अत्यंत विशेष आणि नाविन्यपूर्ण माहिती
वाचनाची,ज्ञानाची आवड असलेल्या सुज्ञ मंडळींनी जरूर वाचावेअसा धागा
रानात भटकायला गेल्यावर अमक्याला‘चकवा’ लागला ‘बाहेरची बाधा’ झाली,अशा गोष्टी कुणाकुणाकडून ऐकायला मिळतात.वनस्पती अभ्यासकांच्या मते या ‘चकव्या’लाही वनस्पतीशास्त्रात काही आधार आहे
त्याचा संबंध भुताखेताशी नसून ठरावीक वनस्पतींचं स्वयंसंरक्षणासाठीचं ते एक शस्त्र आहे. नुकत्याच झालेल्या पर्यावरण दिनाच्या (५ जून) निमित्तानं..जंगलातल्या काही जागा मंगल वाटतात. केवढं प्रसन्न आणि रमणीय वाटतं तिथे. याचा अर्थ तिथे सकारात्मक ऊर्जेचे प्रवाह वाहत असतात
(2)
. तर काही जागा गूढ, रहस्यमय शक्तींनी भारलेल्या असतात असं वाटतं, आणि त्या आपल्याला अस्वस्थ करतात. तिथे नकारात्मक ऊर्जेचं प्राबल्य असतं. त्या ऊर्जेच्या संपर्कात माणूस आला, की माणसाचं संतुलन बिघडतं. तो भारलेल्या अवस्थेत जातो. कधी आजारीही पडतो. अशी भारून टाकणारी एक
(3)
अरण्यशक्ती तिथे असते. या अरण्यशक्तीचे, निसर्गऊर्जेचे अनेक अनुभव, अरण्य हेच आपलं घर मानून, सारं जीवन अरण्यात घालवणाऱ्यांना येतात. रानावनात पडणारा चकवा किंवा पडणारी ‘रानभूल’ म्हणजे पानाफुलांतील, वृक्षवेलींतील अज्ञात गूढ शक्तीचा अनुभव! त्याबद्दलचे थरारक अनुभव ऐकले, की
(4)
मन थक्क होतं. रानभुलीला तशी अनेक नावं आहेत. गोंड आदिवासी याला ‘झोटिंग’ अथवा ‘सावडीत’ म्हणतात आणि त्याला भुताखेताचा प्रकार मानतात. खेडय़ापाडय़ातले लोक ‘बाहेरची बाधा’ म्हणतात. पण तो अंधश्रद्धेचा विषय नाही.काही झाडांच्या संपर्कात आल्यास, काही वेगळंच चतन्य जाणवू शकतं.
(5)
मनाची बेचनी थांबते. उदा. उंबर आणि कोजाब (वटवृक्ष कुळातलं एक झाड). जंगलातल्या अनेक वृक्षवेलींमध्ये, झाडाझुडपांमध्ये अनेक प्रकारची शक्ती आहे. ती आपल्या जाणिवेच्या पलीकडे असल्यामुळे गूढ वाटते. मात्र ही शक्ती सर्वच वृक्षवेलींत नसते, ठरावीक परिसरात ती आढळते.
(6)
डॉ. जगदीशचंद्र बोस यांनी सिद्ध केलं आहे, की झाडांना भावभावना असतात. समोरच्या व्यक्तीबद्दल नकारात्मक भावना येताच, म्हणजे त्या व्यक्तीची दुष्ट भावना उमजून झाडं, वृक्ष-वेली भीतीनं आकसतात. काही झाडं-फुलं सूर्यास्तानंतर मिटतात. तसंच सर्व वनस्पती संगीतामुळे बहरतात. आपण
(7)
वातावरणातला प्राणवायू श्वासांद्वारे शरीरात ओढून घेतो आणि उच्छ्वासाद्वारे कार्बन-डाय-ऑक्साइड वातावरणात सोडतो. हा वायू वातावरण दूषित करतो. पण वृक्षवल्ली तोच ओढून घेऊन प्राणवायू पुरवतात हे सिद्ध झालं आहे. म्हणजे वातावरण शुद्धीकरण करण्याची वृक्षांना समज आहे. त्यांच्याजवळची ही
(8)
उपजत अरण्यशक्ती विलक्षण आहे.

प्राचीन वेदांमध्ये वृक्षांबद्दलची ही जाणीव दिसून येते. ऋग्वेदात विविध वनस्पतींचं माहात्म्य वर्णन करून त्यांना हे देवत्व का दिलं आहे हे वर्णिलं आहे. यजुर्वेदात कोणत्या वनस्पतीचं कोणत्या यज्ञात कोणत्या वेळी हवन करणं स्वास्थ्यास उपयुक्त आहे
(9)
, ते सांगितलं आहे. अथर्ववेदात विविध वनस्पतींचा उपयोग विविध आजारांमधे कसा करावा, हे सांगितलं आहे. साध्या खरचटण्यापासून ते बुद्धिभ्रंश, अपस्मार, क्षय आदी मोठय़ा आजारांवरही वनस्पतींचा कसा उपयोग करावा याबद्दल अनुभवसिद्ध माहिती दिली आहे.

