मला कायम वाटतं कमरेखालील भाषा आणि शिव्या देणाऱ्या माविआच्या कार्यकर्त्यांच्या ट्विटकडे भाजपच्या कार्यकर्त्यांनी दुर्लक्ष केलं पाहिजे.बीजेपीचे ७० टक्क्याहून जास्त मतदार हे फक्त सुशिक्षित नोकरदार वर्ग आहे याउलट बाकीच्या पक्षांची परिस्थिती आहे.
मविआचे बहुतांश कट्टर समर्थक हे पक्षाचे नसून ते त्यांच्या त्यांच्या नेत्याला वैयक्तिक फायद्यापोटी बांधलेले आहेत त्यामुळे त्यांना स्वाभिमान,मत हे प्रकार नाही.याच उदाहरण भाजपच्या नेत्यांच्या चुकीच्या प्रकरणावर भाजप समर्थक कधीही समर्थन करताना दिसणार नाहीत
ह्याउलट मविआचे कार्यकर्ते वेगवेगळे तर्क देऊन समर्थन करताना दिसतील.त्यामुळे शिवराळ आणी गल्लीच्छ ट्विटने माविआच्या कार्यकर्त्यांना काही फरक नाही पडणार पण भाजपच्या मतदाराला ती भाषा आवडणारी नाही.मुद्देसूद वादविवाद कधीही उजवेच याउलट कमरेखालील भाषा आणि शिव्या स्वतःची किंमत कमी करते.
देशाच्या बाहेर काम करताना मला हे कायम जाणवतं खूप मोठ्या प्रमाणावर एनआरआय लोक ह्याच विचारांवर बीजेपीला ला सपोर्ट करतात,बोटावर मोजता येतील एवढेच काँग्रेसला सपोर्ट करणारे तर सेनेला आणि राष्ट्रवादीला सपोर्ट करणारे अजून भेटलेच नाहीत.दुखावण्याचा हेतू नाही. वैयक्तिक मत. क्षमस्व!!