भारतीय लोकांना दुसऱ्यांची भांडणं, एकमेंकावरचे खोटे आरोप, श्रीमंतांची लफडी, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील भानगडी पाहण्यात खुप रस असतो. त्यामुळे शीना बोरा हत्याकांड, आरूषी मर्डर केस आणि आता सुशांत सिंग राजपूत सुसाईड प्रकरणाचा प्रोपोगांडा अर्नब गोस्वामी ने आधी टाईम्स नाऊ आणि नंतर
रिपब्लिक भारतवर लावून धरला होता. त्याच्या आक्रस्ताळेपणे ओरडण्याला, खिदळण्याला, किंचाळण्याला पब्लिक मनोरंजन म्हणून पाहते. पत्रकारितेशी दूरदूरचा संबंध नसलेल्या हा हरामखोर माणसाने पत्रकारीतेची शक्य तितकी खिल्ली उडवून ठेवली आहे. हे त्याच्या एकट्याच्या बळावर शक्य झालेले नाही. यासाठी
मूर्ख प्रेक्षकांचाही तितकाच हातभार आहे. आज रिपब्लिकच्या इंग्रजी वाहीनीचा मार्केट शेअर ५२ टक्के आहे तर हिंदी चा १४.३८ टक्के इतका आहे. सरकारी मेहरबानी लायसंस मिळवणे, सर्व प्रकारच्या टॅक्केसमधून सुट, सर्व प्रकारच्या कायद्यांपासून संरक्षण मिळवून छोट्या स्क्रीनला आपल्या ताब्यात
घेतलेल्या अर्नबने मागील ७ आठवड्यांपासून टीआरपीला आपल्या ताब्यात घेतले आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी, बांग्ला, गुजराती, पंजाबी भाषिक प्रदेशातील सर्व GEC चे रेटिंग निम्म्याहून कमी झाले आहेत. आणि, हे कमी झालेले रेटिंग एकगठ्ठा अर्नबकडे वळालेले आहे. त्यासाठी त्याचे खोटे बोलणे, लोकांना
गुंगवणे कारणीभूत असले तरी आपल्या सेट टॉप बॉक्समधील प्राईम नंबरचे स्लॉट मिळवून काम करणे ही तितकेच कारणीभूत आहे. अफाट पैसा, सरकारची मर्जी, पोलिसांपासून संरक्षण आणि मूर्ख प्रेक्षक या सर्वांची परिणीती म्हणजे अर्नबची दलालखोर पत्रकारिता आहे.

GEC म्हणजे जनरल एंटरटेनमेंट चॅनेल. याचा
फटका जीईसी ला इतक्या मोठ्या प्रमाणावर बसला आहे की, जीईसी वर चालणारे काही शोज पुन्हा त्यांची कोविड आधीची टीआरपी मिळवू न शकल्याने त्यांना नाईलाजास्तव बंद करावे लागत आहे.

भारतीय टिव्हीचे इतके दारूण पराभव स्विकारलेले रुप याआधी कधी झाले नव्हते. भारतात छोटा पडदा हा सर्वात मोठा जनमत
प्रभावित करणारा माध्यमांतील एक महत्त्वाचा भाग आहे. आणि हा अख्खा पडदा अर्नबने आपल्या ताब्यात घेतला आहे. जो उरला आहे त्या ठिकाणी आज तक, एबीपीसारखी माध्यमे आहेत.

शहाणे असाल तर या अर्नब नावाच्या किडीला वेळीच नष्ट करा. अन्यथा येणाऱ्या कोवळ्या मेंदूच्या अर्धवट पीढ्या हा माणूस
प्रोपोगांडाने बर्बाद करत राहील. एकविसाव्या शतकातील गोबेल्स आहे हा.

- वैभव छायाची आवडलेली पोस्ट तुम्हा सर्वांसाठी...😊
#ArnabGate
You can follow @Manoj2212Khare.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.