आपल्याकडे शिक्षण ही एक लक्झरी होती. त्याची लक्षणं आपल्याला मिथके, पुराणे इत्यादिमधून दिसत राहतात. म्हणजे कर्णाला जातीमुळे नाकारणारे परशुराम असोत किंवा एकलव्याला न लाभलेले द्रोणाचार्य असोत... आपल्याकडची अमुक गोष्ट दुसऱ्याने शिकू नये याची इतकी काळजी लागलेली असे की देवाची स्तोत्रे
लिहिताना देखील "हे अपात्राला शिकवेल तो नरकात सडेल" वगैरे त्यात सांगून ठेवलेलं असे !! त्यात मग गुरूने शाप दिला तर शिकलेलं डोज्यातून नाहीसं होतं वगैरे कथा आल्या... मग त्यात पुढे आम्ही कसे गुरूच्या घरी पाणी भरू, पाय चेपू म्हणणारे कलाकारही आले.
खरंतर खरं शिक्षण ते असतं जे शिकवणाऱ्याला शिव्या दिल्या तरी तुमच्याजवळ कायम राहतं! कृतज्ञ असणे हा शिकलेलं लक्षात राहण्याशी असंबंधित विषय आहे. गुरू गुरू करून आपल्याकडे शिक्षणाचे पुरोहित डोक्यावर घेतले गेले. याच कारणासाठी गुरुचे नांव घेताना कानाला हात वगैरे लावणाऱ्या लोकांबद्दल मला
विलक्षण घृणा आहे. आपण गुरू गुरू करून पायावर डोकी घासत राहताना समाजाला अनिष्ट अशा एका शैक्षणिक पुरोहितशाहीला ग्लॅमर देत आहोत हे गुरुभक्तीने अंध मंडळींना कळत नाही. पण गुरुभक्ती प्रचलित असल्याने तसं न वागणाऱ्यांना उद्धट, कृतघ्न वगैरे समजले जाते. मात्र तसे असले तरी अयोग्य आहे म्हणून
अशा पुरोहितशाहीला लाथ मारणे हे बुद्धिवाद्यांचे नैतिक कर्तव्य आहे. म्हणूनच...
फुलेंना अजून एक गुरू करून टाकू नका. फुलेंनी शिक्षण नाकारणाऱ्या व्यवस्थेला आव्हान देण्याचं क्रांतिकारक काम केलं. त्यांचा वारसा चालवायचा असेल तर
फुलेंना अजून एक गुरू करून टाकू नका. फुलेंनी शिक्षण नाकारणाऱ्या व्यवस्थेला आव्हान देण्याचं क्रांतिकारक काम केलं. त्यांचा वारसा चालवायचा असेल तर