पतिव्रता धर्म :
मेघनाद चा वध झाला होता व त्याचं मृत शरीर रावणाच्या महालातील पटांगणात ठेवण्यात आला. मस्तकविना धड बघून मेघनादची पत्नी सुलोचना खुपच विचलीत झाली आणि रावणाला म्हणाली पिताश्री कमीत कमी माझ्या पतीचं शीर माझ्या हवाली करा म्हणजे त्या सोबत मी समाधानाने सती जाईन.
(1/7)
प्रतिउत्तरा दाखल रावण म्हणाला :- मी शत्रू समोर विनंती करायला जाऊ शकत नाही, तर सुलोचना तु स्वतः च रामा कडे जा ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत आणि स्त्रियां चा आदर करणारे आहेत ते तुझं म्हणणं नक्कीच ऐकतील,
(2/7)
रावणाची आज्ञा ऐकताच सुलोचना प्रभु श्रीराम यांच्या चरणी उपस्थित झाली व आपल्या मेलेल्या पतीचं मस्तक परत मागीतलं, प्रभु श्रीराम यांनी लागलीच सन्मानाने मेघनादचं शीर परत देण्याचे आदेश दिले, आणि सुलोचना चं सांत्वन करतांना म्हणाले की तुमचे पती एक श्रेष्ठ योद्धा होते.
(3/7)
युद्धात जयपराजय हा होतच असतो. पण तुम्ही अजिबात विलाप करु नका तुमच्या पतीला श्रेष्ठ गति प्राप्त होईल,

यावर सुलोचना उत्तरली की लक्ष्मण ची पत्नी उर्मिला ही पतिव्रता आणि मी देखील पतिव्रता, आमच्या दोघांच्या पती समवेत आजवर आमचं सतीत्व आमचं शील अबाधित होतं.
(4/7)
त्यामुळेच मेघनाद आजवर कुठल्याही युद्धात पराभूत झाले नव्हते.

माझे पिताश्री (सासरे) रावण यांनी परस्त्रीचं हरण करुन अतिशय मोठं पाप केलंय आणि त्यांचं अन्न मेघनाद ने खाल्लंय आणि यामुळेच इंद्रजीत मेघनाद ची विरता लक्ष्मणाची पत्नी उर्मिला च्या पतिव्रता धर्मासमोर पराभूत झाली,
(5/7)
असं म्हणून सुलोचना परत लंकेला निघून गेली.....

सुलोचना चे असे नितिवचन ऐकून श्रीराम सेनेतील प्रत्येक जण स्तंभित झाला,

"फक्त अधर्मच नव्हे तर अधर्माचा वैचारिक पोषण करणारा प्रत्येक व्यक्ती हा देखील पाप/अपयशाचा समान भागिदार असतो.
(6/7)
मित्रांनो हीच आपली महान हिंदू संस्कृती जी आपल्याला जगापासून वेगळं बनवते .....

नाहीतर आतंकवाद्यांच्या मयतीला लाखोंची गर्दी देखील आपण बघितलीच आहे.

रावण ब्राह्मण होता पण दरवर्षी त्याला जाळून आपण जगात संदेश देतो की अधर्माचा आम्ही कधीच उदोउदो करत नाही व करणार ही नाही.
(7/7)
You can follow @LakhobaLokhande.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.