या कोविड संकटात, टाळेबंदीत खुप गोष्टी नव्याने शिकायला मिळाल्या.

पुर्वी आर्थिक चटके इतके पाहिलेत कि त्याचे काही अप्रुप नव्हते.तरीही काही बाबी अजून ठळक जाणवल्या.

1. Need Vs Wants चा फरक फार स्पष्ट झाला. हा माझा सर्वाधिक मोठा फायदा!अगदी आयुष्यभर..

#SaturdayThread #मराठी #म १/७
2. “Work From Home” आमच्या व्यवसायात धादांत “Timepass” वाटणारी गोष्ट आमची कंपनी आयुष्यात कधीही करू शकणार नाही हा मोठा गैरसमज दूर झाला.

3. आयुष्यात पहिल्यांदा सलग एवढे दिवस कुटूंबासोबत राहिलो, खरे आयुष्य अनुभवले. त्यांनी मला सहन केले याबद्दल त्यांचे कौतुक!
२/७
4. वय, जात, धर्म, देश, भाषा, स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत, बुद्धीवान असो की भोळा निसर्गासमोर आपण सर्वच सारखेच.सर्वांना एकच न्याय!

5. लॉकडाऊनमधे गरीब,मजूर,कामगार वर्ग अन्नपाण्याविना, सरकारी मदतीविना चालत गेला. आपणही कधीकाळी यांचाच भाग होतो. आज त्यांच्यापेक्षा चांगली परिस्थिती
३/७
असूनही बऱ्याच गोष्टींसाठी नको त्या चाललेल्या धावपळीची जाणीव झाली.

6. वाचन करण्याच्या काही नव्या पद्धती शिकलो! व्यवसायासाठी पुर्वी लिहायचो पण ते इंग्रजीत होतं, काही जवळच्या मित्रांच्या आग्रहामुळे खुप वर्षापासून मराठीत लिहिलेली अनुभवांची डायरी सर्वांसमोर ठेवण्याची हिंमत आली.
४/७
७. या निसर्गाचा स्वतःचा एक चिकित्सा करण्याचा वेगळा मार्ग आहे. त्यातून कोणीच चुकू शकत नाही. आपल्यापैकी बर्‍याच जणांकडे गरजेपेक्षा जास्त असूनही Greed माणसाला हिंस्र श्वापद बनवते यावरचा विश्वास अजून दृढ झाला.

आपण कोणाकडूनही जबरदस्तीने काही घेतले तर निसर्ग त्याची परतफेड करतोच.
५/७
पैशांच्या जमाखर्चाचा ताळेबंद जुळला की हिशोब सोपा होतो तसेच अनुभवाचे सिंहावलोकन केले आणि काय शिकलो? काय चुकले? याचा विचार केला की आयुष्याचे गणितही सुटायला मदत होते.

तुम्हाला कोविड आणि या लॉकडाऊनने कायकाय नवीन शिकवले?

मलाही नक्कीच ते वाचायला, चांगल्या बाबी शिकायला आवडतील.
६/७
तुमच्या प्रतिक्रिया नक्की लिहा. या टाळेबंदीत आलेल्या अनुभवांचे सिंहावलोकन नक्की करा.

धन्यवाद 🙏
७/७

#SaturdayThread #मराठी #अनुभव #टाळेबंदी
You can follow @wankhedeprafull.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.