मला एकदा एका ब्राम्हण शिक्षकाचा फोन आला, त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या मन सुन्न करणाऱ्या होत्या. दुर्दैवाने ही व्यक्ती इतिहासाची शिक्षक. वर्गात शिकवून आल्यानंतर स्टाफरूममध्ये बसलेले असताना त्यांचे सहकारी शिक्षक त्यांना, "काय मग अण्णाजी दत्तो ? आज काय शिकवलं मुलांना?" https://twitter.com/TheDarkLorrd/status/1353199055388594176
असे विचारतात. त्यांनी त्यांच्या शाळेच्या ग्रुप वर एखादी पोस्ट लिहिली तर लगेच खाली एखादा व्यक्ती म्हणतो," बघा! अनाजीपंत काय लिहितात ते." मग बाकीचे खाली दात काढता येतात. त्यांचा मुलगा एक दिवस रडत रडत घरी आला आणि म्हणाला, "बाबा, मला आता ब्राह्मण राहायचं नाहीये.
मला इतर मुलं म्हणतात की तुम्ही शिवाजी महाराजांचा खून केला, संभाजी महाराजांची हत्या केली.
ब्राह्मण असे का असतात? मला ब्राह्मण व्हायचं नाही." बरं ही फक्त ब्राह्मणांची व्यथा नाही. माझे ठाण्याचे मित्र आहेत जे प्रथम श्रेणी अधिकारी आहेत.(क्लास वन ऑफिसर) ते दत्ताचे भक्त आहेत
आणि जातीने मराठा आहेत पण त्यांचे एक सहकारी आणि दुसरे त्यांचे वरीष्ठ त्यांच्या खात्याच्या लोकांच्या व्हाट्सअप ग्रुप वर सतत हिंदू धर्माबद्दल गरळ ओकत असतात. एवढच नव्हे तर कार्यालयात पण तेच करत असतात तेही यांना बघून जाणीवपूर्वक. त्या गोष्टीचा त्यांना प्रचंड मानसिक त्रास होतो.
एक-दोनदा त्यांनी त्याचा विरोध करायचा प्रयत्न केला पण त्यांच्या एका सहकार्याने त्यांना एकदा ह्याच लोकांनी असंच एका मराठा अधिकाऱ्यावर ॲट्रॉसिटी टाकून त्याला अडकवले होते त्याची आठवण करून दिली. यांचं वय रिटायरमेंटच आहे. त्यांना यावळणावर असा अपमान सहन करावा लागेल असं कधी वाटलं नव्हतं
त्यांनी मला फोन करून सगळी माहिती सांगितली आणि वर्किंग प्लेस वर जो मानसिक त्रास आणि अपमान त्यांना सहन करावा लागतोय त्याबद्दल एक तास ते माझ्याशी बोलत होते. अशाच एक ब्राम्हण मुख्याध्यापिका, एक वरीष्ठ पोलिस अधिकारी असे बरेच प्रकरणं आहेत जे फक्त प्रातिनिधिक उदाहरणं आहेत.
असे हजारो उदाहरणे मी देऊ शकतो.
हिंदू आणि हिंदुत्ववाद्यांना कशा पद्धतीचा मानसिक त्रासाला आज समाजात सामोरं जावं लागतंय याची सगळ्यांना कल्पना आहे पण कुठेही वाच्यता करता येत नाही. तुमच्या श्रद्धा स्थानांवर, महापुरुषांवर तसेच धर्मावर अत्यंत हीन पातळीवर टीका केली जाते एवढच काय
तर तुमच्या साधूंच्या हत्या होतात, कार्यकर्त्यांच्या हत्या होतात, कुठे अख्ख कुटूंब मारलं जात फक्त हिंदू आहे म्हणून मात्र जगाच्या कुठल्यातरी कोपर्यात एक कृष्णवर्णीय माणूस मारला गेल्यावर अखंड मनुष्य समाज हळहळतो. भारतात कुणीही हिंदूवर होत असलेल्या ह्या अन्यायांचा विरोध करण्यासाठी
पुढे येत नाही कारण इतरांना जो मानवाधिकार आहे कदाचित हिंदूंना तो नाही. यापूर्वीही कित्येक हिंदू फक्त हिंदू आहेत म्हणून मारले गेले आहेत. कित्येक ब्राह्मणांच्या यापूर्वी हत्या झाल्या आहेत आणि ब्राम्हणांच्या हत्येचे वारंवार आणि वेगवेगळ्या माध्यामांमधून आवाहन केल्या जातंय पण तिकडे
कोणालाच लक्ष द्यायचं नाही. मुळातच माणूस मारला गेलाय किंवा माणसाचा छळ होतोय त्यात जात पाच बघायचं कारण नाही, ही मानसिकता आमच्यात नाही. आम्ही मरणार्यांच्या आणि मारणार्यांच्या जाती बघून आकांततांडव करतो ही दुर्दैवाची बाब आहे.
इथे पुण्यातल्या ब्राह्मणांना कदाचित या घटनेचे
पण आज गाव पातळीवर तालुका पातळीवर ब्राह्मण समाज कुठल्या मानसिकतेतून जातोय हे मी प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलं आहे. एवढेच नव्हे तर धर्माचा अभिमान असलेला कुठल्याही जातीचा हिंदू या देशामध्ये सुरक्षित नाही की त्याला मानवाधिकार नाही.
✍ सचिन पाटील.

..
You can follow @Pappuji_Speaks.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.