भृगु ऋषींच्या सांगण्याप्रमाणे
(10)
अतिउष्णतेमुळे वा थंडीमुळे वृक्षांची पानं, फळं, फुलं म्लान होतात. याचा अर्थ त्यांना थंडी वा उष्णतेचं स्पर्शज्ञान असतं. वारा,आग किंवा वीज पडणं यांमुळे वृक्ष, त्यांची पानं, फळं विदीर्ण होतात. दूषित पाणी दिल्यास वृक्ष व्याधीग्रस्त होतात. तर निरनिराळं खाद्य, माती, पाणी
(11)
दिल्यावर किडलेले, खुरटलेले, रोगी वृक्ष बरे होऊन पुन्हा बहरून फळं-फुलं देतात. त्या अर्थी त्यांना गंधाचं व चवीचं ज्ञान आहे. पानांच्या श्वासोच्छ्वासादरम्यान काही प्रमाणात पाण्याची वाफही वातावरणात सोडली जाते. त्यामुळे साहजिकच झाडांच्या सावलीतील तापमान २ ते ३ अंशांनी कमी असते
(12)
. अनेक वृक्षवल्लींत पंचेंद्रियांची गूढ शक्ती असते. अर्थात त्या शक्तीचीजंगलात येणाऱ्या प्रत्येक परक्याचं अस्तित्व ही घूसखोरी वाटल्यामुळे त्यांना ती सहन होत नाही. आपल्याला उपद्रव व इजा करण्यासाठीच कुणीतरी आलेलं आहे अशी त्यांची समजूत होते. मग त्यांची स्वसंरक्षणासाठी
(13)
प्रतिक्षिप्त क्रिया, हालचाल होते. काही वृक्षवेली आपण त्यांच्या जवळपास जाताच पानाफुलांतून उग्र गंध सोडून त्रस्त करून सोडतात. त्या उग्र गंधाचा परिणाम सौम्य किंवा तीव्र भूल दिल्यासारखा होतो. परिणामी प्राणिमात्रांना गुंगी येते. प्रत्येकाच्या मनोबलानुसार कमी-जास्त प्रमाणात
(14)
स्मृतिभ्रंश होतो. त्यामुळे आजूबाजूच्या व्यक्ती, दिशा यांचं भान राहात नाही. आपण कुठे आहोत, कुठे चाललो आहोत, कुठे जायचं आहे, हे कळेनासं होतं. मेंदू बधिर होतो, आणि मागे, पुढे, डावीकडे, उजवीकडे जाण्याचा रस्ता सापडत नाही. फिरून फिरून व्यक्ती त्याच जागेवर येते. हीच रानभूल! हाच
(15)
चकवा, आणि हेच झोटिंग! तीव्रता कमी-जास्त असू शकते. या रानभुलीत सापडल्यानं कमकुवत मानसिकतेच्या व्यक्तीचं मानसिक संतुलन बिघडू शकतं. काही वेळा तर त्याचा इतका प्रचंड परिणाम होतो, की त्यावर कोणत्याही उपचारांचा लवकर परिणाम होत नाही. ती व्यक्ती अर्धबेशुद्धावस्थेत राहते. आफ्रिकेत
(16)
तर संपूर्ण माणूस गिळंकृत करणारं एक झाड आहे. काही वनस्पती दिवसा, तर काही सूर्य मावळल्यानंतर रातराणीसारखा उग्र गंध सोडतात.

स्वसंरक्षणासाठी वेली माणसाला तीव्र गंधाद्वारे गुंगवतात, भूल पाडतात. रानभूल ठरावीक अंतरापर्यंत आणि ठरावीक वेळेपर्यंत आपल्या मेंदूचा कब्जा घेते. चार
(17)
-पाच व्यक्ती एकत्र असल्या तरी त्या एकमेकांना ओळखत नाहीत. या भुलीच्या सीमेबाहेर जाताच त्याचा परिणाम, गुंगी कमी होते. खंबीर व भक्कम मनाच्या व्यक्ती मात्र अशा रानभुलीतून बाहेर पडू शकतात. कमकुवत मनाच्या व्यक्तींवर मात्र त्याचा दीर्घ काळ परिणाम राहू शकतो. जंगलातले प्राणी,चरायला
(19)
गेलेली गुरं, शेळ्या-मेंढय़ा, गुराखी, लाकूडफाटा गोळा करायला गेलेले बायका-पुरुष, खेडूत, आदिवासी यांनाही चकवा लागतो. ते भ्रमिष्ट होतात, फिरून फिरून त्याच जागी घुटमळतात. शेवटी थकून, कंटाळून भुताटकी समजून घाबरतात.अशाभ्रमिष्ट झालेल्या व्यक्तींवर प्रसंगी मांत्रिकाकडून अघोरी उपायही
(20)
केले जातात. पण चकवा, रानभूल हा अंधश्रद्धेचा विषय नाही, ती एक नसíगक अरण्यशक्ती आहे. या शक्तीच्या अस्तित्वाचे संकेत रानभुलीसारख्या अनुभवातून मिळतात.

