कॅनडातील शेते ओसाड पडायला लागली. हजारो खलिस्तानवाद्यांच्या नोकऱ्या जाऊ लागल्या. कॅनडाची निर्यातही कमी झाली आणि म्हणूनच जस्टीन ट्रूडोंनी शेतकरी आंदोलनाला उघड पाठिंबा दर्शविला. कॅनडा सरकारने मोदींवर दबाव टाकण्यासाठी भारताला धमकीही दिली की डाळीची आयात पुन्हा सुरू केली नाही-
तर कॅनडातील खालिस्तानी शीखांना पुन्हा पंजाबमध्ये पाठवण्यात येईल.

तसंही खलिस्तान ही कॉंग्रेसवाल्यांनीच देशाला दिलेली भेट आहे. भारतविरोधी विदेशी शक्त्या आणि खलिस्तानी शीखांचाच कृषी कायद्यांना याकारणासाठी सर्वाधिक विरोध आहे.

आता भारताचा शेतकरी श्रीमंत होऊन भारत अन्नधान्य-
निर्मितीत स्वयंपूर्ण झाला तर त्याचा प्रचंड आर्थिक फटका आणि मानसिक त्रास या प्रस्थापित राजकारणी दुकानदारांना होणारंच ना.

मोदीजींनी भारताचा विकास करण्याचा संकल्प केलेला आहे आणि लोकही त्याला उत्स्फुर्त पाठिंबा देत आहेत, लवकरच भारताची आर्थिक परिस्थिती जगात सर्वोत्तम होईल कारण ज्या-
देशाला बाहेरून अन्न विकत घ्यावे लागत नाही, त्याला तो पैसा समाजोपयोगी कामांकरता वापरता येऊन विकास सहाजिकंच जास्त गतीने होतो.

अदानी आणि अंबानी यांनी जे काही व्यवसाय सुरू केले त्यातील देशातली आधीची लुटमार करणारी प्रस्थापित मक्तेदारी दूर करून चढे भाव कमी केले नफाही कमावला आणि सर्वात
जास्त फायदा भारतीय ग्राहकांचाच करून दिलेला आहे. जरा आठवून तर बघा की पुर्वी प्रत्येक गोष्टीत जनतेची किती लूटमार केली जायची ते...
उदाहरण: - जिओ बाजारात आलेली नसताना आपले मोबाईल व इंटरनेटचे बिल तुटपुंज्या वापराकरताही किती जास्त यायचे ? वर्षानुवर्षे किती लूटमार केली गेली ...
पण जिओ आल्यानंतर आता प्रत्येक कंपनीला किंमत कमी करण्यास भाग पाडले जात आहे.

जर अदानी अ‍ॅग्रो प्रगती करत असेल तरच ठरवून विरोध का होत आहे… जेव्हा पेप्सीको, वॉलमार्ट, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयटीसी सारख्या अनेक परदेशी कंपन्यांनी आपल्या देशात पंजाब, हरियाणा आणि महाराष्ट्रात-
मोठमोठी गोदाम उभारली तेव्हा कोणीही विरोध केला नव्हता आताही करत नाहीत… मग फक्त अदानींनाच आता विरोध का ???

रिलायन्स रिटेल, रिलायन्स डिजिटल आता देशभर शहराशहरात पोहोचत आहेत, त्यामुळे अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टला स्पर्धा निर्माण झाल्याने त्रास होणे स्वाभाविकच आहे..
स्वदेशी पतंजलीच्या आगमनानंतर हिंदुस्तान युनिलिव्हर (कोलगेट, लक्स, पॉन्ड्स) यांची एकछत्री मक्तेदारी संपली, मग त्यांना त्रास होणारंच होता..

चीनची भारतात तसेच जगात 5G तंत्रज्ञान महागात विकण्यासाठी धडपडत चाललेली आहे, त्यामुळे त्याला जिओच्या संपूर्ण स्वदेशी अशा 5G तंत्रज्ञानाचा-
त्रास होणारंच ना…

अदानी पोर्ट आणि अदानी एंटरप्राइझमुळे अनेक भाजपाविरोधकांची प्रस्थापित मक्तेदारी थांबलेली आहे. आता जर आपल्याच देशातील उद्योगपती पुढे जात आहेत आणि देशाचा व जनतेचाही फायदा करून देत आहेत तर देशातीलच काही लोक असं होईल तसं होईलच्या खोट्या वावड्या उठवून लोकांमधे भिती-
निर्माण करून फक्त यांचाच विरोध का करीत आहेत?

खरंतर अदानी, अंबानी किंवा पतंजली त्यांच्याच वस्तू विकत घ्या म्हणून जनतेवर कोणत्याही प्रकारची कसलीच जबरदस्ती करत नाहीयेत. जनता त्यांना हव्या त्या ब्रॅन्डच्या वस्तू मनमर्जीने विकत घेण्यास मोकळी आहे..
आता शेतकरी कायदे आल्यानंतरच पंजाबमधील प्रस्थापित व्यापार्यांच्या खिशातील शेतकरी नेते अदानी अंबानी विरोधात उघडपणे का बाहेर आले आहेत ?? अदानी आज गोडाऊन तयार करत आहेत उद्या जमीन बळकावतील वगैरे खोट्या वावड्या का उठवत आहेत ??

अनेक भारतीय आणि विदेशी कंपन्यांची गोदामे अनेक वर्षांपासून
पंजाबमध्ये उभी आहेतच ना, पण आता अदानीची गोडाउन उभी झाल्यावर मात्र भिती दाखवली जात आहे की साठेबाजी होऊन किंमती वाढतील..

वास्तविकता ही आहे की आजपर्यंत वर्षानुवर्षे कोट्यवधी टन धान्य, भाज्या आणि फळे अक्षरशः सडवून मद्यनिर्मिती खत निर्मिती वगैरेंसाठी मातीमोल किमतीत राजकारण्यांच्या
कंपन्यांनाच विकली जायची. पण आता हे सर्व गोरखधंदे बंद होणार आहेत कारण अदानींच्या अत्याधुनिक गोडाऊनमध्ये सर्व शेतमालाची व्यवस्थित साठवण आणि वितरण होऊ शकेल. दलालांची ही व्यथा आहे की आता महागाई नियंत्रणात येईल आणि कमीशनखोरीची मलई मिळणे थांबेल.

महागाई वर्षानुवर्षे वाढतच गेलेली आहे,
मग आताच अफवा का पसरवल्या जात आहेत ?? कारण बरेच परदेशी एजंट अदानी-अंबानी मुळे त्रस्त झालेले आहेत आणि बरेचसे भोळसट लोक प्रस्थापित राजकारणी घराण्यांची वर्षानुवर्षे चाललेली संघटीत दरोडेखोरी समजून न घेता केवळ आणि केवळ मोदींच्या विरोधाकरता या अफवा पसरवत आहेत आणि त्यांच्याबरोबर
स्वतःसकट सर्वांच्या पायावर धोंडा पाडून घेत आहेत..
You can follow @ShriRajTripute_.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.