धागा.....

शेतकरी आंदोलन आणि प्रजासत्ताक दिन

शेतकरी आंदोलनाला दोन महिने होतील. या दोन महिन्यांत शेतकर्यांचा संयम कौतुकास्पद! सरकार, गोदी मिडीया, भाजप आयटी सेल, व्हाॅटस् अप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून शेतकरी आंदोलनाविरोधात सगळ्या प्रकारची गरळ ओकून झाली.
१/१९
+👇
अशा परिस्थितीतही शेतकरी आपल्या निर्णयाबाबत ठाम राहिले. सरकारच्या साम, दाम, दंड, भेदाविरोधात उभं राहणं, कधीच सोपं नव्हतं. म्हणूनच शेतकर्यांचं विशेष अभिनंदन!शेतकरी आंदोलन...
Divert & Rule,
Divide & Rule,
Defame & Rule
असं तीन प्रकारे तोडण्याचा यत्न झाला.
२/१९
+👇
Divert & Rule : सरकारमधील नेते व प्रवक्ते यांनी शेतकर्यांना पाकिस्तानी, खलिस्तानी, चायनीज एजंट, तुकडे तुकडे गँग, अर्बन नक्सल या आणि अशा अनेक उपाध्या देऊन आंदोलन बदनाम करण्याचं कुंभांड रचलं गेलं. परंतु शेतकरी याला पुरुन उरले आणि आंदोलन अधिक तेजाने तळपू लागलं.
३/१९
+👇
Divide & Rule : सरकारच्यावतीने शेतकरी संघटनांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न झाला. शेतकरी नेत्यांना जेवण, चहापान, चर्चा इ. निमित्ताने बाजूला घेऊन कान फुंकण्याचे अयशस्वी प्रयत्न झाले. असल्या राजकीय डावपेचांतून तावून सुलाखून निघाल्याने शेतकरी संघटनांची एकी जास्त मजबूत झाली.
४/१९
+👇
Defame & Rule : पंजाब, हरयाणामधील अडत्यांवर IT, ED च्या धाडी टाकून किंवा शेतकरी नेत्यांची राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत चौकशी करुन, आंदोलनकर्ते शेतकरी नेते, पत्रकार, माध्यमकर्मी इ.वर गुन्हे दाखल करण्याचा बागुबबुवा उभा करण्यात आला. शेतकरी आंदोलन तरीही ठामच राहिलं.
५/१९
+👇
उत्तरेतील कडाक्याची थंडी, त्यात पाऊस, रात्रीच्यावेळी वजा शून्य डिग्री होणारं हवामान, त्यामुळे दोन महिन्यात दीडशेहून अधिक शेतकरी दगावले. आपल्या पंतप्रधानांना त्याचा ना खेद ना खंत! अशा या कापर काळजाच्या सरकारपुढे टेचात आंदोलन सुरु ठेवणं म्हणजे मोठी कसरत होती.
६/१९
+👇
आतापर्यंतच्या आंदोलन काळात शेतकर्यांनी कायद्याचं उल्लंघन वा प्रशासनाचं न ऐकणं, असलं काही केलेलं नाही. शेतकरी नेत्यांच्या चर्चेच्या फेर्या जरी अपयशी ठरल्या असल्या तरी शेतकर्यांचा संयम वाखाण्याजोगा होता.
७/१९
+👇
या आंदोलनात अश्रुधुराचा वापर, थंड पाण्याचे फवारे, टोकदार तारांची कुंपणं, खोल खड्डे, सिमेंटचे अवजड ठोकळे, खिळ्यांचे पाट असे असंख्य अडथळे उभे केले म्हणून शेतकरी रामलीला मैदानात जाता जाता राहिले. परंतु तरीही अजिबात खळखळ न करता त्यांनी दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडलं.
८/१९
+👇
शेतकरी आंदोलन हे फक्त पंजाब, हरयाणा, राजस्थान पुरतं मर्यादित असल्याचं वारंवार सांगितलं गेलं. परंतु कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, ओरिसा, प.बंगाल इथे जी आंदोलनं उभी राहिली, सरकारने ती कितीही लपवू म्हटली तरी लोकांसमोर आलीच. यामुळे सत्ताधार्यांचा हा दावा सुध्दा फुसका बार ठरला
९/१९
+👇