नवेगाव अरण्यातल्या अशाच एका अनुभवाची गोष्ट. नवेगाव अरण्यातला निसर्ग आणि वन्यजीवांचं निरीक्षण करण्यासाठी शाळा-महाविद्यालयांच्या
21
सहली सतत जातात. एकदा एका शाळेतर्फे पाच दिवसांचं शिबीर तेथे भरवलं गेलं होतं. प्रत्यक्ष जंगलात वास्तव्य करून अरण्यवाचन शिकवलं जात होतं. वन्यजीव आणि त्यांची पर्यावरणातला समतोल राखण्यात होणारी मदत याबद्दलची माहिती दिली जात होती. काही वेळानंतर सर्वानी दुपारच्या जेवणासाठी परतीची
23
वाट धरली. वाटेवरच्या पाणवठय़ावर मुलं तहान भागवण्यासाठी थांबली. तेव्हा त्यांची गणती केली गेली. पुढे शिक्षक विश्रांतीसाठी थांबल्यावरही सर्व मुलामुलींची गणती केली. सर्व मिळून २४ जण होते. तिथून त्यांचा कॅम्प ३ किलोमीटर अंतरावर होता. निघताना पुन्हा गणती केली. सर्व २४ जण उपस्थित
24
होते. थकव्यामुळे सर्वाची चाल मंदावली. पुढे १ किलोमीटरनंतर मागे-पुढे चालणाऱ्यांची गणती केली असता २ मुली आणि १ शिक्षिका दिसेनात. त्या थकव्यामुळे सावकाश मागे चालत असतील असं समजून मागे जाऊन त्यांना शोधलं, सर्वानी खूप हाकाही मारल्या. पण काहीच प्रतिसाद येईना. मागच्या पाणवठय़ावरही
25
शोधलं, पण त्या तिघी कुठेच दिसेनात. सूर्य डोक्यावर तळपू लागला. बाकी मुलामुलींना कॅम्पवर पोहोचवण्यात आलं,आणि त्या तिघींचा पुन्हा बारकाईनं शोध घ्यायला सुरुवात झाली. तेव्हा मात्र धास्ती वाटू लागली. तेवढय़ात अचानक एका नाल्यापुढे ओलसर मातीत मुलींच्या पायांचे ठसे दिसले.त्यांना साद
26
घालत घालत, शोधपथक निघालं. नाल्यातून तसंच २ किलोमीटर चालत गेल्यावर मोहाच्या एका झाडाला टेकून ती शिक्षिका सुन्नपणे बसलेली दिसली. तिच्या कुशीत त्या २ छोटय़ा मुली थकूनभागून पहुडल्या होत्या. शोधपथक आनंदानं त्यांच्याजवळ गेलं.पण त्यांनी त्यांना ओळखलं नाही. तिघींना हलवलं तरी त्यांनी
27
कसली हालचाल केली नाही. त्या भान हरवल्यासारख्या बसल्या होत्या. एकूण परिस्थितीवरून त्या रानभुलीच्या चक्रव्यूहात सापडल्याचं लक्षात आलं. त्यांना आधार देऊन उठवलं, आणि १ किलोमीटर चालत आणलं. दरम्यान, शोधार्थ निघालेली वन विभागाची जीप तेथे आली. काही वेळानं त्या शुद्धीवर आल्या. पुढे
28
आकाशवाणी’वरच्या कार्यक्रमासाठी त्यांचे अनुभव ध्वनिमुद्रित केले गेले. तेव्हा ती शिक्षिका म्हणाली, ‘‘आम्ही सर्वाच्या मागे चालत होतो. तेवढय़ात एका मुलीला रस्त्याच्या डाव्या बाजूला सुंदर फुलं दिसली. ती तोडायचा मोह अनावर झाला, म्हणून तिघीही फुलांजवळ गेलो. तोच कसलातरी उग्र गंध आला
29
You can follow @ShivsambhG.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.