नमस्कार सावंत साहेब,
तुम्ही मांडलेले मुद्दे हे फक्त तुमच्या सोबत कट्ट्यावर बसून गप्पा मारणाऱ्या लोकांसाठी योग्य आहेत. पण शेवटी इतिहास आहे, आणि इतिहास सांगताना दाखले द्यावे लागतात. त्या आधारावर आपण बोलू.
(1/13) https://twitter.com/sachin_inc/status/1349789792972677120
तुमच्या म्हणण्या नुसार 'उस्मानाबाद' चे नाव हे हायदराबाद चा ७वा निजाम मीर उस्मान अली खा यांच्या नावावर ठेवले गेले. हे बरोबर आहे, पण ते का ठेवले गेले याचे नाव ठाऊक आहे का ? प्राचीन काळात या भागाचे नाव 'धाराशिव' होते.
१३१७ साली यादवांच्या पतनानानंतर हा भाग इस्लामिक राजवटींच्या अधिपत्याखाली आला. १३५१ साली बहामनी राज्यांनी याचे चार भाग केले आणि सध्याचा 'उस्मानाबाद' तेव्हा हा दिल्ली सल्तनत चा भाग झाला. येत्या काळात बहामनी लोकांनी यावर कब्जा केला आणि जवळपास १५० वर्ष राज्य केले.
१४९० साली बहामनी साम्राज्य विस्कळीत झाले आणि 'धाराशिव' (उस्मानाबाद) हा बरीदशाही राजवटी खाली आला. १५१८ साली धाराशिव चे दोन भाग झाले, एक म्हणजे निझामशाही आणि दुसरा आदिलशाही. बरेच तात्विक वाद झाले आणि हळू हळू करत या भागावर इस्लामिक राजवटीचे अधिअपत्य वाढत गेले.
मलिक अंबर ने १६०० च्या दरम्यान निजामशाहीचे अस्तित्व वाचवण्यासाठी म्हणून 'मुर्तझा' निझाम या व्यक्तीला गादीवर बसवले आणि निजामशाही कशी बशी टिकली. पुढे येत येत १६३६ च्या दरम्यान मुघलांनी निझामशाहीवर विजय मिळवला. मुघल विरोध आदिलशाही लढाई मध्ये निजामशाही चेपली जात होती.
पुढे जात जात 'धाराशिव' या भागाचे अनेक तुकडे झाले. आणि त्या पैकी काही भाग हा नशिबाने निजामशाहीच्या नावाने आला. धाराशिव मध्ये दक्खन च्या ८ भागांपैकी १ भाग निजामशाही ला दिला गेला. आणि जो भाग दिला गेला तो भाग सुद्धा नळदुर्ग आणि परांडा या दोन भागांमध्ये विभाजला गेला.
आता आपले नाव कुठेतरी असले पाहिजे ह्या लालसेने १९०५ मध्ये या भागाला निजाम उस्मान मीर अली खान यांच्या नावाने 'उस्मानाबाद' हे नाव पडले.
दुसरा मुद्दा : मीर उस्मान अली खान यांनी ५,००० किलो सोने १९६५ मध्ये नॅशनल डिफेन्स फंडाला दान केले.
इथे सगळ्यात पहिल्यांदा हे लक्षात घेतले पाहिजे, कि हा दावा प्रचंड खोटा आहे कारण त्यांनी ५००० किलो नाही तर ४२५ किलो सोनं होतं. एकतर हे सगळं सोनं लुटलेलं होतं आणि दुसरी गोष्ट हे दान नाही, हे सोनं निजामाने नॅशनल डिफेन्स फंडात गुंतवलं होतं तेही ६.५ % व्याजदराने https://www.thehindu.com/news/cities/Hyderabad/the-truth-about-the-nizam-and-his-gold/article25464770.ece
म्हणून उगाच काहीतरी त्यांनी महान कार्य केले वगैरे सांगण्याची गरज नाही. याच मीर उस्मान अली खान यांनी स्वातंत्र्यानंतर भारतात विलीन होण्य्साठी नकार दिला आणि जेव्हा सरदार पटेलांनी या सगळ्या गोष्टी मध्ये लक्ष घालायचे ठरवले तेव्हा
निजामाने पाकिस्तानच्या हायकमिशनर ऑफ UK ला गुप्त पद्धतीने 1,007,940 पाउंड पैसे दिले, ज्यातून त्यांना शाश्त्रास्त्र मिळणार होती. भारतात विलीन न होण्यासाठी निजामाच्या सांगण्यावरून कासीम रिजवी ( असदुद्दीन ओवैसी) च्या पार्टीचा तत्कालीन अध्यक्ष, याने रझाकारांची फौज तयार केली.
ज्या फौजेने हायदराबाद मुक्तिसंग्रामाच्या वेळेला हिंदूंचा छळ केला. अमानुष हत्या केल्या. जेव्हा पटेलांनी हायदराबाद ला वेढा घातला आणि पर्याय उरला नाही तेव्हा निजामाने गुडघे टेकले आणि मग हायदराबाद भारतात विलीन झाला. https://swarajyamag.com/news-brief/uk-court-verdict-on-hyderabad-nizams-funds-how-pakistans-self-goal-cost-it-35-million-pounds-to-india
पैसे दिल्याचा खुलासा २०१३ मध्ये पाकिस्तान ने ओपन केलेल्या केस मधून झाला. त्यामुळे मीर उस्मान अली खान,हायदराबाद चा सातवा निजाम हा देशभक्त होता वगैरे म्हणण्यात काहीही तथ्य नाही. काही ठराविक वर्गाचे लांगुलचालन बंद करून, https://www.news18.com/news/india/uk-court-dismisses-pakistans-claim-over-nizam-of-hyderabads-funds-rules-in-favour-of-india-2331093.html
थोडा वेळ कट्ट्यावरून उठून जर तुम्ही अभ्यास करून माहिती टाकली तर सुदैवाने जी काही शिल्लक आहे ती तरी वाचेल. मी वरील सगळ्या गोष्टीचे संदर्भ देतो आहे. त्यामुळे, मी खोटा इतिहास लिहून काहीतरी अजेंडा राबवतो आहे असे म्हणणाऱ्यांची तोंडं गप्प होतील !
(13/13)
@threadreaderapp Unroll please
You can follow @malhar_pandey.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.