🔥 KGF 🔥
2019 ला आलेला आणि BLOCKBUSTER ठरलेला KGF हा movie आतापर्यंत खुप साऱ्या लोकांनी बघितला असेल व आता त्याचा दुसरा part पण येणार आहेच त्यामुळे आपण ह्या #थ्रेड मध्ये भारतातील सोन्याच्या एकमेव मोठ्या अश्या #कोलार_गोल्ड_फील्ड बद्दल जाणून घेऊया.👇
"कोलार" गावाची स्थापना ही चोळ राजवटीतील नंतर हे गावं आपल्या शहाजी महाराजांच्या जहागीरीत सुद्धा होतं. नंतर ते म्हैसूर च्या राज्यात गेले व शेवटी 1799 ला ब्रिटिशांनी टिपु ला हरवल्यावर काबीज केलं. ब्रिटिश Left. Warren ने तिथे सोन्याच्या ऐकीव बातम्यामुळे सोने शोधमोहीम राबवली +
तेव्हा त्याला गावाकऱ्यांनी एका बैलगाड्यात कोलार मधील चिखल माती आणून दिली जीं धुतल्यावर प्रत्येक 56kg मातीमागे 1gm सोनं निघाले. बरं हे सगळं परंपरागत पद्धतीने केल गेलं, त्यात आधुनिक मशीनरी नव्हती. त्यानंतर 1804-1860 ह्या भागात शोधमोहीम चालली पण खदाण काम झाले नाहीत. 1875 दरम्यान
मायकल जो एक रिटायर्ड ब्रिटिश अधिकारी बेंगलोर येथे सेटलं झाला होता. त्याला kGF बद्दल उत्सुकता लागली. म्हणून त्याने शोधमोहीम राबवून सरकार कडुन mining साठी परवानग्या काढल्या.
काही वर्षानी मायकेलचे mining ऑपेरेशन हे "Jhon Taylor and Sons" ह्यां कंपनी ने विकत घेतले.+
ह्या कंपनी ने आधुनिक मशीन आणून mining सुरु केली.1902 ह्या सालापर्यंत देशाच्या total सोन्या पैकी 56% सोने एकट्या KGF मधून निघत.ब्रिटिश कंपनी ने इथे 1956 पर्यंत mining केली.+
आश्चर्य वाटेल पण KGF ला त्यावेळी
"Mini England" म्हणून ओळखलं जायचं कारण तिथल्या सुख सुविधा आणि हे शहर नंतर पूर्णपणे ब्रिटिशांनी बनवल. तिथं हॉस्पिटल, क्लब हाऊसेस, ऑफिसर रेसिडेंट, Race कोर्स सगळं होतं. देशात त्या वेळी बंगलोर मुंबई, दिल्ली सारख्या शहरात काही ठिकाणीच+
फक्त वीज असायची पण कोलार मध्ये त्या काळी 24*7hr विजेची सोय होती,तेही पूर्ण शहरात.
असं असलं तरी mining मधील मजुरांची स्थिती मात्र फारच खराब होती. ऑफिशिअल आकडा नसला तरी अंदाजे 6000 मजूर ही खाण बंद होईपर्यंत यांत मेले आहेत. जेव्हा ही खाण सुरु झाली तेव्हा वरचे वर म्हणजे 1km पर्यंत +
खोलीवर सोनं मिळायचं. नंतर मात्र ही खोली 3km पर्यंत गेली आणि इतक्या खोल तेही 55°तापमानात काम करणं अशक्य होतं गेल जरी फ्रेश हवा येणे जाण्याची सुविधा ह्या खाणीत केली गेली असली तरी.हळू हळू कोलार येथील सोनं सापडण देखील कठीण होतं गेल आणि इन्व्हेस्टर ने सुद्धा येथून निघायला सुरवात केली
नंतर 1972 मध्ये भारत सरकार ने ताब्यात घेतली व "भारत गोल्ड माईन Ltd" यां नावाने सरकारी कंपनी चालवायला सुरवात केली.
KGF ही जगातील 2 नंबर ची सगळ्यात खोल सोन्याची खाण आहे;खोली जवळपास 3km .
Gov deta उपलब्ध असलेल्या 200 वर्षाच्या KGF च्या इतिहासात येथून 900 टन इतकं सोनं काढले गेले.
Kgf मध्ये सापडणारा पायरोक्लास्टिक आणि पिलो लावा प्रकराचा खडक हा आता Geological Survey of india ने National Geological Monument म्हणून घोषित केलाय.
1881-90 मध्ये येथे सोनं per tonne of ore मागे 47gm सोनं निघायचं जे 1990 पर्यंत घटून फक्त 03gm राहून गेलं....
यां मूळ ही खाण नंतर 2feb 2001 रोजी भारत सरकार ने बंद केली. येथील जवळपास हजारो लोकं बेरोजगार झाले. आता कामानिमित्त हे लोकं येथून 100km जवळ असलेल्या बेंगलोर येथे जातात.एक काळी मिनी इंग्लंड असणार कोलार आता मात्र उदासीन बनलय. गरिबी, बेरोजगारी, भूकमारी ने ग्रस्त झालंय.
सोनं काढतांना जो waste पदार्थ असतात ज्यात प्रामुख्याने cynide, silica, copper sulphate, sodium sulphate यां waste मटेरियल चे 40-40मीटर उंच पहाड झालेले आहेत. आणि हे waste पदार्थ पावसाच्या पाण्यासोबत मिसळून जमीनीत मुरतात, पिण्याच्या पाण्यात mix होतात आणि यामुळे
तेथील जमीन शेती लायक नाही की पाणी
पिण्यालायक राहिलं नाही.Cynide च्या पहाडातून येणाऱ्या धुळी मुळे अनेकांना स्किन ऍलर्जी आणि श्वसनाचे त्रास सुरु आहेत.

@MarathiDeadpool @MarathiRT
@Atarangi_Kp @jimodiji @PatilEkMaratha @IshwariMurudkar
@Digvijay_004 @siddharthsuffi4
kGF च्या कामगारांना सिलिकॉसिस आणि फुफ्फुसाचा कॅन्सर झालंय. अतिखोदकामामुळं KGF च्या खदाणी पाण्यानं फुल झाल्यात आणि तिथल्या मजूर आणि कामगार वर्गाच आयुष्यचं वाहून घेऊन गेल्या आहेत......
.
.
#Threadकर
Source : news paper, google, youtube studyiq
You can follow @Truepat19189910.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.