परंपरागत आंधळ्या विचारधारेच्या मार्क्सवाद्यांना आव्हान देणारा पाच फुटांचा मार्क्सवादी म्हणजे ॲटोनिओ ग्राम्सी. दाढीवाल्या मार्क्सबाबांकडून घडलेल्या चुकांची सुधारणा करता करता विसाव्या शतकातील सर्वात महत्त्वाच्या चिंतनापैकी एक 'सांस्कृतिक हेजिमेनीचा' शोध लावणार्‍या पठ्ठ्याला वाचताना
कंटाळा कधीच आला नाही. त्याने मार्क्सबाबाच्या युटोपियन क्रांतीची कारणमीमांसा तर केलीच परंतु ती अंमलात कशी आणायची याची मांडणी करणारा विसाव्या शतकातील एकमेव अवलिया होता.

कुबड आलेल्या पाचफुटी अवलियाच्या मेंदूला अटक करण्याची गरज मुसोलीनीला का पडली, यावरूनच त्याची महानता लक्षात येते.
मिकीयावॅलीच्या तत्वज्ञानामुळे सत्तेचे नियंत्रण कसे करायचे याची थोडी बहुत कल्पना त्याच्या कडे होती. मुसोलीनीच्या जेलमध्ये बसून लिखाण करणे ही काय सोपी गोष्ट नव्हती ती या पठ्ठ्याने सांकेतिक भाषांचा वापर करून केली.

द प्रिसं असो वा इटालियन थिंकर पराटोची एलिटीस्ट थेअरी असो
तिला एका धाग्याच्या रूपात विणण्याचे काम ग्रामसी बाबाने केले. आर्थिक व्यवस्था हीच प्रत्येक समाजाची मूलभूत संरचना आहे या पारंपारिक मार्क्सवादाला पहिल्यांदाच छेद दिला. सांस्कृतिक हेजिमेनी अन् राजनैतिक विचार हेही सामाजिक संरचनेचे महत्त्वाचे अंग असतात याचे रोपण त्याने केले.
प्रचंड वर्ग संघर्षातून आलेल्या ग्राम्सीचा मार्क्सवादाच्या कोअर घटकांशी कधीच वाद नव्हता मात्र मार्क्सने स्वतः म्हटल्याप्रमाणे "बुध्दीजीवी वर्गाचे काम फक्त चिंतन करणे नसते तर तिला व्यवहारीक जोड देऊन समाजात बदल करण्याचेही असते" या वाक्याच्या खोल गर्तेतून विचार करण्याचे काम त्याने
सुरू केले. ऑरगॅनिक बुध्दीजीवी अन् वैयक्तिक बुध्दीजीवी अशी विभागणी करताना त्याला मार्क्सच्या या वाक्यातील प्रॅक्टिकल अप्रोच सापडला. ग्राम्सी म्हणतो वैचारिक बुध्दीजीवी मटेरिअलिस्टेक पध्दतीने समाजाला पुढे घेऊन जातात पण ऑरगॅनिक बुध्दीजीवी समाजाला क्रांती करण्यासाठी नेतृत्व प्रदान
करतात. सांस्कृतिक हेजिमेनी ( वर्चस्व ) तोडण्यासाठी सामाजिक चेतना जितकी कामी येते तितकीच कामगार वर्गातील ऑरगॅनिक बुध्दीजीवींनी एका नव्या जगाचे प्रारूप तयार करणे महत्त्वाचे असते.

मार्क्स म्हणतो प्रत्येक समृध्द भांडवलशाही राष्ट्रात क्रांती अटळ आहे मग गरीबीने ग्रस्त रशियातच
क्रांती का झाली? कारण भांडवलशाही राष्ट्रात कामगाराला उदरनिर्वाहाचे साधन प्राप्त करून दिले आहे. पैसा असणारा व्यवस्थेतून उदरनिर्वाह करतो, जमीन असणारा भाड्यातून पैसे कमावतो तर जमीन नसणारा मजुरीतून पैसा कमावतो अशाप्रकारे उदरनिर्वाहाचे हलाखीचे का होईना पण साधन उपलब्ध आहे.
पूंजीवादी व्यवस्था थेट सत्तेचा वापर करत नसते ती लोकांच्या मस्तिष्कावर कंट्रोल करत असते. शांती प्रिय व्यवस्था हेच एकमेव मार्ग आहे, सार्वभौमत्व हेच अंतिम लक्ष्य असायला हवे, स्टेटस को ला विरोध करणारा शत्रू असतो असे एक ना अनेक प्रकार परिवार, नागरी व्यवस्था अन् शेवटी राज्य अशा
त्री सुत्रीतून ही हेजिमेनी तयार करत असतात. क्लासिकल शब्दात सांगायचे झाल्यास पूंजीवादी व्यवस्थेने प्रॉपगंडा अन् संस्थाचा वापर करून एका प्रकारचे जग निर्माण केलेय जिथे त्यांनी निर्माण केलेले नियम आद्य राहतील. या अद्भुत जगात कामगार वर्गाच्या किंबहुना प्रत्येक शोषित घटकाच्या सहमतीतूनच
याचे नियंत्रण राज्या द्वारे केले जाते. त्यामुळे आर्थिक विषमता हीच मूलभूत संरचना असते हा स्कोप स्थायी नसतो. ही हेजिमेनी तोडण्यासाठी बुध्दीजीवी वर्गाच्या नेतृत्वाखालील वर्गाने दुसर्‍या नव्या जगाची निर्मिती करणे हाच एकमेव पर्याय उपलब्ध आहे.

लेनिन दादाची क्रांती ही रक्त क्रांती
नव्हती ना युरोपियन राजांच्या दुर्गतीमागे रक्त क्रांती होती, ती फक्त पक्षीय वेल ट्रेन्ड कार्यकर्त्यांची क्रांती होती. त्यामुळे ग्राम्सीच्या सांस्कृतिक हेजिमेनीला निरुत्तरीत करणारी एकही थेअरी अजूनही पुढे आली नाही.

असो. ग्राम्सीने हे सगळं चाळीशीत मांडलं हे फारच विस्मयकारक आहे.
फासीवादी मुसोलीनीच्या जेलमध्ये इतका मोठा तत्वज्ञ तयार होतो हेही अविश्वसनीय आहे. अख्ख आयुष्य आजारपणात घालवल्यानंतरही इतकी मोठी प्रिझन थेअरी त्याने मांडलीय. पुढे जाऊन माओने त्याच्या थेअरीला रिकगनाईज केले.

ग्राम्सीचा वैयक्तिक संघर्ष नेहमीच फॅसिस्ट काळात छोटीशी उमेद कायम ठेवण्याची
प्रेरणा देतो. मार्क्सबाबा अन् ग्राम्सी नेहमीच एक आशावाद देत असतात फक्त वाचत रहायचं किमान निओ फॅसिस्ट काळात तुम्ही वैयक्तिकरीत्या कितीही असहमत असला तरी यांना वाचत रहायचंय.

आज ग्राम्सीचा हॅपीवाला बर्थडेय, हेजिमेनी असेपर्यंत तो कायम आपल्यात राहिल! ❤💐

______________
You can follow @prathameshpurud.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.