अतिशय गंभीर लेख...

आय ओपनिंग

"मैकौले च्या तथाकथित आधुनिक शिक्षण व्यवस्थेने भारतवासियांचे कंबरडे मोडुन भावि पिढीचे भविष्य अक्षरशः अंधकारमय केले"

*कुणी उध्वस्त केली भारतीय व्यवस्था

"भारत हा कधीच फक्त कृषीप्रधान नाही तर उद्योग प्रधान देश होता"*
👇
*जळजळीत, उघडी नागडी सत्ये जी प्रत्येक भारतीय व्यक्तीने आपल्या नरड्यात हलाहल म्हणून ओतून घेणे अत्यंत आवश्यक आहे..*

१) आई वडिलांचे गुण लहान मुलांच्यामध्ये उतरतात. मग त्याच गुणांना पोषण देणारे वातावरण असेल तर ती मुले आई वडिलांच्या पेक्षा त्या क्षेत्रात अधिक प्रगती करतात.
👇
हे जेनेटिक्स अर्थात वंशशास्त्राच्या अभ्यासकांनी सुद्धा सिद्ध केले आहे.
२) १००० पैकी ९९९ मुले सामान्य असतात. अद्वितीय किंवा लोकोत्तर गुण घेऊन जन्माला येणाऱ्या लोकांची संख्या अत्यल्प असते.बाकी मंडळी सर्वसामान्यच असतात.
आपल्या जुन्या बाराबलुतेदारीया संकल्पनेला आपण ब्रिटीशांच्या
👇
कृपेने आणि मॅकालेच्या शिक्षणाने संपवून टाकून नक्की काय गोंधळ निर्माण केला आहे आणि हा सार्वत्रिक पातळीवर आपल्या समाजाला कसा उध्वस्त करतो आहे ते समजून घ्या.
*बाराबलुतेदारी म्हणजे एक विशिष्ट प्रकारची रोजगार हमी योजना होती. शेतकऱ्याचा मुलगा शेतकरीच होणार.शेतीचे पारंपारिक ज्ञान तो
👇
आपल्या वडिलांच्या कडून घेणार त्याचा वापर करून स्वअनुभवातून त्यात चार गोष्टी जोडून आपल्या मुलाला देणार. यात पोटापाण्याची चिंता मिटलेली असे*.
*सुताराचा मुलगा हा लहान असतानाच वडील बाजूला काम करता करता तो सुद्धा हातात लाकडाचा तुकडा घेऊन वडिलांचे बघून शिकणार.
👇
तो ज्यावेळी २० वर्षाचा होई त्याचवेळी तो पूर्ण कुशल सुतार झालेला असेल*.
*हीच गोष्ट बारा बलुतेदारी मधील प्रत्येक व्यक्तीची होती. त्यांना गणित येत नव्हते आणि ते अनपढ होते हे तुमच्या मेंदूत शिरवणारे लोक पहिल्या दर्जाचे नीच आहेत.कारण बारा बलुतेदारी मधील प्रत्येक कार्य करायला तुम्हाला
प्राथमिक स्वरूपाचे ज्ञान लागणार आहे ते तुम्हाला तुमच्या पित्याकडून प्राप्त होणारच आहे*.

