उत्तर - खोती पद्धती वरून जगातील सर्वात प्रदीर्घ चाललेला हा #शेतकरी लोकांचा संप होता.हा संप 7 वर्ष चालला. खोती पद्धती म्हणजे काय तर आदिलशहाने ताब्यात घेतलेल्या रत्नागिरी भागात खोतांची नेमणूक केली होती. वजनदार बडी व्यक्ती पाहून ही नेमणूक होत असत. या पद्धतीत जमीन सर्व खोतांच्या https://twitter.com/sawsammer3/status/1343806416465711104
ताब्यात असतं.पेशवाई मध्ये खोताना जमिनीच्या मालकीचा रीतसर सनदा देण्यात आल्या. ब्रिटिशांनी खोती वतन नुसार खोती पद्धतीला मान्यता दिली. खोत जमिनीचे मालक आणि कुलाकडून जमीन कसून घेणे अशी पद्धत मान्य झाली.
कुळाकडे जमीन कसण्यासाठी देताना खोत जमिनीचा #कबुलायत लिहून घेत.यात जाचक अटी असत
या अटीनुसार खोताच्या घरी पाणी भरणे, घरातील लोकांची सेवा, आदी अनेक काम करावी लागत.सावकारी कर्ज, शेतसारा,खोताचा जुलूम यामुळे शेतकरी त्रस्त झाले होते. सारा कोकण प्रांत असंतोष ने धग धगत होता. या विरुद्ध १९०५ पासून शेतकरी संघटित झाले. असंतोष पसरत गेला आणि यातून+ #मराठी
#कोकण प्रांत शेतकरी #संघाची स्थापना झाली. कोकणातील या शेतकऱ्यांचा चळवळीचे नेतृत्व डॉ #बाबासाहेब आंबेडकर, नारायण नागू #पाटील, भाई #चित्रे, सुरबा #टिपणीस, शामराव #परुळेकर अशा मान्यवरांनी केले.रायगड,रत्नागिरी येथील शेतकऱ्यांनी लढा दिला.अनेक ठिकाणी शेतकरी सभा झाल्या, परिषदा भरल्या.
या सर्व सभा परिषदा डॉ बाबासाहेब आंबेडकर व वरील इतर मान्यवर यांच्या नेतृत्वात पार पडल्या.(१९०५ ते १९३१). ब्रिटिशांनी शेतकरी संघावर बंदी घातली. यानंतर #जगातील एकमेमेव प्रदीर्घ ठरलेल्या शेतकऱ्यांच्या संपाला #चरी येथे २७ ऑक्टोबर १९३३ रोजी प्रारंभ झाला. याचे नेतृत्व नागू पाटील
यांनी केले.या संपात चरी (अलिबाग) इथे १४ गावांचे लोक सहभागी झाले होते आणि हा संप १९३३तर १९३९ अशी सात वर्ष चालला. चरी येथे शेतकरी परिषदेला #मुख्य मार्गदर्शक म्हणून डॉ #बाबासाहेब यांना निमंत्रित केले होते. संप फोडण्याचा प्रयत्न केला गेला परंतु कोकणातील #कुणबी, #आगरी, #दलित अधिक
संघटीत झाले.याचा परिणाम म्हणजे १७ सप्टेंबर १९३७ रोजी डॉ बाबासाहेब यांनी खोती पद्धत नष्ट करण्याचे विधेयक मुंबई #विधिमंडळात मांडले. अनेक भव्य मोर्चे यात #नाशिक, #सातारा अनेक जिल्ह्यातील शेतकरी सामील होते.खोती पद्धतीचा अंत झाल्याने १,२२,८६० एकर जमीन मुक्त झाली. आणि पुढे कुळवहीवाट व
व शेतजमीन अधिनियम १९४८ नुसार कसेल त्याची जमीन हे तत्व लागू करण्यात आले. #मराठी
You can follow @sawsammer3.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.