आई कुठे काय करते..???

मला तर ह्या कार्यक्रमाच्या नावातच काही तथ्य नसल्याचे जाणवते. खरच जर आई काय करत नसते ना तर जगातले 90 टक्के लोकांना जीवन इतके सरल आणि सहज जगता आले नसते.

आई...!!!
बाप घराचे अस्तित्व आहे तर आई घराचे मांगल्य...!!!

आई सारखी दुसरी संपत्ती आणि व्यक्ती असूच +
शकत नाही. ही संपत्ती परत केव्हाही न मिळणारी आहे.
तुमच्या आयुष्यात आई वडील समान बरीच माणसे असतील, काका-काकू, मामा-मामी, मावशी-काका, आत्या-मामा, आजी-आजोबा किंवा आजून कोणी पण खरंच सख्या आई वडिलांची जागा कोणी घेऊ शकते का...???
माझ्या मताने जगात तो व्यक्ती खुप भाग्यशाली आहे ज्याला +
आई वडिलांची साथ आणि सहवास लाभतो.
ते म्हणतात ना 'स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.'
प्रत्येकाच्या जीवनात आईचे स्थान हे एकमात्र.
नसत्या जिजाऊ तर नसते घडले शिवराय आणि शंभुराय. नसते घडले महाराष्ट्र आणि स्वराज्य, नसता राहिला हिंदू धर्म. नसते तुमचे आमचे अस्तित्व.

आईचे महत्त्व +
तेव्हाच कळते जेव्हा तिची उणीव जाणवते.
पण वेळ निघून गेलेली असते. जगात अशी कोणतीही जागा नाही जिथे आईला शोधता येईल एकदा ती गेल्यावर. म्हणून जिवंतपणी तिची जितकी सेवा करताल पुण्य आणि आनंद तुमच्या आवाकी पेक्षा जास्त मिळेल.

आमची मम्मी...
नेहमी हसत राहणारी. आयुष्यात संकट कितिही
+
मोठे असू दे नेहमी हसत सामोरी गेलीये. चिंतेचा क्लेश कधीच तिच्या चेहऱ्यावर दिसला नाही मला.
लहानपणी 7 वीत असताना शाळा सोडली. कारण घरात खानावळ होती. मुंबई सारख्या ठिकाणी खानावळ चालवणे म्हणजे कामाची सवय हवी. तशी घरात 2 नंबरची मुलगी. पण एकूण भावंडे 5. मोठ्या मावशीच्या लग्नानंतर +
घराची जवाबदारी हिने उचलली. आणि घर चालवले ते ही लग्न होईपर्यंत. लग्नानंतर आराम मिळेल असे वाटले होते पण एकत्र परिवार आणि ज्या मुलाशी लग्न झाले तो घरात थोरला. त्यालाही भावंडे 4 आणि तेही लहान. मग काय लहान दिरांना आणि नंदांना अगदी लहान भावंडांसारखे सांभाळले मम्मी ने. सकाळी 5 वाजता +
दिवस सुरू व्हायचा तो अगदी रात्री 11 पर्यंत पण कधीही दमलेली दिसली नाही कोणाला.
मग माझा जन्म.पहिला दिवटा. घरात आनंद उत्सव झाला. मग बहीण,आणि तिच्या पाठोपाठ भाऊ.
पण भावाच्या जन्मानंतर वडिलांची कंपनी बंद पडली आणि दिवस हालाकीचे आले.
मम्मी ने ते पण दिवस हसत खेळत काढले.मला अजूनही आठवते +
आम्ही लहान पणी आंघोळीनंतर टॉवेल आणि चड्डी सुद्धा मम्मी कडे मागयचो. घरातले काम कधी करूनच नाही दिले इव्हन ताई ला सुद्धा नाही ती मुलगी असून. सगळे म्हणायचे आग पोरीला कामाची सवय लाव. ही म्हणायची राहूदे लग्नानंतर मुल आणि चूल संभाळायचीच आहे.
आता करू दे मज्जा.

माझ्या दोन्ही मावश्या +
आमच्या मामांना म्हणतात तुम्हाला अक्का चीच लय काळजी आम्ही बहिणी नाहीत का? आजीचा पण कल हिच्याकडे जास्त. सासू सासरे पण आमच्या कडेच जास्त राहिले. कारण बाकी दोघी सुना तब्येत खराब होऊ नये म्हणून फिकट जेवण द्यायच्या. आणि आमची मम्मी अरे खाऊ दे रे हाल हाल करून जास्त दिवस जगण्यापेक्षा +
मज्जा करून आहेत ते दिवस त्यांना जगू दे. 10व्या ला सगळेच त्यांचे आवडते पदार्थ आणतात पण जिवंतपणी ते त्यांच्या पोटी जाऊ दे. आशीर्वाद मिळतात आपल्याला.

