निकिता तोमर माझी कोण होती?
- सौरभ वीरकर

निकिता तोमर नामक एका युवतीने धर्मांतराला व लग्नाला विरोध केला म्हणून मुस्लिम तरुणाने तिला गोळ्या घालनू मारल्याची घटना घडली. कुठल्याही संवेदनशील मनाला निकिताच्या हत्येबाबत दुःख होणे स्वाभाविक आहे. या घटनेनंतर परत एकदा " लव जिहाद
" संदर्भात चर्चा जोर धरू लागल्या आहेत.

जिहाद चा शब्दशः अर्थ संघर्ष असा आहे. कुराणच्या आयातींमध्ये हा शब्द येताना वेगवेगळ्या संदर्भानुसार वेगवेगळ्या अर्थाने येतो. काही ठिकाणी तो प्रयत्नांची पराकाष्ठा अश्या रुपात येतो, तर काही ठिकाणी तो संघर्ष असा येतो. इस्लामच्या पाच स्तंभांमध्ये
औपचारिकपणे जिहादचा समावेश झालेला नसला तरी धर्माचे मूलभूत तत्व म्हणून त्यास अतिशय महत्व आहे .प्रेषितांच्या मक्का काळातील जिहादचा संदर्भ आणि मदिना काळातील जिहादचा संदर्भ यात फरक आहे. प्रेषितांचा जीवनप्रवास जसजसा संपत आला त्याप्रमाणे जिहाद संदर्भात अयाती अधिकाधिक जहाल होत गेल्या.
पर्यायाने जिहादला धर्मयुद्धाचे स्वरूप आले. कालपरत्वे जिहादने सुद्धा आपापले रंग आणि रूप बदलले आहेत. सशस्त्र हल्ले आणि बॉम्बस्फोट हे सुद्धा इस्लामच्या कडव्या समर्थकांच्या मते जिहादचे प्रकार आहेत. श्रद्धावान लोकांनी श्रद्धाहीन ( काफिर) लोकांशी धर्मासाठी केलेला संघर्ष हा जिहादचा
मूळ उद्देश आहे. यात धर्मप्रसारालाही अनन्यसाधारण महत्व आहे. मग असा धर्मप्रसार गोडीगुलाबीने , मतमतांतर करून असेल अथवा जोरजबरदस्तिने असेल , तरी या सर्वाची मुभा इस्लामने दिली आहे. लव जिहाद हा त्यातीलच धर्मप्रसाराचा एक प्रकार आहे कि ज्यामध्ये प्रेमाचे नाटक करून अथवा प्रेमाचा दुजोरा
देऊन अन्य धर्मातील युवतींना आपल्या धर्मात आणून पर्यायाने अनुयायांची संख्या वाढविणे हाच अंतःस्थ हेतू आहे. या परिस्थितीत युवतीने धर्मांतरासाठी विरोध केल्यास तिला जीव गमवावा लागल्याच्या अनेक घटना या देशात घडल्या आहेत.
@KohaleMangla @Sonal_Rv @patilji_speaks @sukrutkuchekar
You can follow @abhi_hinduwagh1.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.