लोकशाहीची विटंबना नेमकी कोणी केली?

#थ्रेड 👇

ते तिकडे अमेरिकेत काही ट्रम्पसमर्थकांनी तिथल्या संसदेवर हल्ला केल्याची बातमी पसरताच इथल्या लिब्राडूंनी लगेच आपली अक्कल पाजळत मोदींवर टीका करायला सुरुवात केली.

भारताला हे असलं काही खरंच नवीन नाही. जेव्हा जेव्हा मोदीविरोधी विचार +
जनतेने लोकशाही मार्गाने नाकारला तेंव्हा तेंव्हा ह्या लिब्रांडूंनी लोकशाहीला धक्का लागेल असाच मार्ग स्वीकारला आहे. त्या मार्गाने नाही तर निरनिराळ्या मार्गाने लोकशाहीला मजबूत धक्के देण्याचा प्रयत्न काँग्रेसी आणि लाल्यांनी बर्याचदा केलाय.

◆ पंतप्रधानांची हत्या ज्या देशात +
ज्या पक्षाने गांभीर्याने घेतली नाही त्याचा आणि लोकशाहीचा काय संबंध, जिथे राजाचा मुलगा अक्कलशुन्य जरी असला तरी त्यालाच राजा बनवले जाते?

◆ ह्यांना इंदिरा गांधींनी लादलेली क्रूर अशी आणीबाणी दिसत नाही..

◆ सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिम स्त्रियांची छळापासून सुटका व्हावी म्हणून +
निर्णय दिला असताना त्याला रद्दबातल ठरवण्यासाठी विशेष कायदा आणताना लोकशाहीने पेढे वाटले होते?

◆ संसदेने पारित केलेला कायदा भर पत्रकार परिषदेत फाडताना लोकशाहीची लक्तरे वेशीवर टांगली गेली नव्हती?

◆ मोदींच्या विजयानंतर ईवीएमवर दोषारोप करताना लोकशाही धोक्यात येत नाही?+
◆ निवडणूकपूर्व युती निवडणुकीनंतर तोडताना लोकशाही तुटत नाही?

◆ वीस वर्षे शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे घोंगडे हेतुपुरस्सर भिजत ठेवताना लोकशाही धोक्यात येत नाही. त्यावर कायदा करून राज्यात तो लागू करायचा आणि त्याच्या विरोधात कोणतेही ठोस शेतीपूरक धोरण नसताना दीर्घ आंदोलन करून जनमानसाला+
वेठीस धरताना लोकशाही आनंदाने नाचत असते?

◆ जो कायदा आपल्याला लागूच नाही त्याविरोधात इतिहासातले सर्वात मोठे आंदोलन पुकारणे लोकशाहीच्या कोणत्या तत्वात बसते?

◆ लोकशाही मार्गाने स्पष्ट बहुमत मिळवल्यावर #NotMyPM किंवा #Toomuchdemocracy सारखे हॅशटॅग, संसदेवर हल्ला करण्यापेक्षा +
वेगळे आहेत?

उलट जेंव्हा जेंव्हा भाजपाचा पराभव झाला तेंव्हा "आम्ही पराभवाचे चिंतन करू "अशीच भूमिका शीर्षनेतृत्वाने घेतली कोण्या दुसर्यावर आरोप नं करता..

अशी कित्येक घटनांची जंत्री सादर करू शकतो, अगदी काँग्रेस आणि डावे सत्तेत असताना घेतलेल्या निर्णयांची. पण ना ते स्वीकारणार ना +
हे. ह्यांना शक्य असतं तर हिंदूंना जगण्याचा अधिकार काढण्यापर्यंत ह्यांची मजल गेली असती. काश्मिरात वेगळं काय घडलं होतं?

मोदी शासनाने आणलेले कायदे, घेतलेले निर्णय ह्यात केस लॉज दाखवून, तत्वभंग दाखवून लोकशाहीची कशी हानी झाली हे अभ्यासपूर्ण दाखवावं. मराठी, हिंदी इंग्रजी म्हणाल ती +
भाषा, वाद घालायला तयार आहे.

परदेशात कोणी मूर्ख काही करतो त्याचा संबंध लगेच मोदींशी लावून आपण मोदींचे जनसमर्थन वाढवत आहोत, ह्याची तिळमात्र कल्पना ह्या स्वयंघोषित सिक्युलरलिब्रांडूंना कधीच कशी येत नाही? हल्ली हा प्रश्नसुद्धा पडेनासा झालाय..+
फक्त परदेशात हिंदूंची पाडलेली मंदिरं, गुण्यागोविंदाने रमणारा हिंदू समाज ह्यांना दिसत नाही. खरे आंधळे तर हेच..

असो..

थांबतो..

जय हिंद..

- चेतन दीक्षित
You can follow @mechetandixit.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.