तो सोन्याचा दिवस उजाडला.आज महात्मा फुलेंनी काढलेली मुलींची पहीली शाळा उघडणार होती.महात्मा फुलेंनी साविञीला सांगितले की मी पुढे जाऊन मुलींना गोळा करून शाळेत जातो,तू घरातील सर्व कामे आवरून शाळेत ये… कामे आवरून साविञी घराबाहेर पडली.डोईवर पदर घेऊन साविञी रस्त्याच्या कडेनं निघाली.
खडक ओलांडून ती रामेश्वराहून बेलबागेकडे आली.आणि तिच्या डोक्यावर पाण्याचा वर्षाव झाला.कुणीतरी मुद्दामच तिच्या अंगावर पाणी ओतल होत.पदरान तोंड पुसत साविञी चालत राहिली.इतक्यात शेणाचा एक गोळा फतकन तिच्या पुढ्यात येऊन पडला.त्यापाठोपाठ शब्दही आले “टवळी निघाली धर्म बुडवायला”
साविञीनं शांतपणे शेण ओलांडून पुढचा मार्ग धरला.रस्त्याच्या दुतर्फा काही टगे उभे असल्याचं तिला दिसल.ती रस्त्याच्या मधून चालू लागली.शाळेतल्या मुलीपुढे ती आज प्रथमच उभी राहणार होती.तिच्या मनात त्या मुलींनीच गर्दी केली होती.
रस्त्याच्या दुतर्फा उभ्या टाकलेल्या टग्यांचे हावभाव तिला दिसत नव्हते.त्यानीं दिलेल्या शिव्याशाप तिला ऐकू येत नव्हते.तिच पुढे पडणार प्रतेक पाऊल त्या टग्याच्यां संतापात भर टाकत होत.आणी मग त्या संतापाने विवेक सोडला.एक धोंडा भिरभिरत आला आणि साविञीच्या कानशिलावर आदळला,साविञी कळवळली,
नकळत धोंडा लागल्याजागी तिचा हात गेला आणि तो रक्तानं भरला.ते रक्त बघून तिच्या डोळ्यात आग प्रकटली.पण पुढच्या क्षणी तिन स्वःताला सावरत आणी आपला वेग वाढवला,शेणमारा आणी धोंडेमार करूनही साविञी शाळेत गेली हे बघितल्यावर पिसाळलले भट बेलबागेत एकञ जमले.
जोती आणी त्याची बायको बघत नाहीत हे कळून चूकल्यान त्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. “अरे,हा धर्माचा नाश उघड्या डोळ्यानीं बघण्यापेक्षा मुळा-मूठेत बुडून मरा” असा म्हातारा भट बडबडला.तर “धोंडे मारून त्या सटवीचा कपाळमोक्ष केला तरी सटवी थांबली नाही आता तिला हात धरवून थांबवायची का ?
असा प्रश्न एका टग्याने केला.म्हातारा म्हणाला “काही करून त्या रांडेची शाळा बंद करायला हवी.अरे धर्मशास्ञानूसार स्ञीला विद्या देऊ नये याच तिन उल्लघंन केल.ही आग वेळीच आवरली नाही तर ति घरदार जाळीलच व धर्माची राखरांगोळी करील”
इकडे कानशीलावर पदर ओढून साविञी शाळेत गेली.
इकडे कानशीलावर पदर ओढून साविञी शाळेत गेली.
जोतीबा व मुली तिची वाटच बघत होत्या.झाल्या प्रकाराबद्दल साविञी एकही शब्द बोलली नाही.तिन मुलींना शिकवायला सुरवात केली.मन एकाग्र करून ती पहिल्या दिवशी मुलींना आई शब्द लिहण्यास शिकवला.सर्व मुली ‘आई’ हा शब्द उच्चारू लागल्या,कानशिलावर धोंडा बसला तेव्हाही तिच्या डोळ्यात आसवं आली नव्हती,
पण त्या मुलींच्या तोंडातून येणार्या ‘आई’ शब्दावर तिचे डोळे जणू आसवांचा अभिषेक करू लागली.एक मुलगी जवळ येऊन म्हणाली ‘माई,तूम्ही का रडता ? तसेच मुलींना साविञीच्या कानशीलावर रक्तही दिसलं, ‘माई, तूम्ही लागल म्हणून रडता ? तेवढ्यात साविञी डोळ्याची आसवे पुसत म्हणाली.
“नाही ग मुलीनों,मी रडत नाही,तूमच्या हातानां शब्द फुटताना बघून आनंदाने माझे डोळे भरून आलेत गं.तूम्ही हातात धरलेल्या या पेन्सीलनें स्ञी जातीच भाग्य लिहायला सुरवात केलीय. तूम्ही शिकाल. तूमच्या घरात आता ज्ञानाचा प्रकाश उजळेल” अशा प्रकारे साविञीमाई फुले यांच्या शाळेचा पहिला दिवस होता
प्रथम स्त्री शिक्षिका, मुख्याध्यापिका म्हणून सावित्रीबाई फुले यांची ओळख ठरली.मिञानों, आज आपण शाळा-महाविद्यालयातून शिक्षण घेऊन मोठ्या मोठ्या पदावर गेलोत,हे शिक्षण आपल्याला देण्यासाठी एके काळी कुणीतरी दगड- गोटे, शिव्याशाप खाल्ला आहे, हे नेहमी लक्षात असू द्या.