अर्णब चे व्हॉट्सॲप गेले दोन दिवस नीट वाचले. पद्धतशीरपणे देशाच्या प्रत्येक भागात वातावरण कसं आणि कुठल्या मुद्द्यावर पेटवत न्यायचं याची रणनीती हा माणूस अत्यंत थंड डोक्याने आखत होता. काश्मीरवर अख्खा देश, ममतांच्या विरोधात बंगाल, लालूच्या विरोधात बिहार, केजरीवालच्या..
विरोधात दिल्ली, केरळमध्ये शबरीमला, बंगलोर, चेन्नई...महाराष्ट्रात आपण त्याचा उच्छाद पाहिलाच सुशांत सिंह राजपूत च्या आत्महत्येनंतर...२०११ ला अण्णा आंदोलन...आणि ही नशा या माणसाच्या डोक्यात चढलीये. इंग्रजीत ज्याला drunk on power म्हणतात तसा प्रकार आहे हा. पुलवामा हल्ल्यानंतर याला...
Ratings वाढतील याचा orgasm होतो. शशी थरूर यांना दोषी ठरवून मीडिया trial चालवायची, टीव्ही वर सुब्रमणियन स्वामी यांच्याबरोबर भांडायच आणि आतून एक राहायचं...भयानक माणूस आहे हा. आणि यांच्यासारखे अनेक. एका निष्पक्ष anchor ने, जो याचा कट्टर विरोधक मानला जातो, त्याने याला चॅनल लॉन्च ..
होण्याआधी काही दिवस फोन करावा आणि माझी बायको टाइम्स मध्ये सडते आहे, तिला नोकरी दे म्हणून विनंती करावी (हा अर्णब चा दावा आहे, खरं खोटं तोच जाणे)...सगळं भयानक आहे. मीडिया, न्यायव्यवस्था, शासन यंत्रणा, समाज किती सडले आहेत याचं निदर्शक असलेलं हे सभाशन आहे. अमेरिकेत..
डोनाल्ड ट्रम्प चार वर्षात पायउतार झाला कारण काही संस्थांचा कणा शिल्लक होता. इथे संस्थाच संपल्यात आणि समाजाला काही पडलेली नाहीय. अगदी प्यासा मधल्या गुरुदत्त सारखी अवस्था आहे...जला दो, फूंक डालो ये दुनिया, ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है!