"मम्मा शू...आलीये..." आपला फ्राॅक पकडून, रडवेला चेहरा करून तीन वर्षांची गोड मुलगी आपल्या आईला सांगत होती. "इथं नाहीए वाॅशरूम बाळा... थोडी कळ सोस आपण पुढं पाहू..." असं तिची आई तिला म्हणाली... पण पुढे जाऊनही त्यांना वाॅशरूम काही मिळालं नाही...

एका महिलेला संपूर्ण आयुष्यात ज्या
परिस्थितीला सामावून घ्यायचं असतं त्या "लघवी कंट्रोल करणं" प्रकरणाची जाणीव कदाचित त्या लहान लेकराला यावेळी नक्कीच झाली असेल. किंबहुना अनेक महिलांना ती याच लहानपणी होते...

एका पेट्रोल पंपावर गाडीतून दोन महिला बाहेर आल्या. महिला म्हणजे तीन वर्षांची लहान मुलगी व तीची आई... दोघींचाही
कासावीस झाला होता. पुन्हा त्या गाडीत बसून पुढे गेल्या. त्या दोघींचाही तो चेहरा मनाला त्रास देणारा ठरला. आम्हा पुरुषांचं ठीक असतं. कुठंही असो, गाडी थांबवली की आपलं आडोसा धरून उरकता येतं. पण या महिलांची काय हालत होत असेल... "आम्ही बायका खूप वेळ कंट्रोल करू शकतो..." असं या महिला
म्हणतात खरं, पण मी म्हणतो अशी वेळच का महिलांवर यावी..

प्रवासात लघवीला आल्यास प्रसाधनगृहांच्या अभावी, आपलं घर, ऑफिस किंवा काॅलेज येईपर्यंत लघवी कंट्रोल करून ठेवणा-या महिला खूप आहेत.. पण हे जे काही कंट्रोल करणं आहे, ते खरंतर फार वाईट आहे. यामध्ये एखादी ज्येष्ठ महिला, गर्भवती महिला
अन्य व्याधींनी ग्रस्त महिला असेल तर फारच भयंकर परिस्थीती म्हणावी लागेल...

एका बाईच्या आयुष्यात अनेक प्राॅब्लेम असतात... मात्र या सर्वांमध्ये गेल्या काही वर्षात सर्वात मोठा प्राॅब्लेम मला पाहायला मिळतोय तो महिला प्रसाधनगृहांचा. प्रवासात लघवीला येणं आणि प्रसाधनगृह उपलब्ध न होणं ही
गंभीर बाब आहे. साधी नैसर्गिक क्रिया करण्यासाठीही महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतोय... आपण २०२१ मध्ये प्रवेश करत असलो तरी, महिलांसाठीची प्रसाधनगृहांच्या सुविधांबाबत आपण खरंच मागे आहोत...

सार्वजनिक ठिकाणी असणारी प्रसाधनगृहं, एसटी बस डेपोमधील प्रसाधनगृहं, प्रवासात या गाड्या ज्या
ज्या ठिकाणी थांबतात ती प्रसाधनगृहं, एखाद्या पर्यटनस्थळी गेल्यानंतर तिथली प्रसाधनगृहं, कोणत्याही सरकारी ऑफिसमधील प्रसाधनगृहं, यांच्या अवस्थेबद्दल महिलांना वेगळं सांगायला नको. प्रसाधनगृहातील ती अस्वच्छता पाहिल्यावर लघवी करणं टाळणा-या महिलांचीही संख्या खूप आहे.

हायवेला पाच पाच
मिनीटांवर हाॅटेल्स असतात. पण सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून तिथल्या प्रसाधनगृहांमध्ये जायलाही अनेक महिला बिथरतात. मोठ्या बायकांचं सोडा हो... एखादी आईही आपल्या लहान मुलीला आज उघड्यावर लघवीला बसवण्यास घाबरते... अनेकदा प्रसाधनगृह उपलब्ध झाली तरी त्या ठिकाणी गर्दुल्ल्यांची कमी नसते.
केंद्र शासनाच्या नियमांनुसार ज्या ज्या ठिकाणी पेट्रोल-डिझेल पंप आहे, त्या ठिकाणी पंप चालकांना स्वच्छ वाॅशरूमची सुविधा उपलब्ध करून देणं अनिवार्य आहे, परंतु हा नियम फक्त फाट्यावरच मारला जातो.

शासनानं या प्रश्नाकडं अधिक लक्ष देणं गरजेचंय... आईला, बहिणीला, बायकोला व गर्लफ्रेंडलाही
लघवीला येते व त्या उघड्यावर बसू शकत नाहीत याचं भान २०२१ मध्येतरी, आया बहिणींचं हित जपणा-या राज्य व केंद्र सरकारला येणं गरजेचंय.

कारण हा विचार केवळ प्रसाधनगृहांच्या उपलब्धतेचा नाही, तर "वाॅशरूम नसल्यामुळे महिलेला कराव्या लागणा-या लघवी कंट्रोलमागच्या असह्य वेदनेचाय."
@BhaktiJogal
You can follow @mayabhai88.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.