धडा १७ वा :
भाग ३:आरोग्य विमा (health insurance)

ही माहिती लिहण्यात खूप वेळ आणि मेहनत लागते. कृपया शेवटपर्यंत वाचा आणि इतरांपर्यंत पोहचवा.

Disclaimer: मी विमा एजंट नाही😅. जाहिरात करत नाही.
फक्त आर्थिक साक्षरता आणि धोक्यांपासून वाचवण्यासाठी ही माहिती...😀

(१/२५)👇
भविष्यात जर तुमच्या परिवारात आरोग्याच्या अडचणी( जसे की शस्त्रक्रिया, हॉस्पिटल चे बिल्स) उद्भवल्या तर तुमची बचत ती गरज पूर्ण करू शकेल का ?
असा प्रसंग तुमची आयुष्यभराची बचत संपवून तर नाही टाकणार ना ?
यासाठीच हेल्थ इन्शुरन्स महत्वाचा!

(२/२५)👇
आरोग्य विमा पॉलिसी दरवर्षी काही प्रीमियम आकारून तुमच्यासाठी या सर्व खर्चाची काळजी घेते.

तसेच, हा प्रीमियम ठराविक नसू शकतो. जसे वय वाढेल तसा प्रीमियम ही वाढेल.

(३/२५)👇
आरोग्य विम्याचे प्रकार :
१)ज्येष्ठ नागरिक आरोग्य विमा: - याचा अर्थ आपल्या कुटुंबातील वृद्ध पालकांसाठी स्वतंत्र पॉलिसी खरेदी करणे. ज्यांचे वय 60-75 वर्षांच्या रेषेत आहे अशा व्यक्तींना हा विमा कव्हरेज देतो.

(४/२५)👇
२) फॅमिली फ्लोटर प्लॅन: - परिवारातल्या प्रत्येकासाठी वेगवेगळी पॉलिसी खरेदी करण्याऐवजी संपूर्ण कुटुंबाला एकाच प्रीमियमच्या पेमेंटवर कव्हर केले जाते.
सम अ‍ॅश्युअर्ड ही ' एकच ' असेल ज्यावर संपूर्ण कुटुंबाची जोखीम असेल.

(५/२५)👇
उदाहरण - जर आपण ८ लाखाची(sum assured) संपूर्ण कुटुंबासाठी पॉलिसी घेतली तर सर्व लोक मिळून ८ लाखापर्यंत दावा करू शकता ! जर समझा तुम्ही sum assured चा पूर्ण फायदा करून घेतला तर नवीन पॉलिसी घेण्यापेक्षा टॉप अप किंवा restoration benefit किंवा सुपर टॉप अप चा पर्याय काही...👇

(६/२५)👇
.....कंपन्या देतात ; त्याबद्दल तुम्ही विचार करू शकता.

महत्वाचे : आपल्या आई वडिलांचा विमा तुम्ही सर्वात आधी प्राधान्य देऊन केला पाहिजे ! कदाचित पहिल्या पगारातून वस्तू घेण्यापेक्षा त्यांना विम्याच कवच द्याल तर तुमचं कर्तव्य पूर्ण केलं असं समझा!

(७/२५ )👇
३)वैयक्तिक विमा ( individual policy )- म्हणजे व्यक्तीसाठी स्वतंत्र पॉलिसी. उदाहरणार्थ, आपण स्वतःसाठी पॉलिसी घेतल्यास आणि विमा रक्कम १० लाख असल्यास आपण भविष्यात जेव्हा रोगाचे निदान केले जाते तेव्हा आपण पूर्ण १० लाख पर्यंत दावा करु शकता.

(८/२५) 👇
४) Critical illness plan: यात पॉलिसी- धारकाला विमा कंपनी ने नमूद केलेल्या रोगांमधून एखाद्या रोगाचे निदान झाल्यास कव्हर दिले जाते. गंभीर रोग जसे की कर्करोग, मुख्य अवयव प्रत्यारोपण किंवा इतर रोग जे पॉलिसी डॉक्युमेंट्स मध्ये दिलेले असतात त्या रोगांमध्येच कंपनी चे कव्हर मिळते.
(९/२५)
५)वैयक्तिक अपघात पॉलिसी(Personal Accidental plan) जेव्हा एखाद्या व्यक्तीचा अपघात होतो तेव्हा विमा कंपनी त्या व्यक्तीस ठराविक रक्कम प्रदान करते.
तुमची पॉलिसी अर्धवट अपंगत्व, संपूर्ण अपंगत्व आणि अपघातामुळे मृत्यू या 3 घटनांमध्ये मदत करते का? हे पॉलिसी कागदपत्रांमध्ये पाहा.
(१०/२५)
आता आपण बघुयात की कव्हर किती ठेवावे ?
१) जर ५ लोकांचा परिवार असेल तर १० लाख पर्यंत तरी असावे.
२)वार्षिक उत्पन्न जेवढे आहे तितकेच किंवा दुप्पट कव्हर.
३)किंवा हॉस्पिटल मध्ये मोठी सर्जरी चा जितका खर्च येतो तितका.

