विद्यार्थी आत्महत्या ह्या वर कधी कोणाला बोलताना पाहिले आहे का?

सर्वाधिक दुर्लक्षित झालेल्या विषयावर आज थोडे बोलुया...

#अनुजचे_बंध_आणि_बरेच_काही ह्या मालिकेतील हा दूसरा #थ्रेड

वेब सेरीस:13 Reasons Why
Jay Asher ह्यांच्या पुस्तकावर आधारित ही वेब सेरीस हाईस्कूलचे विद्यार्थी आणि त्याच्या आयुष्याच्या भोवती फिरते.Hannah Baker ह्या विद्यार्थिनी हीच्या आत्महत्येच्या घटनेभोवती फिरते,आपल्या मृत्युला जवाबदार असलेल्या 13 लोकांसाठी ती एक कैसेट रेकॉर्डिंग् सोडून जाते...
विविध कथांद्वारे शो आत्महत्या, लैंगिक अत्याचार, गुंडगिरी, वंशविद्वेष, जॉक संस्कृती, मानसिक आरोग्य, मादक पदार्थांचे व्यसन, मद्यपान, घरगुती हिंसाचार, होमोफोबिया, हद्दपारी, पोलिस क्रौर्य यासह आधुनिक तरूणांवर परिणाम करणारे अनेक सामाजिक विषयांचे अन्वेषण करते आणि त्यांचे वर्णन करते.
स्टिरॉइडचा वापर, बेघरपणा, एचआयव्ही, गर्भपात अश्या सगळ्या गोष्टीतून त्या मुलीचा व तिच्या मित्रांचा प्रवास अत्यंत वेदनादायी पद्धतीने दाखवला आहे.त्या 13 लोकांन मधे तिचे मित्र शिक्षक आणि समाज व्यवस्था किती कारणीभूत आहे हे आपल्या लक्षात येते.
एक महिलाच जेव्हा एका महिलेचा आदर ठेवत नाही तेव्हाच नैदानिक ​​नैराश्य मधे असलेली ती महिला आत्महत्या करणार नाही का?.. आजही बर्‍याच शाळांमध्ये विद्यार्थ्यांना Bullied केले जाते किंवा त्यांना Ragging ला सामोरे जावे लागते..
आता जरा भारतामधली परिस्थिति काय आहे ते बघु..आपल्या देशात जगाच्या तुलनेत 17% विद्यार्थी आत्महत्या होतात आणि त्यात ही आपला महाराष्ट्र सर्वात पुढे आहे जी खरच खुप विचार करण्यासारखी गोष्ट आहे..
भारतात आत्महत्या बेकायदेशीर होती आणि वाचलेल्या माणसाला सेक्शन 309 अंतर्गत एका वर्षा पर्यन्तची शिक्षा ठोठावली जायची..पण 2014 मधे केंद्र सरकार ने हा कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि संसदेत मेंटल हेल्थकेअर एक्ट पारित करुन घेतला आणि आत्महत्या decriminalised झाली..
आपल्या एका चुकी केव्हा दुर्लक्षित करण्याच्या सवयी मुळे कोणाला तरी जीव द्यावा लागतो हा ह्या वेब सेरीस मधला dialgoue खुप काही सांगून जातो....डिप्रेशन मधे असलेल्या व्यक्ति कधीच आपण आत्महत्या करु हे दाखवत नाही.अभिनेते सुशांत सिंह राजपूत आणि आसिफ बसरा ह्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.
जवळच्या व्यक्तिशी मोकळे होणे , स्वतःला कशात तरी गुंतुन घेणे हा एक मात्र पर्याय आहे..
हळव्या मनाच्या लोकांनी ही वेब सेरीस बघु नये...आपण पहिलेले चित्रपट आणि वेबसेरीस मधून किती समाज प्रबोधन करता येईल हा माझा हेतु असतो आणि राहिल...
ही वेब सेरीस Netflix वर उपलब्ध आहे.
IMDB Rating :7.6/10..
समीक्षा कशी वाटली नक्की सांगा..🙏

#अनुजचे_बंध_आणि_बरेच_काही ह्या मालिकेतील पुढील #थ्रेड :संयमा वर आधारित असेल..

@MiDareDevil @AtulAmrutJ
@realkunal7 @irajratna
You can follow @ncp_samarthak.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.