समतेच्या आंदोलनासाठी हे वर्ष आव्हानात्मक होते तरी वर्षाची शेवट गोड झाली. अर्जेंटीनाने गर्भपाताला कायदेशीर मान्यता दिली. गर्भाचा जगण्याचा अधिकार की स्रीच्या राईट टू बॉडीचा अधिकार हा संघर्ष अविरत सुरूच राहणार आहे. पोलंडच्या महिला आजही चौकाचौकात छोटीशी आशा घेऊन जमा होत आहेत,
बाईला वस्तू समजण्याची मानसिकता गर्भपाताला बाळाच्या जगण्याच्या अधिकाराशी जोडते तेव्हा ती क्रूर थट्टाच करत असते. अमेरिका गर्भपाताची कायदेशीर परवानगी काढून घेण्याच्या उंबरठ्यावर उभी आहे, अशा परिस्थितीत महिलांचे प्रस्तावित आंदोलन उग्र रूपाने पुन्हा जन्माला येईल. जगभरातील महिला
आपल्या मूलभूत हक्कांसाठी लढतायत, त्यांना भीक नकोय हक्क हवेत. भारत अजूनही याबाबतीत पिछाडीवर आहे, आशा आहे येणारे वर्ष बदलांनी युक्त असेल.

समतेसाठी सुरू असलेल्या लढाया प्रेरणा देऊन जातात. LGBTQ+ कम्युनिटीसाठी हे वर्ष निराशाजनक होते. संकुचित मानसिकता बदलले नसल्याचे स्पष्ट आहे.
वेगवेगळ्या सेक्शुयलिटी अनैसर्गिक असतात असे मानणारा uninformed घटक अजूनही कायम आहे. इतिहासाची इतकी पाने उलटली तरीही सेक्शुयलिटी बद्दलचा टॅबू अजूनही तसाच आहे.

इजिप्तच्या महान सुलताना क्लिओपात्रा यांना सेनापती अँटोनी यांच्या तथाकथित अनैतिक संबंधांपुरते मर्यादित ठेवले गेले,
भावासोबच्या विवाहानंतर काही कालावधीतच राज्यातून बहिष्कृत केल्याने त्यांच्यात महिला सुलताना बनण्याची इच्छाशक्ती जागी झाली होती. रोमन सम्राट ज्युलियस सिझरच्या सोबतीने त्या यशस्वीही झाल्या. इजिप्तच्या महान संस्कृतीच्या पुनरुज्जीवनाचे काम सुरू झाले. ज्युलियस सिझरने
इजिप्शियन संस्कृतीतून प्रेरणा घेऊन अत्याधुनिक लायब्ररी व मिलीटरीची स्थापना केली. अॅरिस्टोक्रसीची सत्ता संपुष्टात आणली, अशा अनेक रिफॉर्म्सची प्रेरणा सुलताना क्लिओपात्रांकडूनच मिळाली. अशा रिफॉर्म्समुळे सिझरची भर दरबारात हत्या झाली हा वेगळा इतिहास आहे.

सांगायचा उद्देश इतकाच की,
क्लिओपात्रा सारख्या महान सुलतानाचे महत्त्व कमी करण्यासाठी त्यांच्या सेक्शुयलिटीला समोर केले जाते, ही मानसिकता पुरूषसत्ताक व्यवस्थेची ओळख आहे.

प्रश्न जेव्हा LGBTQ कम्युनिटीचा येतो तेव्हा अजब तर्क दिले जातात. तर्कशुद्ध नीती शास्त्राचा आढावा घ्यायचा झाल्यास
तोंडावर पडण्याची नामुष्की येते. नैसर्गिक काय अन् अनैसर्गिक काय याचे पूर्वग्रह काही वेळासाठी बाजूला ठेवूयात.

कल्पना करा, आपण एखादा कायदा तोडला अन् साहजिकच आपल्याला त्याचा दंड भरावा लागेल. याचा अर्थ असा होतो की नियम मोडल्याने शिक्षा झाली.
सेक्शुयलिटीमुळे नैसर्गिक नियमांची पायमल्ली होत असल्यास निसर्गाने आपल्यालाही रोखायला हवे होते पण त्याने असे काहीही केलेले नाही. शुध्द तर्कावर आधारित हा मुद्दा गौण होतो.

दुसरा मुद्दा, विविध सेक्शुयलिटीमुळे नैसर्गिक पिढ्या चालवण्याच्या नियमांना बाधा पोहचते.
सिमॉन बाई पुन्हा आठवतात, बाईची व्याख्या जन्म देणाऱ्या मशीनशी केली जाते सोबत उत्क्रांती सुरू ठेवण्याचे तर्क मांडले जातात.

