'क्षत्रीय कुलावतंस हिंदुपदपातशहा' अशी बिरुदावली असणाऱ्या छत्रपतींना एका भटजीने 'शूद्र' म्हणून हिणवले. इथेच वेदोक्ताची ठिणगी पडली आणि छत्रपती शाहू महाराज सामाजिक बंडखोरीस उद्युक्त झाले. १८९९ मध्ये कोल्हापुरात हे प्रकरण सुरु झाले, नंतर एक-दोन वर्षात याचा भडका उडाला आणि 👇
यातून तीव्र सामाजिक संघर्ष उभा राहिला. या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आणि शाहू महाराज हे बहुजन समाजाचे उद्धारक म्हणून जनतेसमोर आले.

हे प्रकरण समजून घेताना आपण आधी वेदोक्ताची पार्श्वभूमी समजून घेऊया.

वेदोक्त म्हणजे काय?
वेदोक्त म्हणजे वेदांत सांगितल्याप्रमाणे.👇
ब्राम्हण श्रेष्ठत्वाचा सिद्धांत समाजाच्या माथी मारण्यासाठी शेकडो वर्षांपासून धर्मशास्त्रांचे ग्रंथ, मनुस्मृती, पुराणे वगैरे निर्माण केली गेली. "ब्राम्हण व्यक्ती अविद्वान असो की विद्वान असो, ते मोठे दैवत आहे" असे मनुस्मृती मध्ये सांगितले गेले.👇
वेदोक्ताची ठिणगी कशी पडली?

शाहू महाराज कार्तिक मासात नियमितपणे पहाटे पंचगंगेत स्नान करत असत. स्नान चालू असताना नारायण भटजी मंत्र म्हणत असे. एकेदिवशी महाराजांचे स्नेही प्रकांड पंडित राजाराम शास्त्री भागवत महाराजांसोबत होते. स्नान चालू असताना राजाराम शास्त्रींच्या लक्षात आले की👇
तो भटजी स्वतः स्नान न करता वेदोक्त मंत्रांऐवजी पुराणोक्त मंत्र उच्चारित होता. राजाराम शास्त्रींनीं ही गोष्ट छत्रपतींच्या निदर्शनास आणून दिली आणि महाराजांनी त्या भटजीला याचा जाब विचारला. त्यावर तो भटजी म्हणाला "शूद्राला पुराणोक्त मंत्र सांगावे लागतात."👇
एका भटजीने 'क्षत्रिय कुलावतंस हिंदुपदपातशहा' अशी बिरुदावली असलेल्या छत्रपतींना शूद्र म्हणून हिणवले आणि वेदोक्ताची ठिणगी पडली.

वेदोक्ताचे प्रकरण हे काय नवीन नव्हते. याआधी १६७४ साली छत्रपती शिवाजी महाराज, १८३५ साली छत्रपती प्रतापसिंह महाराज आणि👇
१८९६ साली बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या बाबतीत हा वेदोक्ताचा प्रसंग उभा राहिला होता. १६७४ साली तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला आक्षेप घेऊन 'मराठ्यांच्या क्षत्रियत्वाला' आव्हान दिले गेले होते. महाराजांनी हिंदुस्तानातील ब्राम्हणांचा👇
सर्वश्रेष्ठ नेता गागाभट्ट यांनाच पाचारण केले आणि त्यांच्या तोंडून आपले क्षत्रियत्व जाहीर करून महाराष्ट्रातील ब्राह्मणांची तोंडे बंद केली.

