#THREAD - #नेताजी_सुभाष_चन्द्र_बोस
' IT WAS NOT GANDHI BUT BOSE WHO ENDED THE BRITISH RULE " असं १९५५ मध्ये BBC ला मुलाखत देताना बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. आणि बाबासाहेब गेल्यावर तत्कालीन ब्रिटिश प्रधान मंत्री रिचर्ड क्लेमेंट अ‍ॅटली...
#ParakramDiwas
(1/17)
...यांनी देखील हि गोष्ट तत्कालीन बंगाल गव्हर्नर सोबत बोलताना मान्य केली. गर्व्हनर नि विचारले कि ' भारत छोडो आंदोलनाचा आणि ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य देण्याचा संबंध तो किती? त्यावर मिश्किल पणे हसत रिचर्ड म्हणाले 'MINIMAL ( किमान, गौण)
नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या बद्दल लिहायला गेले तर प्रचंड आहे पण त्यांच्या आयुष्यातील काही प्रसंग असे आहेत ज्याच्यामुळे खर्यार्थाने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आमूलाग्र बदल घडले.
ज्या वेळेला संपूर्ण देश ब्रिटिशांच्या हुकूमशाही राजवटीत जखडून गेला होता त्या वेळेला बंगाल चा वाघ यांच्या विरोधात बंड पुकारण्यासाठी म्हणून विविध देशांमध्ये फिरून आंतराष्ट्रीय संबंध घट्ट करत होता.
पहिल्या विश्व युद्धाच्या वेळेला जेव्हा हळू हळू करत ब्रिटिशांची ताकद कमी होत चालली होती तेव्हा नेताजींनी ब्रिटिशांचे शत्रू हेरले. त्या पैकी होते नाझी जर्मनी, इंपिरियल जपान आणि इटली.
भारताला स्वतंत्र राष्ट्र घोषित करा अशी मागणी त्यावेळेला नेताजींनी या तिघांकडे केली होती पण काही कारणास्तव शेवटच्या घटकेला येऊन माघार घेतली पण नेताजी थांबले नाहीत. ज्या वेळेला द्वितीय विश्वयुद्धाची सुरुवात झाली तेव्हा लक्षात आले कि ब्रिटिशांची ताकद कमी होत आहे.
राश बिहारी बोस ज्यांनी INA ची स्थापना केली होती त्यांनी INA ला सुभाष चंद्र बोसांच्या स्वाधीन करून टाकले कारण त्यांच्या मते या सैन्याचे नेतृत्व करण्याची धमक आणि ताकद कोणामध्ये असेल तर ती नेताजींमध्ये आहे.
ज्या वेळेला या INA मध्ये सैनिकांची भरती होत होती तेव्हा स्वातंत्र्य वीर सावरकरांनी सुभाष बाबूंना मागणी केली कि यात जास्ती जास्त हिंदू मुलांना भरती करून घ्यावे आणि या मागणीचा पाठिंबा डॉ.आंबेडकरांनी केला आणि त्यांनी महार समाजातील तरुणांना या सैन्यामध्ये भरती होण्यासाठी अपील केले.
२५ जून १९४४ ला आझाद हिंद रेडियो च्या माध्यमातून बोस यांनी सावरकरांचे कौतुक केले आहे
"When due to misguided political whims and lack of vision, almost all the leaders of Congress party have been decrying all the soldiers in Indian Army as mercenaries,
it is heartening to know that Veer Savarkar is fearlessly exhorting the youths of India to enlist in armed forces. These enlisted youths themselves provide us with trained men and soldiers for our Indian National Army. "
एक एक करत गोष्टी सुभाष बाबूंच्या बाजूने चांगल्या घडत चालल्या होत्या. INA मधील सैनिकांची संख्या वाढत चालली होती आणि ब्रिटिशांना वाटू लागले होते कि १८५७ सारखाच बंड आता पुन्हा होईल, पण आता तेव्हा सारखा त्या बंडाची झळ सहन करण्याची ताकद ब्रिटिशांमध्ये उरलेली नव्हती.
येत्या काळात जेव्हा INA ची संख्या वाढत चालली होती आणि सुभाष बाबूंकडून आंतराष्ट्रीय संबंध घट्ट केले जात होते तेव्हा ब्रिटिशांनी ठरवले कि आता भारत सोडायची वेळ आलेली आहे.
यात शंका नाही कि या स्वातंत्र्य लढ्यात अनेकांचे योगदान आहे, अगदी गांधींच्या भारत छोडो आंदोलनाचे सुद्धा, परंतु आपल्याला जे सांगितले जाते कि भारताला स्वातंत्र्य फक्त काही ठराविक लोकांमुळेच मिळाले आणि अहिंसेच्या मार्गाने मिळाले हे सत्यापासून कोसो मैल लांब आहे.
अनेकांनी या भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या जीवाचे बलिदान दिले आणि मग कुठे जाऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळालं.
या सगळ्यात सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर तो सुभाषचंद्र बोस यांचा आहे यात काडीचीही शंका नाही.
ब्रिटिशांवर दबाव निर्माण करण्यासाठी आणि त्यांना भारत सोडायला भाग पाडण्यासाठी सुभाष बाबूंनी अजून काय काय तरतुदी केल्या हे अनुज धार यांनी लिहलेल्या पुस्तकात संदर्भासह वाचायला मिळेल.
एक प्रखर राष्ट्रवादी विचारधारेचे , भारत मातेवर नित्सिम भक्ती करणारे आणि या भूमीच्या स्वातंत्र्यासाठी अहोरात्र लढलेल्या सुभाष बाबूंना मानाचा मुजरा.
भारत सरकार ने जो निर्णय घेतला आहे कि इथून पुढे २३ जानेवारी हा दिवस #PARAKRAMDIVAS म्हणून साजरा केला जाईल तो खरंच कौतुकास्पद आहे. नेताजींच्या कर्तृत्वाचे गुणगान हे संबंध जगात गायले गेले पाहिजे.
(17/17)
संदर्भ :
१. Legend and Legacy: Subhas Chandra Bose
Leonard A. Gordon
2. What Happened To Netaji : Anuj Dhar
3. https://www.indiatoday.in/india/story/exclusive-attlee-told-bengal-governor-netaji-not-gandhi-got-india-freedom-claims-book-305512-2016-01-25
4. HOW THE AXIS POWERS VIEWED SUBHAS CHANDRA BOSE AND HIS ACTIVITIES (1941-45)
GAUTAM CHATTOPADHYAY
5. https://swarajyamag.com/ideas/subhas-chandra-bose-support-and-betrayal
You can follow @malhar_pandey.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.