ऐन कोरोना काळात संसदेच्या विशेष अधिवेशनाद्वारे राज्यसभेत शेतकरी कायदे गोंधळाच्या वातावरणात आवाजी मतदानाने संमत करण्यात आले. विरोधी खासदारांवर कारवाई केली गेली. पंजाबमध्ये तीन महिने शांततापूर्ण आंदोलन, मोर्चे सुरु होतं, तरी देखील केंद्र सरकार ढिम्मच राहिलं.
१०/१९
+👇
शेतकरी कायद्यांवर चर्चा होईल आणि आपली बाजू उघडी पडेल म्हणून सत्ताधार्यांनी कोरोनाचं कारण सांगत हिवाळी अधिवेशनच रद्द केलं. यामुळे अनेक विरोधी लोकप्रतिनिधींना सरकारला जाब विचारता आला नाही. अशा स्थितीतही न डगमगता शेतकर्यांनी आंदोलन सुरुच ठेवलं.
११/१९
+👇
आधी, मोदी सरकारचे शेतकरी कायदे कसे शेतकरी हित साधणारे आहेत, हे समजून सांगताना दरबारी कृषीतज्ज्ञ, अर्थशास्त्री, चाटूकार थकत नव्हते. नंतर आंदोलनापुढे त्यांची नसलेली विद्वत्ता थिटी पडत गेली.
१२/१९
+👇
शेतकरी आंदोलनानंतर त्याच कृषी कायद्यात १८ सुधारणा व दोन वर्षांची स्थगिती, इथपर्यंत सरकार का झुकलं असावं, हे सांगायची वेळ येताच वरील पैकी सगळे मोदी भाट गायब झाले. अर्थात शेतकर्यांनी हे सरकारी लाॅलीपाॅप नाकारलंच. कारण यामागे देखील निवडणूक प्रमेयं होती.
१३/१९
+👇
येत्या काळात प.बंगाल, ओरिसा, तामिळनाडू, उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुका आहेत. अशावेळी काही काळ माघार घेऊन आपला अजेंडा रेटून न्यायचा आणि सगळं आलबेल होताच, पुन्हा मागील पानावरुन खेळ पुढे सुरु ठेवायचा. शेतकर्यांना याचा अंदाज येताच ते आपल्या मागण्यांवर ठाम राहिले.
१४/१९
+👇
आज दिल्लीच्या सीमांवर जे शेतकरी आंदोलन उभं राहिलंय, ते अभूतपूर्व असं आहे. सरकारच्या थातुरमातुर प्रलोभनांना बळी पडून जर शेतकर्यांनी माघार घेतली, तर असं आंदोलन पुन्हा होणे नाही, याची कल्पना शेतकरी नेत्यांना असल्याने त्यांनी आंदोलन पुढे सुरु ठेवण्याचा निर्णय घेतलाय.
१५/१९
+👇
सदर शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने असंघटित मजूर, कष्टकरी वर्ग एकत्रित झाला व त्यांनी आपली ताकद सरकारला दाखवून दिली. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत स्त्री, पुरुष या आंदोलनात सामिल आहेत. सगळ्यांचा एकच आवाज व त्यांची वज्रमूठ सरकारची बोबडी वळवायला पुरेशी आहे.
१६/१९
+👇
शेतकरी पिझ्झा खात आहेत. ब्रँडेड कपडे, गॅझेटस्, गाड्या वापरत आहेत. शेतकरी आंदोलनाबाबत इथून सुरु झालेल्या चर्चा आजच्या ट्रॅक्टर परेडपर्यंत येऊन स्थिरावल्या आहेत. आजची शेतकर्यांची ट्रॅक्टर परेड नक्कीच ऐतिहासिक होईल, यात तिळमात्र शंका नाही.
१७/१९
+👇
ट्रॅक्टर परेडनंतर पुढे काय? असे प्रश्न येऊ लागलेत. अर्थातच पुढील काळात शेतकरी आपल्या मागण्यांवर ठामच राहतील व आपणाला हवं ते सरकारकडून पदरात पाडून घेतील, यात अजिबातच शंका घेण्याचं कारण नाही/नसावं. आजचा प्रजासत्ताक दिन अशाप्रकारे शेतकर्यांच्या विजयाने झळाळून उठावा.
१८/१९
+👇
माझ्या अन्नदात्याच्या सगळ्या इच्छा, आकांक्षा, मागण्या फलद्रूप व्हाव्यात, हेच या प्रजासत्ताक दिनाचं फलित असू देत.
१९/१९

#TractorRally #TractorMarch
#ISupportFarmers
#शेतकरीआंदोलन विजयी होवो 🙏

समाप्त 🙏

--- दुर्गा
You can follow @Am_here_DURGA.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.