भारताला शेतकरी आंदोलनाचा फार मोठा इतिहास आहे. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, स्वामी साहजानंद सरस्वती, प्रोफ. एन जी रंगा, सर छोटूराम, चौधरी चरणसिंग, महेंद्रसिंग टिकैत अशा अनेक दिग्गजांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी आंदोलन केलेले आहे.

इंग्रजांपासून ते तत्कालीन काँग्रेस सरकारपर्यंत जेव्हा जेव्हा शेतकरी आंदोलने झाले तेव्हा सरकार शेतकऱ्यांसमोर झुकले, पण कधी आंदोलक शेतकऱ्यांना खलिस्तानी अतिरेकी, लाल बावटे, देशद्रोही, विरोधी पक्षाने प्रेरित ठरवण्याचा प्रयत्न झाला नाही.
१९८७ साली केंद्रात काँग्रेसचे/राजीव गांधी
१९८७ साली केंद्रात काँग्रेसचे/राजीव गांधी

यांचे बहुमताचे सरकार होते तर उत्तरप्रदेशात काँग्रेस नेते वीरबहादूर सिंग मुख्यमंत्री होते. पश्चिम उत्तरप्रदेशातील मुजफ्फरनगर मधील कर्नूकखेडी गावात शेतीला वीज मिळण्याबाबत काहीतरी समस्या निर्माण झाली. त्याचवेळी विजेचे दर सुद्धा वाढवले गेले होते.

१ एप्रिल १९८७ ला शेतकरी नेते महेंद्रसिंग टिकैत यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी पोलीस आणि शेतकरी यांच्यात संघर्ष उद्भवला आणि यात २ शेतकरी मृत्युमुखी पडले. विरबहादूर सिंग सरकार शेतकऱ्यांपुढे नमले आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या.

Power Station दुरुस्त झाले, शेतकऱ्यांची विजेची समस्या सुटली सोबतच विजेचे दर सुद्धा कमी झाले.
जानेवारी-फेब्रुवारी १९८८ मध्ये शेतमालाच्या किमती ठरवण्यावरून महेंद्रसिंग टिकैत यांच्या नेतृत्वात शेतकरी पुन्हा एकदा आंदोलनात उतरले. हे आंदोलन जवळपास ४४ दिवस चालू होते.
जानेवारी-फेब्रुवारी १९८८ मध्ये शेतमालाच्या किमती ठरवण्यावरून महेंद्रसिंग टिकैत यांच्या नेतृत्वात शेतकरी पुन्हा एकदा आंदोलनात उतरले. हे आंदोलन जवळपास ४४ दिवस चालू होते.

काँग्रेसचे मुख्यमंत्री वीरबहादूर सिंग स्वतः आंदोलन स्थळी शेतकऱ्यांना भेटायला आले, त्यांच्याशी चर्चा केली आणि शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.
स्वतंत्र भारतातील सर्वात मोठे शेतकरी आंदोलन म्हणून ओळखले जाणारे आंदोलन २५ ऑक्टोबर १९८८ रोजी महेंद्रसिंग टिकैत यांच्या नेतृत्वात झाले.
स्वतंत्र भारतातील सर्वात मोठे शेतकरी आंदोलन म्हणून ओळखले जाणारे आंदोलन २५ ऑक्टोबर १९८८ रोजी महेंद्रसिंग टिकैत यांच्या नेतृत्वात झाले.

आपल्या ३५ मागण्या घेऊन शेतकऱ्यांचा विराट मोर्चा दिल्लीच्या बोट क्लब वर येऊन धडकला. लोणी बॉर्डरवर हा मोर्चा थांबवण्याचे प्रयत्न झाले, पोलिसांनी गोळीबार केला, यात २ शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला, पण मोर्चा थांबला नाही. दिल्लीच्या बोट क्लब वर ट्रॅक्टर, ट्रॉली आणि बैलगाड्या

यांची मोठी गर्दी झाली. या आंदोलनात १४ राज्यांतील जवळपास ५ लाख शेतकरी सहभागी झाले. शेतकरी नेत्यांनी राष्ट्रपतींसोबत चर्चा केली, लोकसभा अध्यक्षांसोबत चर्चा केली पण तोडगा निघाला नाही. ३० ऑक्टोबर १९८८ ला शेतकऱ्यांवर लाठीचार्ज झाला पण शेतकरी मागे हटले नाहीत.

३१ ऑक्टोबरला इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम बोट क्लब वर होणार होता पण शेतकरी मागे हटायला तयार नव्हते. कार्यक्रमाची जागा बदलण्यात आली. काँग्रेस सरकारमधील सर्वच मोठमोठे नेते आंदोलकांना भेटले आणि राजीव गांधी सरकारने शेतकऱ्यांसमोर नमते घेतले.

शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या गेल्या आणि हे आंदोलन शांत झाले.
ही शेतकरी आंदोलने काँग्रेसच्या विरोधात झाली, यामध्ये कोणत्याही काँग्रेस नेत्याने किंवा समर्थकाने शेतकऱ्यांना खलिस्तानी, अतिरेकी, लाल बावटे, भाजप समर्थक, संघी, देशद्रोही म्हणून हिनवले नाही.
ही शेतकरी आंदोलने काँग्रेसच्या विरोधात झाली, यामध्ये कोणत्याही काँग्रेस नेत्याने किंवा समर्थकाने शेतकऱ्यांना खलिस्तानी, अतिरेकी, लाल बावटे, भाजप समर्थक, संघी, देशद्रोही म्हणून हिनवले नाही.

काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत त्यांच्यासमोर झुकण्यात कमीपणा मानला नाही.आज शेतकरी आंदोलनाचा ६१वा दिवस असेल, मोदी सरकार हरप्रकारे हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहे पण शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून ३ शेती कायदे मागे घेत नाही. शेतकऱ्यांसमोर नमते घेणे सोडाच,

हे शेतकऱ्यांना देशद्रोही म्हणू लागले आहेत.हा सत्तेचा माज म्हणायचं की आणखी काही? ज्या जनतेने निवडून दिले,ज्या जनतेच्या राज्याचे तुम्ही पंतप्रधान आहात,ज्या जनतेच्या राज्याचे प्रधानसेवक म्हणून तुम्ही स्वतःला मिरवता त्या जनतेसमोर झुकण्यात पंतप्रधानांना कमीपणा का वाटावा?
#दिग्विजय_004
#दिग्विजय_004