जेव्हा नरसिंह राव यांचे सरकार स्थापन होत होते तेव्हा त्यांना मनमोहन सिंग अर्थमंत्री म्हणून हवे होते. त्यांनी मनमोहन सिंग यांना तसे कळवले, परंतु मनमोहन सिंग यांनी एक अट ठेवली ती म्हणजे माझ्या कारभारात कोणीही हस्तक्षेप करता कामा नये. श्रीमती सोनिया गांधी यांनी मनमोहन सिंग यांना
हस्तक्षेप होणार नाही असे वचन दिले. त्यानंतर मनमोहन सिंग यांनी खुली अर्थ व्यवस्था स्वीकारली. त्याचे परिणाम पाच-सहा वर्षात दिसू लागले उदाहरणार्थ ज्यांच्याकडे टू व्हीलर होती त्यांच्याकडे फोर व्हीलर आली. ज्यांच्याकडे 1BHK होता त्यांचा 2BHK झाला. औद्योगिक क्षेत्रामध्ये
स्पर्धा सुरू झाली. या या स्पर्धेत भारतीय उद्योजक उतरल्यामुळे त्यांची गुणवत्ता व व्यापार जगभर पोचला. परिणामी भारताची अर्थव्यवस्था सुदृढ झाली . औद्योगिक क्षेत्रातील गुणवत्ता वाढली. परदेशी कंपन्यांबरोबर collabration केल्यामुळे तंत्रज्ञानाचे आदान प्रदान झाले. देशातील रोजगार वाढला
अशा पद्धतीने काँग्रेसने भारताचा कायापालट केला. मला अजूनही आठवते की जर TV किंवा टू व्हीलर घ्यायची असेल तर नंबर लावावा लागत असे. भारतात प्रीमियर पद्मिनी व ॲम्बेसेडर या गाड्या दिसत होत्या परंतु खुल्या अर्थव्यवस्थेमुळे हे चित्र बदलून गेले भारताचा विकास अतिशय चांगल्या पद्धतीने झाला
अशा या जनताभिमुख निर्णय घेणाऱ्या काँग्रेसचे वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. @anil010374 @SahilVastad @aSantoshTweets @Kailuspeaks @suryakantnaik22 @g_khude @Anand_Dasa88 @GavankarDattu