संघटनेची शक्ती समजणासाठी*

*संघटना काय असतॆ...*

एक कार्यकर्ता होता. तो नेहमी त्याच्या संघटनेत सक्रिय होता. तो सर्वांना परिचित आणि आदरणीय होता. अचानक तो काही कारणास्तव निष्क्रीय झाला आणि संघटनेपासून दूर गेला.
काही दिवसानंतर अत्यंत थंडीच्या रात्री त्या संघटनेच्या
प्रमुखांनी त्याला भेटायचं ठरवलं. संघटना प्रमुख त्या कार्यकर्त्यांच्या घरी गेले तॆव्हा तो कार्यकर्ता घरात एकटाच आढळला. शेकोटीत जळत्या लाकडाच्या ज्वाळासमोर बसून ऊब घेत होता. अग्निही गरम होत होती त्या कार्यकर्त्याने प्रमुखांचे फार शांतपणे स्वागत केले. दोघे शांतपणे बसले होते. कोणीही
एकमेकांशी बोलत नव्हते. फक्त शेकोटीतील अग्नि पेटत होता

थोड्या वेळाने संघटना प्रमुखांनी काहीच न बोलता शेकोटीतील एक पेटते लाकूड उचलून बाजूला ठेवले आणि पुन्हा जागेवर बसले कार्यकर्ता सर्व गोष्टींकडे लक्ष देत होता. बर्‍याच दिवसांपासून एकटे राहिल्यामुळे त्याच्या मनालाही आनंद होत होता
परंतु त्याने पाहिले की, विभक्त लाकडाच्या आगीची ज्योत हळूहळू कमी होत आहे. काही वेळातच आग पूर्णपणे विझली. त्यात उष्णता शिल्लक नव्हती.
काही काळापूर्वी, ज्या लाकडाकडे एक ऊबदार प्रकाश आणि ज्वाळा होती, तो काळ्या आणि निस्तेज तुकड्यांशिवाय काहीही उरला नव्हता.

दरम्यान...
दोघांनी
एकमेकांना कमीतकमी शब्द बोलून अभिवादन केले.

संघटना प्रमुखांनी निघण्यापूर्वी बाजूला उचलून ठेवलेले लाकूड उचलले आणि ते पुन्हा आगीच्या मध्यभागी ठेवले. ते लाकूड पुन्हा प्रज्वलित झाले आणि ज्वाला बनल्यामुळॆ त्याभोवती प्रकाश आणि उष्णता पसरली. जेव्हा तो कार्यकर्ता संघटना प्रमुखांना
सोडण्यासाठी दाराजवळ पोहोचला तेव्हा तो प्रमुखांस म्हणाला माझ्या घरी येऊन भेटल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आज आपण काहीही न बोलता एक सुंदर धडा शिकविला आहे.

*एकट्या व्यक्तीचे अस्तित्त्व गौण असते. जेव्हा ती संघटनेत कार्यरत असते तेव्हा ती प्रज्वलित होत असतॆ. मात्र जेव्हा ती
संघटनेपासून विभक्त होते तेव्हा ती एखाद्या लाकडासारखी विझते. ज्यांची ओळख संघटनेनेच बनविली आहे, त्यांच्यासाठी संघटना सर्वोतपरि व सर्वश्रेष्ठ असावी.

*म्हणून सर्वानी संघटीत रहा*
@shwetapradeepd2 @Howling_Swade @Rohini_indo_aus @Sonal_Rv @Tushar_Raut_ @9900Vikram @Makao7iv7iv
You can follow @mayabhai88.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.