ब्रिटीशांचे पांढरे पाय या देशात उमटण्याच्या आधीपासून आपल्याकडील लोक सर्वोत्कृष्ट दर्जाची उत्पादने बनवत होती. *आपण जगाच्या व्यापारात २३ % हिस्सा बाळगून होतो आणि तो फक्त मसाल्याचा नव्हता.
👇
त्यात उत्कृष्ट दर्जाचे कापड होते .*
अत्युत्कृष्ट दर्जाच्या शोभेच्या वस्तू होत्या. जगाला कितीतरी धातू शेकडोवर्षे पुरवठा करणारा एकमेव देश हा आपला बहुमान होता. यापैकी मुख्य धातू म्हणजे जस्त आहे. शुद्ध जस्त ओतून काढणे हे शेकडो वर्ष जगाला ज्ञात नव्हते. ते तंत्रज्ञान फक्त आपल्याकडे
👇
होते. चीन ने आपल्याकडून चोरून नेले.
दगड, लाकूड, धातू , वस्त्र या सगळ्यांवर केले जाणारे नक्षीकाम संपूर्ण जगात आपल्या तोडीचे कुठेही होत नव्हते. आपली मंदिरे, हलाखीत जगणारे काष्ठ शिल्पी, हलाखीत जगणारी विणकर मंडळी म्हणजे या वैभवाच्या भग्न खुणा आहेत.
*जर शिक्षणाचा उद्देश हा त्या
👇
ज्ञानाचा वापर करून पोट भरणे ,चरितार्थ चालवणे हा असेल, भरपूर पैसे कमावणे हाच असेल तर या जुन्या कलाकार मंडळींच्या पैकी कोण भिकारी होता ??
यांना भिकेला आपण लावले आहे. यांना भिकेला ब्रिटीशांच्या शिक्षण पद्धतीने लावले आहे आणि हे सत्य आपल्या निर्बुद्ध मेंदूमध्ये कधी शिरणार हा यक्ष
👇
प्रश्न आहे.
अलेक्झांडर उर्फ सिकंदर आपल्या देशावर हल्ला करायला का आला माहिती आहे ???
*भारतात एक तगर नावाचे गाव होते. तेथील कापडाचा दर्जा इतका उत्कृष्ट होता की तगर चे कापड वापरणे हे सिकंदराच्या राज्यात श्रीमंतीचे,ऐश्वर्याचे लक्षण मानले जाई. तगर च्या कापडाची इतकी मागणी वाढली की
👇
तेथील स्थानिक कापड उद्योग बंद पडायची वेळ आली. मग सिकंदराने तगर येथील कापडावर अतिरिक्त कर बसवला. तरीही त्या कापडाची विक्री कमी झाली नाही. खुश्कीच्या मार्गाने तगर प्रतिष्ठान पुढे खैबरखिंड करत आपल्याकडील उत्पादने जगभरातील बाजारपेठेमध्ये जात होती. सिल्क रूट च्या गप्पा चीन मारतो.
👇
चीन च्या काही कोटी पट आपला व्यापार होता.*

