आज कॉंग्रेस संस्थापना दिवस.,
कॉंग्रेस एक राष्ट्रीय पक्ष म्हणून उदयास आला तो आजच्याच दिवशी तब्बल १३५ वर्षांपूर्वी...
या १३५वर्षांच्या प्रवासात अनंत मातब्बर सरदारांनी कॉंग्रेसची धुरा अतिशय समर्थपणे पेलून धरली, कॉंग्रेस अध्यक्ष वा तत्सम महत्वाची पदे भुषविलीत....
राष्ट्रीय स्तरावर कॉंग्रेस उदयास येताच पाठोपाठ बंगालमध्ये१९०५ साली बंगाल प्रांतीक परिषद नावाने कॉंग्रेसच्या कार्याचा लेखाजोखा मांडणारी संस्था उदयास आली, कॉंग्रेस ची अराजकीय उपशाखा म्हणून तिचे वर्णन केले जाउ शकते.
१९०८ साली तीचे अध्यक्षपद रविंद्रनाथ टागोरांनी भुषविले होते...
अध्यक्षस्थानावरून मनोगत व्यक्त करताना ते म्हणतात,
"कॉंग्रेसने मला दिलेल्या या सन्मानाबद्दल त्यांचे आभार परंतु या पदासाठी मी तितकासा लायक नाही असं माझं वैयक्तिक मत आहे.
पण अशावेळी जेव्हा जमिनीवर वाघ आणि पाण्यात मकररूपी शत्रू अस्तित्वात असताना सध्या देशाला कॉंग्रेसची गरज आहे.
आणि या जोखमीच्या काळात कॉंग्रेसची धुरा सांभाळणे मी माझी जबाबदारी समजतो..."

ते पुढे म्हणतात, "बरं असं ही नाही कि कॉंग्रेस कुणा धनदांडग्यांची संस्था आहे अथवा कॉंग्रेसला या चळवळीतून मोठं साम्राज्य उभं करायचंय...
कॉंग्रेसचे उद्दिष्ट एवढेच आहे कि, समस्त शिक्षीत भारतीयांनी एकछत्री अंमलाखाली येऊन भारतभुच्या संरक्षणार्थ स्वतःस झोकून द्यावे. या चळवळीतून भारतीयांच्या एकुण इच्छाशक्तीचा एकत्रीत रित्या वापर करून प्रचंड मोठे कर्तुत्व साध्य करावे ज्याद्वारे देशास स्वतःची ओळख निर्माण करता येउ शकेल."
"आपला इतिहास आणि कॉंग्रेस संयुक्तपणे अपणास असे शिकवण देतात कि, आपण एक देश आहोत, लहानमोठ्याचा की उच्चनीचतेचा भेद आपल्यात नाही., एकमेकांच्या सुखदुःखात आपण बरोबरीने उभे राहुन देशभावनेची मुल्य जोपासू शकतो."
पुढे ते मतदानाचे महत्व अधोरेखित करताना कॉंग्रेस कमिटी ची निवड आदर्श निवडणूक प्रणालीद्वारे व्हावी अशी इच्छा व्यक्त करतात व सभेस संबोधित करतात कि, "जर योग्य पद्धतीने निवडप्रक्रिया न होता कमिटी ची निवड जर वादग्रस्त ठरत असेल तर कॉंग्रेसचे महत्व आपण हाताने कमी केल्यासारखे होईल."
या भाषणात गुरुजी धर्मवादावर सुध्दा तोंडसुख घेतात, ते म्हणतात, "शेकडो वर्षांपासून एकत्र राहून देखील आजवर आपण हिंदु-मुस्लिम वादातून बाहेर पडू शकलेलो नाही ही मोठीच शोकांतिका म्हणावी लागेल... परंतु मला विश्वास आहे कि कॉंग्रेस एक संघटना म्हणून हा वाद संपविण्यासाठी समोर येइल"
अखेरीस ते कॉंग्रेसच्या भविष्यातील वाटचालीबाबत मार्गदर्शन करताना सांगतात, "कॉंग्रेसची उद्दिष्टे मी चांगल्याप्रकारे जाणून आहे तरी काही गोष्टी स्पष्ट करु इच्छितो कि,एक संघटना म्हणून ठरावीक भागांकडे लक्ष केंद्रित करुन चालणार नाही, खेड्यापाड्यांमध्ये सुध्दा कॉंग्रेस पोहचणे आवश्यक आहे.
त्यासाठी सुशिक्षीत वर्गाने पुढाकार घ्यायला हवा, जनतेच्या मनात कॉंग्रेसची मुल्य रुजवायला हवीत, कॉंग्रेसचे महत्व सर्वसामान्यांना समजणे अनिवार्य आहे, तरच कॉंग्रेसची प्रमुख उद्दिष्टे साकार केली जाउ शकतील."

गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली कॉंग्रेसची वाढ उत्तम झाली हे सांगणे न लागे...
बंधुभाव, एकता, देशप्रेम अशी अगणित मुल्य तळागाळापर्यंत रुजली आणि काहीअंशी कॉंग्रेसचे उद्दिष्ट सफल ही झाले.

परंतु आज, मागील काही वर्षांत देशातील सर्वसामान्य जनता पुनश्च एकदा भरकटू लागल्याचे निदर्शनास येतंय, जातीवाद, धर्मांधता, उच्चनीचतेचा भेद सामान्य जनतेच्या मनात अंकुरला जात आहे
आणि अशावेळी यांतून फक्त कॉंग्रेसची विचारधाराच मार्ग काढू शकते पण, सद्यस्थितीत कॉंग्रेसने हाराकिरी पत्करली की काय अशी शंका उत्पन्न होत असल्याचे खेदाने नमूद करावे लागत आहे.
कॉंग्रेसमध्ये ही जी मरगळ उत्पन्न झाली आहे ती निश्चितच देशभावनेसाठी मारक आहे.
वेळ आलेली आहे कि, कॉंग्रेसने आता आक्रमक होऊन सत्तधार्यांच्या या भेदनितीचा पुरता समाचार घ्यावा व सर्वसामान्यांच्या मनातील भय नाहीसे करण्यास हातभार लावावा.
@INCIndia
@INCWestBengal
@INCMaharashtra
@RahulGandhi
@AshokChavanINC
@ANKITA_SCI
@beingshrutip
@MarathiDeadpool
साभार संदर्भ:- https://twitter.com/ABoutSocialLife/status/1343407545226985477?s=19
You can follow @Nilesh_P_Z.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.