शिवसेनेचा उदय व कृष्णा देसाई:

मुंबई कॉंग्रेसचे नेते रामकृष्ण बजाज (राहुल बजाज यांचे काका) हे ठाकरे मुंबईचे राजे बनायला कारणीभूत ठरले.

बजाज यांच्या आदेशानुसार आणि दशकभरापासून एकत्र कम्युनिस्टविरोधी भूमिका घेत असलेल्या ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली.
(1/9)
कॉंग्रेस पुरस्कृत संघटना डाव्या कार्यकर्त्यांना आपल्याकडे आकर्षित करू शकल्या नाही. एका हाकेवर मुंबई बंद करू शकणाऱ्या वामपंथीविरोधात ठाकरेंनी मराठी अस्मिता नावाचं अस्त्र भात्यातून काढले
(2/9)
1966 मध्ये ठाकरे यांनी मध्यमवर्गीय गरीब महाराष्ट्रीयन लोकांच्या भावनांवर भाष्य केले. महाराष्ट्राबाहेरून आलेले लोक सुशिक्षित होते, अधिक कमावत होते व मुंबईत स्वतःचे घर विकत घेऊ शकत होते. जे मराठी माणसांना शक्य नव्हते. हाच धागा पकडून ठाकरेंनी लोकांच्या भावना भडकवल्या.
(3/9)
मुंबईतील मराठी माणूस कापड गिरणीतील पांढरपेशा व मुकादम दोनही होते. पण मराठी अस्मितेच्या नावाखाली त्यांनी इतर कामगारांशी असलेले आपले बंधन घटवून काम केले. ठाकरे यांच्या जाळ्यात अडकलेल्या या कामगारांच्या संकटाच्या निवारणासाठी कामगार सेनेची स्थापना केली गेली.
(4/9)
ठाकरे यांच्या जंबोरी मैदान वरळी येथील सभेमध्ये कम्युनिस्टांनी त्यांच्यावर हल्ला करण्याची योजना आखली. त्यांचे सल्लागार योग्य पोलिस बंदोबस्तची व्यवस्था करू शकले नाहीत परंतु त्यांच्या नेत्याभोवती मानवी कवच ​​तयार करून त्याला दादर येथील घरी सुखरुप सुपूर्द केले.
(5 /9)
या खेळीमुळे वैयक्तिक द्वेष निर्माण झाला जो तोपर्यंत केवळ राजकीय होता. ठाकरे यांनी कम्युनिस्टांना कधीच माफ केले नाही आणि कॉंग्रेस सरकारांच्या मदतीने त्यांचा सविस्तरपणे काटा काढण्याची योजना बनवली.
(6/9)
ठाकरे यांच्या डोळ्याखाली 5 जून 1970 रोजी परळ येथील लोकप्रिय कम्युनिस्ट नेते कृष्णा देसाई यांना थंड रक्ताने ठार केले. सेनेच्या एका कार्यकर्त्याने आरोप अंगावर घेतले आणि त्याला अल्प शिक्षा झाली. कॉंग्रेस सरकारने पद्धतशीर डोळेझाक केली आणि दोषींना उघड्यावर सोडले.
(7/9)
त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीतही कॉंग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दर्शविला आणि परळमधील देसाई यांच्या विधवेविरोधात सेनेला विधानसभेची पहिली जागा जिंकण्यास मदत केली.

1970 च्या दशकापर्यंत दक्षिण मध्य मुंबईतील मुख्य डावे कामगार सेनेकडे गेले होते.
(8/9)
सेनेचे बरेचसे नेते आजही याच भागातून येतात. कॉंग्रेस आणि उद्योगांच्या समस्या नव्या kalat शिरल्या. मुंबई अजूनही थांबवता येत होती. पण थांबवणारी व्यक्ती बदलली होती. कम्युनिस्ट नाहीसे झाले होते. ठाकरे यांनी दक्षिण मध्य मुंबईत त्यांची पकड टिकावी ही खात्री केली. कायमची.
(9/9)
You can follow @LakhobaLokhande.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.