गावाला गेली की सगळ्यांच्या घरी जाणार, विचारपूस करणार, तासंतास गप्पा हणणार.
वडील म्हणायचे हिला ना गावाला आनलीच नाय पाहिजे. +
आता पर्वाचीच गोष्ट आजारी आहे म्हणून मांड भरण्याचा कार्यक्रम होता. गावात वाजंत्री कीर्तनाचे पैसे घेतात, आणि ज्याचे मांड असतात काम पण त्यांनीच करायचे असते. पण आक्ख गाव आलं मदतीला एकही पैसा कोणी घेतला नाही, अगदी पोशाख सुद्धा नाही कोणी घेतला. मम्मी तर अक्खा दिवस झोपूनच होती. +
माणसे कामावलीत तिने.
आणि का नाही कोण येणार, हिने नेहमी सगळ्यांना मदत केलीये. हसवलंय, आनंद वाटलाय.
मला गाडी घ्यायची होती. महाग होती म्हणून मी पैसे साठवायचो पण हिच्या हॉस्पिटललाच जायचे. पण हिला त्याचे खूप दुःख.मला म्हणायची दादा माझ्यामुळे तुझी गाडी राहतीये रे बाळा. +
देव करो मी नीट होवो लवकर नाही तर मुक्त होवो.आसा काळजाला वार बसायचा.मग मी ओरडायचो तिच्यावर.मम्मे तुझ्यापेक्षा का गाडी महत्वाची आहे का?आग तू सोबत असशील तर जग जिंकणार आपण.आणि मग एक समाधानाचे स्मित हास्य द्यायची आमची म्हातारी.
म्हातारी म्हणल्यावर म्हणायची म्हातारी तुझी आई आणि हसायची+
पण नेहमी हसणारी गेली 2 वर्ष अतोनात त्रासात आहे. तसे 7 वर्ष झाले त्रास सुरू होऊन किडनीचा.
पण एप्रिल 2020 मध्ये तिला हार्ट ऍटॅक आला, एन्जोप्लास्टी झाली आणि त्यामुळे दोनदा डायलासीस केला. तेव्हापासून ताजेपणा गलेले, वाळलेले पुष्प झालीये. आधी मध्ये असती व्यवस्थित पण अधून मधून त्रास +
असतो. म्हणून तर मी स्वयंपाक शिकलो. कारण मम्मी ला माझे वडील आणि भावाच्या हातची भाजी आवडत नाही. ती म्हणते दादा तुझ्या हाताला चव आहे. मला जेवण तूच देत जा.
माझी मैत्रीण आहे माझी मम्मी.
सगळ्या मैत्रिणींना भेटलीये, मित्रांना सुद्धा.

पर्वा पोटात दुखत होते तर मला म्हणाली दादा जा +
शेवटी राजांचा हुकूम आहे. शिवकार्य सोडू नको. मी नीट आहे. त्या पोरींच्या आई वडिलांना गरज आहे तुझ्या सारख्यांची. तू जा.

पण काल खूप त्रास झालाय. सकाळी हॉस्पिटल ऍडमिट केलंय. डायलासीस सांगितलंय कारण क्रियाटिन आणि पोट्याशिएम वाढलय त्यामुळे हार्ट 30% वर्किंग आहे.

काळीज चिरल जात +
जेव्हा जगातल्या सर्वात अमूल्य व्यक्तीला ICU बेड वर टोचलेल्या सुया, नाका तोंडात असलेल्या नळ्या, कोमेजलेला चेहरा, प्राणवायू चा मास्क, श्वास घेण्यास त्याची चाललेली उलाढाल. अश्या अवस्थेत बघून.

आईसारखं दुसरं धन नाही आयुष्यात.
असेल तर आपण श्रीमंत असतो, नसेल तर भिकारी.
मित्रहो तिला +
दवा तर चालू आहे दुवेची गरज आहे. तुमच्या प्रार्थनेची आवश्यकता.🙏🙏
@vinay1011 @real_amruta @That_Pune_Guy2 @devharshada @LakhobaLokhande @DoctorBirdy @mangeshspa @PunekarVoice @Joglekar09 @yuga_v108 @Sonal_Rv @raje35202418 @SumantVinita @angarajkarna @lostsoul2507 @3_suhani
You can follow @abhi_hinduwagh1.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.