२०२० वर्षाचे अखेरीस कटू का होईना काही नोंदी केल्याच पाहिजेत. लोकांनी या वर्षातला एकेक दिवस वर्षासारखा काढला. वर्षाची सुरवातच वादळी झाली. चीनमध्ये वुहान शहरात कोरोना विषाणू हातपाय पसरत होता तर भारतात नागरिकत्व कायद्यातील दुरुस्तीच्या विराेधात दिल्लीत असंतोष होता #अलविदा२०२०
संपूर्ण वर्ष हिंदू-मुस्लीम मांडणीत गेले. सुरवात शाहीन बागपासून झाली. आंदोलक महिलांना बदनाम करण्याचे प्रयत्न झाले. दिल्ली पोलिसांच्या मदतीने सरकारही जणू त्यात सहभागी होते. तरीही जगाने आंदोलनाची दखल घेतली. कोविड-१९ कडे दुर्लक्ष झाले. आरोग्यमंत्र्यांचे ट्विट पुरावे आहेत #अलविदा2020
कोविड-१९ विषाणूचे संक्रमण दिसते त्यापेक्षा भयंकर असल्याचे समजायलाच महिना-दीड महिना लागला. दरम्यान, नमस्ते ट्रम्प, मध्य प्रदेशातील सत्तांतर, त्यासाठी संसदेचे अधिवेशन वाढविणे हे सारे होऊन गेले. २२ मार्चचा जनता कर्फ्यू व २५ पासून लॉकडाउनपर्यंत परदेशातून लाखो लोक देशात पोचले होते.
वैज्ञानिक दृष्टिकोन, साथरोगांचा सामना यात आपण किती मागास आहोत, हे महामारीने दाखवून दिले. टाळ्या-थाळ्या, दिवे, वायूदलाच्या विमानांची उड्डाणे हे इव्हेंट विषाणूच्या फैलावाला निमंत्रणच होते. जगातल्या अनेक देशांनी चमकदार कामगिरी केली. आपण मात्र अमेरिका, ब्राझीलकडे बोट दाखवत राहिलो.
कसल्याही नियोजनाशिवाय लावलेले लॉकडाउन कोट्यवधी स्थलांतरित मजुरांची पायपीट, प्रचंड हालअपेष्टा, अनेकांचे बळी अशा दु:स्वप्नासाठी कारणीभूत ठरले. राज्य व केंद्र अशी सगळीच सरकारे भावनाशून्य वागली. कंपन्यांच्या मालकांनाच सवलती दिल्या. कोट्यवधींच्या मनांवर दु:खाचे कायमस्वरूपी ओरखडे उमटले
उशिरा जाग आलेल्या केंद्र सरकारने वीस लाख कोटींच्या पॅकेजचा भुलभुलैया केला. आकड्यांचे खेळ खेळले. कोट्यवधींचा रोजगार गेला. असंख्य लोक रस्त्यावर आले. त्यांना या पॅकेजचा किती लाभ मिळाला, हा संशोधनाचा विषय आहे. अर्थव्यवस्था, उद्योग-व्यवसाय अजूनही गटांगळी खाल्ल्याच्या अवस्थेत आहेत.
दरम्यान, तीन कृषी अध्यादेश, संसद अधिवेशनात कायदे संशयास्पदरित्या संमत झाले. त्याचे पडसाद वर्षाच्या उत्तरार्धात देशभर उमटत आहेत. कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी लाखो शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीला वेढा घातलाय. तोडगा दृष्टिपथात नाही. नववर्षाची सुरवातही आंदोलनानेच झाली #अलविदा2020