14 जानेवारी 1761 सकाळी मराठे छावणी मधून बाहेर पडले। अफगाण सैन्याने हल्ला केला. इब्राहिम गारदी व अबदालीच्या उजव्या फळी वरील रोहिले यात युद्ध सुरू झाले। सदाशिवराव भाऊ, विश्वासराव, जनकोजी शिंदे, पवार, गायकवाड, विंचूरकर यानी प्रतिहल्ला केला। तुंबळ युद्ध झाले। अफगाण मध्य फळी.. 1/6
..फोडून मराठे लोण्या मध्ये सुरी सारखी हुजूरात घुसली। वजीर शाहवली पायउतार झाला, आपल्या पळणार्या पठाण सैनिकांना 'काबूल खूप दूर आहे। कुठे चाललात?' सांगून थांबवू लागला। पिछाडीला अबदालीच्या तंबू जवळ मराठे येऊ लागले तसे त्याने आपल्या स्त्रियांना उंटावर पलायन च्या तयारीत बसवले... 2/6
..पुन्हा अफगाण सैन्यातून पळून आलेल्याना लढायला धाडले। दुपार झाली होती. तोच एक गोळी लागून विश्वासराव गतप्राण झाले। इब्राहिम खान जखमी झाला। भाऊ, जनकोजी व तुकोजी शिंदे, पवार, भापकर लढत होते। तुकोजी, पवार, भापकर व शेवटी भाऊ रणांगणावर लढत वीरगती मिळाली। जनकोजीना रोहिल्याने पकडले..3/6
..इब्राहिम गारदी व जनकोजी शिंदे यांची हत्या करण्यात आली। प्रचंड युद्ध संपले. तरी सायंकाळी बिन लढाऊ लोकांची अफगाण सैन्याने कत्तल केली. शिरांचें मनोरे उभे केले। महादजी शिंदे जखमी झाले तो त्यांना राणा खान सुखरूप ग्वाल्हेरला घेऊन आले। नाना फडणीस ही परत आले। मोठी मनुष्यहानी झाली..4/6
..अबदाली दिल्लीत पोचला। नानासाहेब पेशवे झाशी जवळ पोचले होते। अबदालीने शांततेचा प्रस्ताव पाठवला व दिल्ली चा कारभार तुम्ही पहा असा निरोप पाठवून स्वतः काबूलला गेला। माधवराव पेशवे काळात महादजी शिंदे व इतर सरदारांनी दिल्लीवर पुन्हा आपला अधिकार स्थापित करून शाह आलमला तख्तावर बसवला..5/6
..मराठा सत्ता यानंतर पुन्हा उत्तरेत प्रस्थापित होऊन 1783 नंतर 1803 पर्यंत दिल्ली वर स्थिर राहिली। पानिपत येथील नुकसान अशा तर्हेने भरून निघाले। 6/6
हर हर महादेव!
#HindviSwarajya #BattleofPanipat
हर हर महादेव!
#HindviSwarajya #BattleofPanipat