वेदोक्ताच्या प्रसंगी शाहू महाराज ऐन तारुण्यात होते. आपल्या सेवकाने आपल्याला शूद्र म्हणावे ही गोष्ट त्यांच्या खूप जिव्हारी लागली होती.👇
हळूहळू कोल्हापुरातील मराठा लोकांत संतापाची लाट उसळू लागली. खरे तर ब्राम्हणवर्गातील पुढाऱ्यांनी या प्रकरणात थोडा सुज्ञपणा दाखवायची गरज होती मात्र ते छत्रपतींचे कुल क्षत्रिय कसे नाही हे सिद्ध करण्याच्या पाठीमागे लागले. प्रो. विष्णू गोविंद विजापूरकर यांच्यासारख्या नेत्यांनी👇
या धुमसणाऱ्या संघर्षात तेल ओतण्याचे काम केले. विजापूरकरांच्या 'ग्रंथमाला' मासिकास कोल्हापूर दरबार कडून सात वर्षे अनुदान मिळत होते ते जून १९०१ मध्ये महाराजांनी बंद केले त्यामुळे विजापूरकर चवताळले आणि छत्रपती आणि मराठे यांच्यावर बेलगाम टीका करू लागले.👇
मराठ्यांतील फक्त भोसलेच क्षत्रिय व बाकीचे मराठे शूद्र ही भूमिका शाहू महाराजांना सामाजिक अन्यायाची वाटली. दरम्यान शाहू महाराजांच्या दत्तक आई आनंदीबाई राणीसाहेबांचे अंत्यसंस्कार वेदोक्तरीत्या करण्यास आणि राजवाड्यातील धर्मकृत्ये वेदोक्तरीत्या करण्यास कोल्हापुरातील ब्रम्हवृंदाने👇
नकार दिला होता त्यामुळे हे प्रकरण आणखीनच चिघळले. त्यात करवीर पीठाचे शंकराचार्य ब्रह्मनाळकर स्वामींनी छत्रपतींच्या क्षत्रियत्वाला आव्हान दिले आणि या प्रकरणाचा भडका उडाला. दरबारचे मुख्य पुरोहित आप्पासाहेब राजोपाध्ये यांना महाराजांनी वारंवार इशारा दिला मात्र ते आपल्या भूमिकेवर👇
ठाम राहिले. महाराजांनी त्यांना राजसेवेसाठी दिलेले ३० हजारांचे इनाम जप्त केले. शंकराचार्यांच्या मठाचे ५० हजारांचे उत्पन्न सरकारजमा करून ब्रह्मनाळकर स्वामींना तडाखा दिला. ज्यांनी धार्मिक विधी वेदोक्त पद्धतीने करण्यास नकार दिला अशा शेकडो ब्राह्मणांची अनुदाने व इनामे जप्त केली.👇
आणि १९०२ साली कोल्हापूर संस्थानच्या प्रशासनातील ५०% जागा मागासवर्गीयांसाठी राखीव केल्या. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील ब्राम्हण वर्ग संतप्त झाला आणि ब्राह्मणी वृत्तपत्रांमधून महाराजांवर विखारी टीकेचा भडीमार सुरु झाला. या सर्व रणधुमाळीत ब्राम्हण पक्षाचे कैवारी होते लो. टिळक.👇
हा संघर्ष जवळपास ६-७ वर्षे चालला. कोल्हापूरच्या राजोपाध्यांनी त्यांचे वतन जप्त झाल्यानंतर सार्वभौम ब्रिटिश सत्तेकडे न्यायासाठी धाव घेतली. मे १९०५ मध्ये गव्हर्नर जनरलसाहेबांनी राजोपाध्यांची केस फेटाळली आणि शाहू महाराजांचा विजय झाला. महाराजांनी वतने, इनामे जप्त केली त्यामुळे 👇
ब्रह्मवृंदाच्या अर्थप्राप्तीवर परिणाम झाला. ब्रिटिशांनी केस फेटाळल्यामुळे सर्वच आशा मावळल्या आणि ब्रह्मवृंदाने महाराजांसमोर शरणागती पत्करली. ब्रह्मनाळकर स्वामींनी महाराज क्षत्रिय असून त्यांना वेदोक्ताचा पूर्ण अधिकार असल्याचे कबुल करून क्षमायाचना केली. पण महाराजांचा हा विजय👇
महाराष्ट्रातील संपूर्ण ब्राम्हणवर्गाने मान्य केला असे नाही. अधून मधून उकळ्या फुटत राहिल्या मात्र त्यात पूर्वीसारखी हवा नव्हती. वेदोक्ताच्या मंत्रांनी आपला उद्धार होणार नाही याची शाहू महाराजांना पुरेपूर जाणीव होती. पण हा वेदोक्त मंत्रांचा प्रश्न नव्हता तर 👇
तर हा सामाजिक न्यायाचा प्रश्न होता. ब्राह्मणांना वर्णश्रेष्ठत्वाचा अहंकार होता आणि त्याला शाहू महाराजांनी शह दिला होता. हे सर्व प्रकरण १८९९ ते १९०५ या कालखंडात घडले. या टप्प्यात शाहू महाराजांनी चातुर्वर्ण व्यवस्था नाकारलेली नव्हती. १९१० नंतरच्या काळात महाराजांनी वर्णश्रेष्ठत्व,👇
जातीभेद, अस्पृश्यता यांविरुद्ध लढा पुकारला. वेदोक्तातील अनुभवामुळे सर्व हिंदूंना वेदोक्ताचा अधिकार देणाऱ्या आर्य समाजाकडे आणि ब्राह्मणशाहीच्या मक्तेदारीविरुद्ध लढणाऱ्या सत्यशोधक समाजाकडे शाहू महाराज आकर्षित झाले.
👇
संदर्भ : राजर्षी शाहू महाराज जीवन व कार्य | लेखक : डॉ. जयसिंगराव पवार

क्रमशः

#राजर्षी_शाहू_महाराज

#खऱ्या_स्वातंत्र्याचे_शिल्पकार
You can follow @Digvijay_004.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.