आगे आगे देखे...

फेब्रुवारी २०२० मध्ये देशाची राजधानी असलेल्या दिल्ली मध्ये भयंकर दंगली उसळल्या होत्या. त्यानंतर आजपर्यंत या घटनेशी संबंधित झालेल्या न्यायप्रक्रियेमध्ये सातत्याने भर पडत गेली. या प्रक्रियेतील नुकताच घडून गेलेला महत्त्वाचा टप्पा म्हणजे उमर खालिद याला झालेली अटक.
यापूर्वी आम आदमी पक्षातून निष्कासित करण्यात आलेला आमदार ताहीर हुसेन याच्यावर उत्तर-पूर्व दिल्लीमधील दंगलींचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप आहे. चांद बाग येथील वाहनतळात जाळपोळ करणे आणि करावल बाग येथील गोदामात जाळपोळ असे मुख्य आरोप आरोपपत्रामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत.
२४ फेब्रुवारीच्या दुपारी ताहिर आणि अन्य आरोपी लियाकत अली, मोहम्मद आबिद, मोहम्मद शादाब, इरशाद, मोहम्मद रेहान, अरशद प्रधान यांनी ताहिरच्या गच्चीवरून प्रदीप पार्किंग लॉटवर दगड आणि पेट्रोल बॉम्ब फेकले. यानंतर शाह आलम, गुलफाम रियासत अली, अरशद कैय्यम, राशिद सैफी यांनी पार्किंग लॉटमध्ये
जाऊन तेथील शटर तोडून आत प्रवेश केला आणि आतमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना आग लावली. या आगीमध्ये तेथील शेकडो वाहने अक्षरशः भस्मसात झाली. आयबी स्टाफ असलेल्या अंकित शर्माची हत्या केल्याचा आरोपदेखील ताहीरवर आहे. याबाबत तेथील अन्य आरोपी असलेल्या सलमानने अशी कबुली देऊन झाली आहे की;
अंकितचा धर्म कोणता आहे; याची खात्री करण्याकरता आधी त्याचे कपडे उतरवले गेले. खात्री झाल्यानंतर मग त्याला भोसकून ठार करण्यात आले. ही किती पराकोटीची निर्घृणता असेल याचा अंदाजही बांधता येणार नाही.

हे सारे ज्या आरोपपत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे; त्यातच ताहीर हुसेन याच्या साक्षीने
असेही नमूद केले आहे की, या दोन्ही दिवसांमध्ये झालेल्या दंगलींची पूर्ववतयारी ८ जानेवारी २०२० रोजी झालेली होती. त्याने सांगितल्यानुसार आठ तारखेला त्याची भेट शाहीन बागेतील सीएएविरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी उमर खालिद याच्याशी झाली होती. त्यावेळेसच या दंगलीचा बेत आखला गेला!
उमर खालिद हे नाव २०१६ साली सर्वप्रथम चर्चेत आले जेएनयुमध्ये झालेल्या आंदोलनाच्या वेळी. 'भारत तेरे तुकडे होंगे हजार; इन्शाअल्लाह इन्शाअल्लाह' यांसारखे नारे देण्यात आले होते; त्यावेळी उमर खालिद याला त्यातील सहभागाच्या आरोपावरून एका सत्रासाठी निष्कासित करण्यात आले होते. हा तोच उमर
खालिद आहे ज्याने एका वृत्तवहिनीवरील चर्चेत अफजल गुरू ची जाहीर पणे बाजू घेतली होती. खान तशी माती, अशी एक म्हण मराठीत आहे. उमर खालिद ही त्याला अपवाद नसावा. त्याचे वडील सय्यद कासीम रसूल इलियास हे सिमी या प्रतिबंधित संस्थेचे सदस्य होते. सिमी वर प्रतिबंध लागन्यापूर्वी आपण तीचा त्याग
केला होता असे सांगून झाले आहे त्यांचे. मात्र हे जरी खरे असले तरी त्यानंतरची त्यांची वाटचाल लक्षात घेण्याजोगे आहे. सय्यद हे सध्य जमात ए हिंद ह्या संघटनेच्या कार्यकारणी सदस्य आहेत. याशिवाय ते बाबरी मस्जिद संयोजन समितीचे ओण मेंबर आहेत. मुरशीदाबाद मुस्लिम बहुल भागातून त्यांची
निवडणूक सुद्धा लढून झाली आहे. इतकेच नव्हे तर ऑल इंडिया मूस्लीम पर्सनल लॉ बोर्डचे सदस्य असलेल्या सय्यद ने राम मंदिर निर्माणाच्या निर्याणावर पुनर्विचार करण्याची याचिका दाखल केली होती. वरील मराठी म्हण का वापरली हे सुज्ञ वाचकांच्या लक्षात आले असेल.असे असले तरी देखील उमर मात्र स्वतःला
नास्तिक आणि डाव्या विचारसरणीचा पाईक असल्याचे सांगतो. मात्र बहुतांशी वेळी आत्यंतिक कट्टर विचारसरणी ने प्रेरित असलेली व्यक्तिमत्त्वे समाजीक जीवनात अश्या प्रकारचे मुखवटे घालून वावरताना दिसतात. उमर तरी त्याला अपवाद कसा असेल? कमलेश तिवारी ची निर्घृण हत्या झाल्यानंतर काही दिवस
समाज माध्यमांतून हिंदू समाजाला उपदेशाचे डोस पाजण्याचे काम उमर खालिद वारंवार करत होता. एक नास्तिक म्हणून त्याने आपल्याच धर्मांध कट्टरपंथ समाज बांधवांना देणे अशक्य होते का? पण दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे असतात नाही?
उमर खालिद हा 'युनायटेड अंगेंस्ट हेट' या संस्थेचा सदस्य राहिला
आहे. ह्या संस्थेचा संस्थापक खालिद सैफी ह्यालाही दिल्ली पोलीस ने दंगा प्रकरणी अटक केली होती. उमर वर 20 फेब्रुवारी रोजी चिथावणीखोर भाषण केल्याचाही आरोप आहे. भारतातील केंद्र शासनाच्या विरोधात आम्ही आहोत, असे मुस्लिमांनी अमेरिकेतील ट्रम्प सरकार ला दाखवून दिले पाहिजे; ह्या आशयाचे भाषण
जेएनयू मध्ये केल्याचा आरोप उमर वर आहे. ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यावेळी दिल्लीत उसळलेल्या दंगली ह्या दोन्हीं गोष्टींचा परस्पर संबंध आहे का ह्या पैलूंची तपासणी सुरू आहे.

