#Thread: छत्रपतींच्या पेशव्यांची स्वामीनिष्ठा

‘पेशवा’ हे शिवछत्रपतींच्या अष्टप्रधान मंडळातलं प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च पद होतं. खुद्द छत्रपती ‘पेशवा’ नेमत होते.

‘पेशवा’ हे एक पद आहे जात नाही. तरी देखील विकृत लोकांनी नेहमीच ‘पेशव्यांवरुन’ जातीयवाद केलेला आहे.

१/११
बाळाजी विश्वनाथांपासून दुसऱ्या बाजीरावांपर्यंत प्रत्येक पेशव्याने सदैव छत्रपतींची आणि स्वराज्याची सेवा केली.

बाळाजी विश्वनाथ, थोरले बाजीराव आणि नानासाहेब ह्यांना तर खुद्द पुण्यश्लोक शाहूछत्रपतींची सेवा करण्याचा मान मिळाला.

२/११
बाळाजी विश्वनाथांनी धनाजीराव जाधव व कान्होजी आंग्रे ह्या थोर सरदारांना शाहूछत्रपतींच्या बाजूने वळवलं.

राजकारण करुन मोगलांकडून दख्खन ची चौथ व सरदेशमुखीचा हक्क मिळवला. एवढंच नव्हे तर धर्मवीर शंभूराज्यांच्या पत्नी महाराणी येसूबाईसाहेब ह्यांना देखील मोगलांच्या तावडीतून सोडवलं.

३/११
थोरल्या बाजीरावांच्या पराक्रमाबद्दल जितके बोलावे तितके कमीच. त्यांचा पराक्रम तर B-ग्रेडी सुद्धा लपवू शकले नाहीत.

खालील २ छायाचित्र बघा. थोरल्या राऊसाहेबांची स्वामीनिष्ठा आणि अजातशत्रु छत्रपती शाहू महाराज ह्यांचा त्या निष्ठेवर असलेला विश्वास आणि प्रेम लगेच दिसून येईल.

४/११
शिवभूषण निनादराव बेडेकर ह्यांनी सांगितलेला हा👇🏼किस्सा ऐका.

ही होती थोरल्या बाजीराव पेशव्यांची स्वामीनिष्ठा.

५/११ https://twitter.com/accountantvarun/status/1275847866125336578
थोरले बाजीराव पेशवे सतत मोहिमांवर असल्यामुळे साताऱ्याच्या दरबारात त्यांचं प्रतिनिधीत्व नानासाहेब करत असत.

नानासाहेब हे खुद्द शाहूछत्रपतींच्या सावलीत मोठे झाले. छत्रपती हे नानासाहेबांचे गुरु असं म्हंटलं तरी हरकत नाही.

महाराजांनीच नानासाहेबांना राजकारणात धुरंधर बनवलं.

६/११
शाहूछत्रपतींचा नानासाहेबांवर खूप विश्वास होता.

महाराजांनी त्यांच्या मृत्युपूर्वी स्वत:च्या हाताने ही दोन आदेश पत्र नानासाहेबांसाठी लिहीलेली.

खुद्द रियासतकार सरदेसाई ह्यांनी त्या पत्रांचा इंग्रजीत केलेला अनुवाद👇🏼

७/११
नानासाहेब पेशव्यांसाठी छत्रपती शाहू महाराज गुरुस्थानी होते.

महाराजांच्या मृत्युनंतरही नानासाहेबांनी त्यांचं राज्य सेवाभावाने चालवलं.

शाहूछत्रपती नानाहेबांना किती आदरणीय होते त्यासाठी हे👇🏼वाचा. मन अभिमानाने भरुन येईल.

८/११ https://twitter.com/TheDarkLorrd/status/1337759128790290433
१८१८ मध्ये इंग्रजांनी कपट करुन मराठा साम्राज्यावर विजय मिळवला.

ह्या नंतर फक्त २ पदांवर बंदी आणण्यात आली - छत्रपती आणि पेशवा.

मराठा साम्राज्याचे छत्रपती प्रतापसिंह महाराज हे फक्त साताऱ्याचे राजे बनून राहिले आणि दुसऱ्या बाजीरावांवर स्वत:ला ‘पेशवा’ म्हणवून घेण्यावर बंदी आली.

९/११
दुसऱ्या बाजीरावांना बिठुरला पाठवण्यात आलं.

इंग्रजांनी त्यांना स्वत:ला ‘महाराज’ म्हणवून घेण्याची परवांगी दिलेली.

पण दुसऱ्या बाजीरावांनी स्वत:ला कधी ही ‘महाराज’ म्हणवून घेतलं नाही.

१०/११
‘पेशवा’ हे पद शिवछत्रपतींनी स्थापन केलय.

कुठल्याही पेशव्याने कधीही छत्रपतींचा अपमान केला नाही. सदैव छत्रपतींच्या व मराठा साम्राज्याच्या सेवेसाठी आयुष्य वेचलं.

तरी देखील विकृत इतिहासकार,B-ग्रेडी आणि लायकी नसलेले राजकारणी जातीयवादासाठी पेशव्यांना बदनाम करतात हे दुर्भाग्य.

११/११
You can follow @TheDarkLorrd.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.