हे तगर गाव कोणते आहे माहिती आहे का ??
तगर म्हणजे तर. उस्मानाबाद/ धाराशिव जवळचे तेर नावाचे गाव. *डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचा मतदारसंघ. आज जाऊन पहा. कापडातील क तिथे दिसणार नाही. ते सगळे तंत्रज्ञान समूळ नष्ट झाले आहे.*
👇
जुन्याकाळात सामान्य लोक आपल्या आई वडिलांचाच व्यवसाय पुढे चालवत असत. यात पिढीजात कौशल्य अंगी असे. या शिवाय आई वडिलांच्या हाताखाली लहानपणाच्या पासून ते काम केल्याने तारुण्यात पदार्पण करेपर्यंत ते कौशल्य सर्वार्थाने विकसित झालेले असे. त्या तरुणाला त्याची उपजीविका चालवता येईल
👇
इतके त्याच्या क्षेत्रातील ज्ञान वीस वर्षाचा असताना प्राप्त झालेले असे.
१००० मधील ९९९ लोकांच्यासाठी ही पद्धती उत्तम होती. त्यांच्या चरितार्थाचा प्रश्नच निर्माण होत नसे.
आता जो विरळा हजारातील एक असे. तो त्याला आवडेल ती वाट चोखाळेल त्यासाठी त्या क्षेत्रातील तज्ञ माणूस गाठेल आणि
👇
शिकेल. हे करताना जे त्रास होतील ते सहन करेल पण आपल्याला आवडेल तो मार्ग तो चोखाळू शकत असे.
यात काहीही गैर नव्हते. सामाजिक चौकटीत याची मुभा होती.
*आपल्या प्राचीन ऋषी मुनींच्या मते कोणतेही ज्ञान, कोणतीही विद्या संपूर्ण शिकायला १२ वर्षे लागतात. मग ८व्या वर्षी मुंज झाली. त्यानंतर
👇
त्यातील कौशल्य पाहून त्याने त्या विषयाचा अभ्यास सुरु केला की तो २० वर्षाचा होईतो पूर्ण ज्ञानी होईल. मग शिल्प कला असेल , नृत्य असेल , पारंपारिक बारा बलुतेदारी असेल किंवा राजा, अथवा अधिकारी बनवणारे गुरुकुलातील शिक्षण असेल. पण २०वर्षाचे होईतो तुम्ही त्यात पूर्ण निपुण झालेले असता.
👇
आणि तुमच्या कौशल्याची परीक्षा घेऊन तुम्हाला नोकरी मिळू शकत असे.*
जो नृत्य,संगीत शिकणार असेल तो त्या गुरूकडे १२ वर्ष फक्त तेच आणि तितकेच शिकेल. त्या जोडीला व्यावहारिक प्राथमिक शिक्षण जे असे ते घरी ८ वर्षाचा होईतो मिळालेले असे. आणि तो व्यक्ती विज्ञान , इतिहास किंवा अन्य कोणतेही
👇
ज्ञान जे घेईल ते त्याच्या नृत्य किंवा संगीत या क्षेत्रात त्याला जितके लागणार आहे तितकेच घेईल अतिरिक्त नाही. पण त्यामुळे त्याचे काहीही अडणार नाही.
*आपल्याकडील हजारो वर्ष टिकतील अशी मंदिरे, त्यावरील शिल्पकला हे सगळे या फुलप्रूफ यंत्रणेचेच यश होते. आपली आर्थिक समृद्धी आपल्या
👇
शिल्पींच्या सर्व क्षेत्रातील या उत्कृष्ट लोकांच्या उत्तम पर्फोर्मंस चेच यश होते.*
लोहार असेल , सुतार असेल , चांभार असेल, सामान्य असेल तरी खाऊन पिऊन सुखी होते. कौशल्य असेल तर त्या क्षेत्रातील शिल्पी होऊन भरपूर संपत्ती कमावणारा असे.
हे व्यवसाय म्हणजे त्यात्या लोकांची जात होती.
👇
परंतु
हे संपूर्ण नेटवर्क ब्रिटिशांनी उध्वस्त केले.
आज तथाकथित समानता आली आहे. यामुळे काय झाले ? बारा बलुतेदारीतील प्रत्येक बलुतेदार, शेतकरी, ब्राह्मण सगळेच्या सगळे आपल्या मुलांना एकाच शैक्षणिक चरकात घालतात. शिक्षण सुरु होते ३वर्षाचे असताना. ज्याला बेसिक शिक्षण म्हणू ते पूर्ण
👇
होते १५ वर्षाचे असताना. दहावीमध्ये.
या १२ वर्षात ते मुल काय शिकले आहे ?
देशाचा आणि जगाचा इतिहास, भाषा, गणित, विज्ञान. यापैकी कोणते ज्ञान वापरून त्याला दोन वेळेस खायला काही मिळू शकते ??? कोणतेच नाही कारण त्याच्यासारखे १० लाख विद्यार्थी हेच ज्ञान घेऊन उभे आहेत.
👇
मग आता तीन शाखा झाल्या. कला , वाणिज्य आणि शास्त्र पुढे दोन वर्ष शिका. त्यातून काही रोजगारासाठी मिळाले का ? नाही.
मग पदवी मिळवा.
बेसिक पदवी मिळाली २० वर्षाचा होताना. शिक्षणात घातली १७ वर्षे. या बेसिक पदवीच्या शिक्षणावर तो कोणती नोकरी मिळवू शकतो ?
कारकून, चपराशी, छोटा फिल्ड
👇
सेल्समन, डिलिव्हरी बॉय, हॉटेल मधील वेटर.
या साठी तो किती वर्ष शिकला १७ वर्ष. आणि हेच काम करू शकणारे १० लाख स्पर्धक त्याच्या समोर उभे आहेत. फक्त राज्य या पातळीवर. देशाचा विचार केला तर २ कोटी निश्चित असतील.