खालिद ला अटक झाल्यावर अपेक्षेप्रमाणेच जमात ए पुरोगामी ने रडारड आणि कांगावा सुरू केला.
तवलीन ने तर उमर मुस्लिम
असल्यानेच त्याला अटक केले आहे ; असेही अकलेचे तारे तोडून झाले.स्वतःला नास्तिक म्हणवणाऱ्या उमर ला तो मुस्लिम असल्याने अटक झाली हा किती हास्यास्पद विरोधाभास आहे पहा!
राणा अय्युब, सिद्धार्थ वरदराजन असे विविध तथाकथित धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी लोक समाजमाध्यमांवरून विधावावीलाप करतानाचे
चित्र पाहायला मिळते. संविधान, देशाची न्यायव्यवस्था यांवर ज्यांचा विश्वास आहे त्यांनी खरे तर आशा प्रकारची भूमिका घेण्याचे कोणतेही कारण नाही. एखादी व्यक्ती निर्दोष असल्यास न्यायपालिकेत तसे सिद्ध होईलच. तोवर आपण कोणत्याही प्रकारचे मतप्रदर्शन न करता जवाबदरीने वागणे हे खरे तर प्रत्येक
भारतीयांचे कर्तव्य आहे. मात्र मुखाने संविधानाचा जप आणि बगल मध्ये नक्षालवादाची सूरी अशी स्तिथी असलेल्या जमात ए पुरोगामीच्या पचनी पडणे हे अवघडच! एखादे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही समाजमाध्यमे, प्रसारमाध्यमे यांच्यासमोर बेछूट आणि बेदिक्कत आरोप करण्याचे काम हे लोक किती खुबीने करतात
हे राम मंदिराच्या खटल्याने प्रदीर्घ कालावधी करीता साऱ्या देशाने अनुभवले आहेच. हीच गोष्ट सध्या उमर खालिद च्या अटकेच्या निमित्ताने सुरू आहे.
ह्यावरून हे लक्षात येईल की, स्वतःला नास्तिक म्हणवून घेणारा मुसलमान हा खरच नास्तिक असेल का, की धर्मनिरपेक्षतेचा खोटा मुखवटा तोंडावर चढवून +
काही हिंदूंना त्यांच्या धर्मापासून दूर भरकटवण्याची योजना आखत असावा. जे हिंदू अश्या लोकांच्या खोट्या बढायांवर भुलतात त्यांनी आपल्याला "आदर्श" असणाऱ्या नास्तिक आणि धर्मनिरपेक्ष व्यक्तीची खोलवर जाऊन शहानिशा करावी..
नाही का @jimodiji तपस्वी बाबा.
बरोबर बोलतोय ना..??
You can follow @abhi_hinduwagh1.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.