वंश चालविण्यासाठी माणसाचा जन्म झाला हा धर्मशास्त्राचा तर्क असतो जेणेकरून त्यांच्या कथाशास्राला बळ मिळावे. आधी ग्रीकांनी अन् नंतर कॅथलिकांनी याला धर्माचा
आधार बनवला.

आदिमानव आपल्या बोटांचा वापर झाडावर पकड निर्माण करण्यासाठी करायचे आता आपण बोटांच्या वापरावरच अवलंबून आहोत. तोंडाचा वापर जेवण्यासाठी केला जायचा आता बोलण्यासाठी केला जातो अन् किस करण्यासाठीही केला जातोच. हे सगळं नक्कीच अनैसर्गिक असायला हवं..!
आपली पुढची पिढी निर्माण करण्यासाठी माणसाचा जन्म होते, ही थेअरी स्वतःच्या उत्क्रांतीच्या सिध्दांताशी कॉन्ट्रॅडिक्ट करते.

आपण सर्वांनी डोक्यावर उचलून घेतलेला युआल नोआ हरारी बोलतो, "जन्म ठराविक कार्यासाठीच होतो, हे तद्दन खोटे आहे. जैवविज्ञानाची कुठलीही जोड नसताना फक्त धर्माच्या
पुष्टीमुळे ही अजूनही टिकून आहे. शारीरिक अवयवे ही ठराविक कार्यासाठीच मर्यादित नसतात, उत्क्रांतीनुसार ती आपली कार्ये बदलत असतात. पंखांची निर्मिती रेपटाईल्सच्या संरक्षणासाठी झाली होती मात्र आता पक्षी त्यांचा वापर उडण्यासाठी करतात, याला अनैसर्गिक म्हणता येणार? चिपांझी सेक्सचा वापर
कळपामधील संबंध सुधारण्यासाठी करतात. जेंडर हा स्पेसिफिक डिस्कोर्स तिथे अजिबात नसतो, याला अनैसर्गिक म्हणता येणार? लोककथांवर विश्वास ठेवणारी मेजॉरिटी जेव्हा रिॲलीटी समोर कमी पडते तेव्हा तुम्ही नेहमी रिअॅलिटीवर विश्वास ठेवा. तुम्ही एकटे असलात तरी..!"
शास्त्राने खोडून काढलेल्या विषयांवर चर्चा करणे ही खरी शोकांतिका असते.

एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीलाही समतेसाठी सुरू असलेला संघर्ष न संपणारा वाटतो. मानसिकता बदलणे ही शेवटची पायरी वाटते पण तिथूनच सुरूवात करण्याची गरज आहे. फेमिनिझमला विरोध असो वा होमोफोबिया असो हे नकळत
व्यवहारात वापरले जातात. हुशार, सुधारणावादी वाटणार्‍या लोकांकडूनही हे सर्रास घडते. मानसिकता बदलायची असल्यास वेळोवेळी टोकत चला.

हा संघर्ष मटेरिअलिस्टेक अन् वैयक्तिक दोन्ही पातळीवर अस्तित्वात आहे.
पोलंड मधील फ्री lgbtq झोन असोत वा अमेरिकन सुप्रीम कोर्टाची टांगती तलवार असो प्रत्येक ठिकाणी प्रचंड वैयक्तिक अन् सामाजिक संघर्ष बाकी आहे.

राजकीय कट्टरवाद्यांसाठीही हे महत्त्वाचे वर्ष होते. राजकीय कॉन्झर्वैटिझम लोकांमध्ये रूजलेय, हे आता मान्य करावे लागेल.
शोषित घटकांच्या अधिकारांच्या गळचेपीच्या पायावर त्यांचे पॉप्युलिझम वसलेले आहे. वादग्रस्त तत्त्वज्ञन मिकीयावॅलीच्या तत्वज्ञानावर मेजॉरिटेरिअन व्यवस्थेची वाटचाल सुरू आहे. "सत्तेमधील आडकाठी कोणत्याही परिस्थितीत मोडून काढणे हे राज्यकर्त्यांचे आद्यकर्तव्य असते त्यासाठी कोणतीही किंमत
मोजणे समर्थनीय आहे." हे तत्वज्ञान फॅसिस्ट कल्चर साठी पुरेपूर मार्गदर्शक ठरते.

येणारा काळ शोषित घटकांच्या अस्तित्वासाठी महत्वाचा आहे त्यांच्या सोबत उभे रहा.

मानवाधिकारांबद्दल जागृती करणे ही काळाची गरज बनलीय. किमान डोक्यातील बॅरीअर तोडून नवीन वर्षी प्रेमाचा प्रसार करा. ❤

_____
You can follow @prathameshpurud.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.