"सेक्यूलर" हा शब्द अनेकांना नीटसा कळत नाही, विवेकानंदांनी तो किती सोपा करुन सांगितला आहे पहा. आश्चर्य म्हणजे हे पत्र त्यांनी १८९८ साली लिहलेले आहे, जेव्हा भारतीय राष्ट्रीय सभा स्थापन होऊन अवघी १३ वर्षे झाली होती, घटना यायला अजून ५० वर्षे वेळ होता.
" जिथं वेद नसतील, कुराण नसेल, बायबल ही नसेल अशा ठिकाणी आपल्याला मानवजातीला घेऊन जायचे आहे. मात्र हे करण्यासाठी आपल्याला वेद, कुराण आणि बायबल मधील सुसंवादी स्वर छेडावे लागतील. आपल्याला मानवाला हे समजावून सांगावे लागेल की धर्म म्हणजे दुसरे तिसरे काही नसून -
एकाच विश्वधर्माची अभिव्यक्ती मात्र आहे, आणि आपलं सर्वांचं एक असणं, हाच या अभिव्यक्तीचा एकमेव अर्थ आहे. तुम्हाला योग्य वाटणारी, झेपणारी कोणतीही वाट निवडा, तुमचं माणूस असणं त्यातून अभिव्यक्त होणार आहे."
(१८९८ साली लिहलेल्या एका पत्रातून )
रिपोस्ट
(संकलन - डॉ प्रदीप आवटे)
(१८९८ साली लिहलेल्या एका पत्रातून )
रिपोस्ट
(संकलन - डॉ प्रदीप आवटे)