हल्ली विवाह समारंभ म्हटला की तो आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची जणू फॅशनच सुरू झाली आहे , कुठे नवरदेव हेलिकॉप्टर मधून येतो तर कुठे नवरी चकक घोड्यावरुन येते , (1/8)
तर एका लग्न समारंभात नवरी प्रवेशद्वारापासून बहल्यापर्यंत चक्क डान्स
करत आली हे आपण पाहिले असेल पण नुकताच नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील कानडगाव येथील लग्नसमारंभात चक्क राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रार्थना सामुदायिक रीत्या म्हणून आणि भारत माता पूजन करून वधू वर (2/8)
करत आली हे आपण पाहिले असेल पण नुकताच नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील कानडगाव येथील लग्नसमारंभात चक्क राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रार्थना सामुदायिक रीत्या म्हणून आणि भारत माता पूजन करून वधू वर (2/8)
बोहल्यावर चढले . भारत माता पूजन आणि संघाच्या प्रार्थनेने सुरू झालेला बहुधा जगातला हा पहिलाच विवाह समारंभ असावा . (3/8)
कानडगाव येथील श्री विठ्ठल भानुदास गागरे यांची कन्या सोनाली व निभेरे येथील भानुदास गेनुजी ढेपे यांचे चिरंजीव गणेश यांचा शुभविवाह नुकताच सोनगाव येथे थाटामाटात संपन्न झाला पण या विवाह समारंभाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला . (4/8)
वधू - वरांनी मंडपात प्रवेश करताच मध्यभागी सजवलेल्या मंचकावर जाऊन भारतमातेच्या प्रतिमेची पूजा केली व तदनंतर कानडगाव मधील महिला व युवकांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवर दररोज केली जाणारी देशभक्ती ची प्रार्थना एका सुरात गायली जाऊ लागली तेव्हा मंडपातील सर्व उपस्थित हात (5/8)
जोडून शांतपणे उभे राहिले . हा अभिनव असा पायंडा गागरे ढेपे कुटुंबीयांनी पाडल्याबद्दल व - हाडी मंडळीकडून त्यांचे कौतुक होत होते . कानडगावात गेले अनेक दिवसांपासून संघाचा साप्ताहिक कुटुंब मिलनाचा उपक्रम चालू असल्याचा हा परिणाम म्हणावा लागेल . (6/8)
संघाची प्रार्थना संघाच्या शाखे व्यतिरिक्त अन्यत्र कुठेही म्हणण्याचा प्रघात नाही आणि विवाह समारंभात तर मुळीच नाही म्हणूनच हा विवाह समारंभ जगातला पहिलाच विवाह समारंभ असावा की या समारंभानिमीत्त अयोध्येतील प्रभु श्री राम मंदीर निर्माणा निधी साठी दोन्ही बाजुकडच्या (7/8)
कुटुबिंयांनी आपला खारीचा वाटा म्हणुन निधीही समर्पित केला!!!






संघ शक्ती युगे युगे
(8/8)






संघ शक्ती युगे युगे
