न्या. रानड्यांचा ‘The Rise of Maratha Power’ हा ग्रंथ कोण विसरेल?

इंग्रजांनी पद्धतशीरपणे शिवछत्रपती दरोडेखोर होते म्हणून अपप्रचार चालवला होता. महाराष्ट्रात आणि देशभरात स्वकीयांना त्यांच्या उज्ज्वल भूतकाळाची आठवण करून देण्यासाठी या भंपक समजुतीचा प्रतिवाद करणं आवश्यक होतं.

1/9
ते कार्य रानड्यांनी सुरू केलं. इ.स. १८३४ साली शिवाजी महाराजांचे एक चित्रं प्रसिद्ध झालं होतं. तेव्हापासून महाराजांविषयी जनतेत आदरमिश्रित कुतूहल होतं. यास देशभक्तीचे योग्य वळण देण्यात रानड्यांचा सिंहाचा वाटा आहे.

इ.स.१८९१ मध्ये न्या. रानडे यांनी इतिहास लेखनाची एक योजना आखली.

2/9
या योजनेप्रमाणे बा. प्र. मोडक यांनी बहामनीकाळ, कीर्तने यांनी शिवकाळ आणि का.ना. साने यांनी पेशवेकाळावर लिखाण करावे, न्या. तेलंगानी ते तपासावे असे ठरले होते.

परंतू काही कारणामुळे ही योजना पूर्ण झाली नाही.

3/9
न्या. रानडे ह्यांनी “मराठ्यांच्या सत्तेचा उत्कर्ष” हा ग्रंथ इ. स. १९०० मध्ये प्रसिध्द केला.

त्याचप्रमाणे त्यांचे "Currencies and Mints Under the Maratha Power" आणि "Introduction to the Peshwa Diaries" हे सर्वच लिखाण मुलभूत विवेचन करणारे आहे.

4/9
ग्रॅंट डफच्या इतिहास लिखाणाची त्यांनी समीक्षा केली. डफच्या मर्यादा त्यांनी स्पष्ट केल्या.

ग्रॅंट डफचा “वणवा सिध्दांत'' त्यांनी खोडून काढला. मराठ्यांचे राज्य लूटमार व साहसावर अबलंबून नव्हते. राज्याच्या उभारणीमागे काही तात्विक प्रेरणा होत्या. नैतिक दृष्टिकोन होता.

5/9
मराठ्यांच्या सत्तेचा उदय ही एक चळवळ होती. या चळवळीमागे राष्ट्रवादाची संकल्पना होती. हे सर्व आकस्मिक घडले नव्हते. याचा उहापोह न्या. रानडे यांनी त्यांच्या लिखाणात केला आहे.

न्या. रानडे यांचे इतिहासलेखन मराठ्यांच्या इतिहासातील तत्वज्ञान उलगडून दाखविणारे होते.

6/9
या लिखाणामागे ग्रॅंट डफवर टीका करून त्याच्या चुका निदर्शनास आणणे एवढा मर्यादित उद्देश नव्हता, डॉ. कुलकर्णी यांनी नमूद केल्याप्रमाणे, “भारतीय दृष्टीकोनातून इतिहासाचे विवेचन करून मराठ्यांच्या बदलचे गैरसमज दूर करून मराठ्यांच्या इतिहासाचे सत्यस्वरूप व मर्म...

7/9
...लोकांसमोर मांडणे हे त्यांचे ध्येय होते.” एकूण मराठ्यांच्या अभ्युदयाविषयी खोलवर रूजलेले गैरसमज नाहीसे करणे आणि इंग्रज राज्यकर्त्यांनासुध्दा त्याची जाणीव निर्माण करून देणे हे या ग्रंथाचे उद्देश होते.

8/9
न्या. रानड्यांच्या ग्रंथातील विवेचनाचे वैशिष्ट्य म्हणजे मराठा सत्तेच्या उदयाचे न्या. रानडेंनी केलेले तात्विक मूल्यमापन आजही कायम राहिले आहे.

न्यायमूर्ति महादेव गोविंद रानडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन 💐

#Copied from मराठा रियासत - IG (Permission taken)

9/9
You can follow @TheDarkLorrd.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.