(११/२५)👇
Preexitisting illness period :
आधीपासूनच विमाधारक जर कुठल्या मोठ्या आजाराने ग्रस्त असेल तर सुरुवातीचा काही काळ जसे की ३-४ वर्ष ते आजार health insurance policy मध्ये कव्हर होणार नाही!
३-४ वर्ष गेल्यावर जे आजार कव्हर झाले नव्हते ; .......👇

(१२/२५)👇
.....ते कव्हर व्हायला सुरुवात होऊ शकते.
हे सर्व तुमच्या डॉक्युमेंट्स मध्ये दिले असते पण सामान्य माणूस ते कधीही वाचत नाही आणि मग claim reject होतो!

Claim चे प्रकार : कॅशलेस आणि reimbursement.
कॅशलेस मध्ये विमा कंपनी नेटवर्क हॉस्पिटल ला पैसे direct जमा करते.

(१३/२५)👇
Reimbursement मध्ये आधी विमा धारक हॉस्पिटल चे बिल भरतो आणि नंतर ते पैसे विमा कंपनी विमा धारकाला परत करते.

Claim अमान्य होण्याची कारणे:
१) आरोग्याबाबत माहिती लपवणे.
२) पॉलिसी डॉक्युमेंट्स मध्ये कोणत्या गोष्टी health insurance मध्ये कव्हर नाही ; त्याबद्दल अज्ञान.

(१४/२५)👇
३) एका ठराविक काळाच्या आत जसे की २४ तासाच्या आत तुम्हाला विमा कंपनी कडे claim साठी मागणी करायची असते. ती वेळ नीट लक्षात ठेवा आणि पाळा.

(१५/२५)👇
महत्वाच्या गोष्टी ज्या विमा घेतांना पाहाल:
१) कॅशलेस सुविधा: यामध्ये जर आपण दाखल केलेल्या रूग्णालयाशी विमा कंपनी करार केला असेल तर रुग्णालय विमा कंपनीस थेट बिले पाठवेल आणि आपल्याला काहीही देण्याची गरज नाही.

(१६/२५)👇
परंतु, जर कॅशलेस सुविधा नसेल तर आधी तुम्हाला रुग्णालयाचे बिल भरावे लागेल आणि नंतर विमा कंपनी तुमचे पैसे परत देईल.

२)जवळचे चांगले रुग्णालय हे आपल्या विमा कंपनीशी संलग्न आहे का?...👇

(१७/२५)👇
....मला वाटते ह्या बद्दल मतांतर असू शकते कारण हॉस्पिटल ची सुविधा ही बघणे तितकेच महत्वाचे असते. म्हणून आपल्या विवेक बुध्दीने ते ठरवा.

३)हॉस्पिटल चा रूम रेंट कव्हर आहे का ? त्यात काही लिमिट तर नाही आहे ? त्यात विमा धारकास काही खर्च करावयाचा आहे का?...👇

(१८/२५)👇
....जसे की फक्त २% खर्च विमा कंपनी करेल ; बाकीचा खर्च विमा धारकाला करावा लागेल. ( हे पॉलिसी डॉक्युमेंट्स नीट वाचले की कळते )

(१९/२५)👇
४) Day Care: एक दिवसाची सर्जरी चे पैसे विमा कंपनी कडून तुमच्या पॉलिसी मध्ये मिळतात का ? जसे की appendix चे operation सकाळी admit होऊन संध्याकाळी घरी सोडल्यास....
कारण जर policy मध्ये २४ तासापेक्षा जास्त admit राहण्याची अट असल्यास तुमचा claim reject होऊ शकतो.

(२०/२५)👇
५) ICU charges मध्ये किंवा laboratory रिपोर्ट्स /x ray चा खर्च विमाधारकाला करायचा आहे की विमा कंपनी ला ?

(२१/२५)👇
पॉलिसी documents हातात आल्यावर, फ्री लूक पिरियड जो की १५ दिवसांचा असतो; त्यात तुम्ही डॉक्युमेंट्स चा अभ्यास करा.

एजंटने सांगितल्यानुसार आहे का नाही ?
नसेल, तर लगेचच कंपनी कडे complaint करा आणि complaint नंबर नोंद करून ठेवा.

(२२/२५)👇
ह्याच काळात तुम्हाला पॉलिसी रद्द करता येऊ शकते. रद्द केल्यास तुम्हाला मेडिकल चेक अप फी परत मिळणार नाही !

आता तुम्हाला एक मोलाचा सल्ला : जितके वय कमी तितका प्रीमियम कमी ! कारण हेल्थ इन्शुरन्स सहजासहजी मिळत नाही......👇

(२३/२५)👇
....आधी तुमचा health check up होतो.
तुमचा प्रीमियम हा तुमचे वय आणि तुम्हाला असणाऱ्या रोगांवर ठरतो!

कधीही विमा घ्यायचा आधी, पैसे भरायच्या आधी, Policy समजून घ्या,
नसेल कळत काही गोष्टी, तर एजंट ला 10 वेळा विचारा, पॉलिसी डॉक्युमेंट्स...👇👇

(२४/२५)👇
.... डॉक्युमेंट्स पडताळल्याशिवाय पॉलिसी विकत घेऊ नका ! स्वतः चा अभ्यास महत्त्वाचा !

तुम्हाला थ्रेड कसा वाटला नक्की कळवा. तुमच्याकडे अधिक काही माहिती असल्यास शेअर करा.

भाग १ : विमा 👇
https://twitter.com/marathibuffett/status/1343194125697339395?s=19

भाग २: टर्म इन्शुरन्स 👇 :
https://twitter.com/marathibuffett/status/1350846460993052674?s=19

(२५/२५)
You can follow @marathibuffett.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.