👉जर इंजिनियरिंग ला गेला. तर मेकॅनिकल मध्ये त्याला पहिल्या वर्षी काय
👇
शिकवतात ?
किती प्रकारच्या फाईल्स असतात ? त्यांचा वापर करून कसे तुम्ही घासू शकता.
असे ज्ञान जे पारंपारिक लोहार आपल्या मुलाला गम्मत म्हणून एखादी गोष्ट घासायला देताना ८ वर्षाचा असताना शिकवेल ते आपण १८ वर्षाच्या मुलाला सांगतो आहोत इंजिनिअरिंग मधे आणि त्यासाठी तो पोरगा काही
👇
लाख रुपये मोजतो आहे. इतके करून फायलिंग करणे ही कला फक्त डायमेकर आदी मंडळींच्या साठी उरली आहे बाकी कोणीही याचा वापर करत नाही. आमच्या वेळी लेथ चालवायला शिकवायचे आज सगळीकडे CNC मशीन्स आल्या आहेत.
पारंपारिक मशीन्स चा वापर वेगाने कमी होतो आहे.
या सगळ्याचे प्रतिबिंब शिक्षणात उमटते
👇
आहे का ?
४ वर्षाच्या अभियांत्रिकी कोर्स मध्ये मुलांना बेसिक्स पण माहिती असावे म्हणून हे शिकवणे त्यांना भाग आहे कारण बेसिक माहिती नसेल तर पुढे त्याना आकलन कसे होईल ?
पण बेसिक तुम्ही जर १८ व्या वर्षी शिकवणार असाल तर तो पूर्ण कुशल अभियंता कधी होईल ?
👇
३० वर्षाचा झाल्यावर ???
यापेक्षा भयानक स्थिती वैद्यकीय क्षेत्राची आहे.
४.५ वर्षाची पदवी मग पुढे २-३ वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि पुढे कुठेतरी उमेदवारी आणि मग खऱ्या अर्थाने चांगली नोकरी अथवा व्यवसाय. म्हणजे तो मुलगा किंवा मुलगी खऱ्या अर्थाने पायावर कधी उभे राहणार ???
👇
३० वर्षाचे झाले की ?
त्या नंतर लग्न..
प्रत्येक पुरुष आणि स्त्री विशिष्ट वयात प्रौढ होतात. कामभावना जाग्या होतात. त्या वयाच्या पासून पुढे १२ वर्ष आपण काय करतो आहोत ?
तर ते दाबून शिक्षणाच्या चरकात लोटतो आहोत.
३० वर्षाचे होईतो मुलांना आई बाप पोसत आहेत.
👇
त्यामुळे आई बापांच्या प्रमाणे यांची मानसिकता होते आहे. त्यानंतर लग्न झाले की मग बायकोशी आणि नवऱ्याशी कसे पटेल ?
तारुण्याचा, प्रेमाचा पहिला बहर ओसरल्यावर लग्नकरून ते नाते तितके उत्कट निर्माण होईल का ?
आणि १८-३०या कालखंडात ज्याच्या कुणाच्या बद्दल प्रेम असेल आणि त्यामुळे जवळीक
👇
निर्माण झाली असेल. ती पहिली सुखद आठवण आहे ती या नात्याच्या आड कळत न कळत कितीवेळा येते याची गणना करणेच अशक्य.

*आधुनिक विवाहाचा जर पायाच तिशी असेल तर तो विसविशीत असणार यात नवल ते काय ?*

लग्न ही संकल्पना तरुण अथवा तरुणी स्वतःच्या पायावर उभे रहाणे अर्थात स्वतःचे आणि कुटुंबाचे
👇
पोट भरण्यास सक्षम होणे याच्याशी निगडीत आहे. ज्यावेळेस ही पात्रता येईल लग्न करा.
सध्याच्या शिक्षण पध्दतीमुळे जर हे वयच ३०+ होत असेल, तर लग्न ही सामाजिक समस्या होऊन बसली तर त्यात नवल ते काय ?
मग यात जोडीला आर्थिक स्थैर्य, आवडनिवड, जात-पात आदी मुद्दे जोडत गेले तर मग हे अधिकाधिक
👇
कठीण होत जाते .
लग्न या समस्येच्या कडे पाहायचे असेल तर शिक्षण या क्षेत्रातील मूर्खपणा संपवणे आवश्यक आहे.
समाजाच्या निम्न स्तरात बघा. त्यांच्यात लग्न लवकर होते. मुले लवकर होतात. आणि हे चक्र त्यांचे आजही जुन्या पद्धतीनेच चालू आहे. मुस्लिमांच्या मध्ये सुद्धा तुम्हाला हेच चित्र
👇
दिसेल.
ब्रिटीश हे कोणत्याही प्रकारे आपल्या देशाचे हितचिंतक नव्हते.. त्यांनी केलेली प्रत्येक सुधारणा त्यांच्या स्वार्थाच्या पायी होती. ज्याप्रमाणे मुस्लीम आक्रमकांनी या देशाला लुटले आहे तेच काम ब्रिटिशांनी गोड बोलून केले आहे..
👇
You can follow @Howling_Swade.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.